तुमच्या मेकअप किटमध्ये काय काय असतं? | What’s in your makeup kit?

Published by Uma on

What's in your makeup kit?

तुमच्या मेकअप किटमध्ये काय काय असतं? | What’s in your makeup kit?

 • – तुम्ही नियमित मेकअप करणारे असलात किंवा नसलात, तरी स्वत:चा असा एक मेकअप किट तयार असणं फार आवश्यक आहे. यामुळे, ऐनवेळी मेकअपच्या सामानाची शोधाशोध होत नाही. मेकअपचं सामान कॅरी करायचं असल्यास तयार किटची पाऊच किंवा पर्स बॅगेन टाकली की काम झाल. प्रत्येक लहान मोठी वस्तू घेतली की नाही हे पुन:पुन्हा तपासण्याचीही गरज नाही. किटमध्ये सगळं आपसूकच येत.
 • – चला तर, अशा अप टू डेट मेकअप किटमध्ये काय काय असायला हवं ते पाहूया. मूळात सौंदर्य प्रसाधनांचे अनेक प्रकार असतात, ज्यात प्रत्येकाचा वापर व वैशिष्ट्य निरनिराळं आहे. पुन्हा त्यात अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध आहे. यातून तुमच्या त्वचेला साजेसे प्रॉडक्ट तुम्हाला निवडायचं आहे. मात्र, कुठले प्रकार किटमध्ये असायला हवेत याविषयी जाणून घेऊया.
 1. केलेला मेकअप चेह-यावर दिवसभर व्यवस्थित रहावा म्हणून मेकअपचा बेस लेअर असणारे मॉईच्छराईझर व प्राइमरला किटमध्ये प्रथम स्थान द्या.
 2. त्यानंतर, कंसीलर तसेच, फाऊंडेशन यांचा किटमध्ये समावेश करायला हवा. अर्थात, ते निवडताना त्वचेचा रंग ध्यानात घ्यावा.
 3. आयलाइनर आणि मस्करा हे दोन्ही प्रकार तुमच्यासाठी बिलकूल अनोळखी नाहीत. पर्समध्ये आणि काही असो वा नसो, आयलाइनर असतेच. तेव्हा डोळ्याचे सौंदर्य खुलविणा-या या प्रॉडक्टना विसरुन कसं चालेल.
 4. आता, लिपस्टिक कडे वळूया. सिंपल लाल व न्यूड अशा दोन रंगाच्या लिपस्टिक मेकअप किटमध्ये कायम ठेवाव्यात. पार्टी लूकपासून, साध्या कुर्तीपर्यंतच्या लूकसाठी या दोन्ही लिपस्टिक अचूक ठरतात.
 5. लहानसे आयब्रो पॅलेट किटमध्ये असावे, ज्यात ब्राईट, ग्लिटर, न्यूड असे सर्व रंग सामावले असतील. जेणेकरुन लूकनुसार हवा ते वापरता येईल.
 6. चेह-याचे फिचर्स क्षणार्धात अधिक उठावदार करण्याचे काम ब्लश व हाइलाइटर करतात. फक्त त्यांचा अचूक वापर करणे जमायला हवे. त्यामुळे, मेकअपला पुर्णत्व देणा-या या दोन बाबी आहेत, त्या मेकअप किटमध्ये हव्यातच.
 7. एक ब्युटीब्लेंडर तर कॅरी करावेच. फाऊंडेशन, कंसीलर, ब्लश चेह-यावर व्यवस्थित पसरवण्यासाठी ते उपयोगी ठरते. आपण ब-याचदा बोटाने ही क्रिम्स चेह-यावर पसरवण्याचा प्रयत्न करतो. अशाने बोटांना लागून क्रिम फुकट जातेच, वर कमी अधिक प्रमाणात चेह-यावर उंचवटे दिसू लागतात. सोबत, काही ब्रशेसही ठेवावेत.
 8. शेवटची मात्र फार महत्त्वाची वस्तू म्हणजे क्यू टिप्स तसेच वाईप टिश्यू. मेकअप करताना होणा-या बारीक सारीक चुका किंवा दिवसभरात मेकअपसहित वावरताना लिपस्टिक, लाइनर जरासं पसरल तर तितक हलकेच पुसण्यासाठी क्यू टिप्स उपयुक्त ठरतात आणि मेकअप करण्याआधी व केलेला मेकअप पुसण्यासाठी पाणी, क्लिनझर उपलब्ध नसेल तर वाईप टिश्यूज वापरत येतात.

मेकअप करताना विविध वैशिष्ट्यांनी युक्त अशी भरपूर प्रसाधने वापरली जातात. प्रत्येक प्रकार किटमध्ये समाविष्ट करत गेलो, तर लहान मेकअप बॅगच कॅरी करावी लागेल. त्यामुळे, लहानश्या पाऊचमध्ये मावतील अशी व कधीही कुठेही चटकन मेकअप करुन तयार होण्यासाठी आवश्यक असणा-या वस्तूंचाच किट आपण तयार केला आहे. कसा वाटला नक्की कळवा? अजून या किटमध्ये काय समाविष्ट करायला हवं, असं तुम्हाला वाटतं. तेही सांगा.

What’s in your makeup kit?

Whether you are a regular makeup artist or not, it is very important to have your own makeup kit. Because of this, there is no need to search for makeup accessories. If you want to carry makeup, put a ready-made kit pouch or purse bag and it works. There is no need to re-check whether every small or big item is taken. Everything comes automatically in the kit.

So, let’s see what should be in such an up to date makeup kit. There are basically many types of cosmetics, each with different uses and characteristics. Again there are many brands available in it. From this, you have to choose the product that suits your skin. However, let’s find out what kind of kit should be in the air.

 1. Apply a moisturizer and primer with a base layer of makeup first in the kit so that the applied makeup stays on the face throughout the day.
 2. Then, concealer as well as foundation should be included in the kit. Of course, skin color should be taken into consideration when choosing it.
 3. Both eyeliner and mascara are not unfamiliar to you. In the purse and whatever it is, there is eyeliner. So how can you forget about this eye-opening product?
 4. Now, let’s turn to lipstick. Simple red and nude lipsticks should be maintained in the makeup kit. Both of these lipsticks are perfect for a party look, from a simple kurti look.
 5. The small eyebrow palette should be in the kit, which will contain all the colors like bright, glitter, nude. So that it can be used according to the look.
 6. Blush and highlighter make the features of the face more uplifting in a moment. You just have to be more discriminating with the help you render toward other people. So, there are two things that complement makeup, they should be in the makeup kit.
 7. Carry a beauty blender. It is useful for spreading foundation, concealer and blush on the face. We often try to spread these creams on the face with our fingers. As soon as the cream is applied on the fingers, more and more bumps appear on the face. Also, keep a few brushes.
 8. The last but the most important thing is the cue tips as well as the wipe tissue. Q-tips are useful for lightly wiping the lipstick and liner when applying makeup or if the lipstick is spread a little while working with the makeup during the day, and if there is no water or cleanser available to wipe the make-up before and after the make-up, wipe tissues are used.

A lot of cosmetics with different features are used while applying makeup. If each type is included in the kit, then only a small makeup bag will have to be carried. So, we have created a kit of items that can fit in small pouches and can be easily applied anywhere and anytime. Let me know exactly how you felt. What else do you think should be included in this kit? Say that too.

Categories: Beauty Tips

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *