Veg Manchurian Recipe in Marathi – मंचुरियन रेसिपी

Published by Uma on

veg Manchurian Recipe

veg Manchurian Recipe in Marathi : चायनीज म्हंटल कि चमचमीत आणि चटपटीत पदार्थ (Recipe) आठवतात आणि मग तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे चायनीज मध्ये प्रसिद्ध रेसिपी म्हणजे व्हेज मंचुरियन (veg Manchurian ) .हा चटपटीत पदार्थ आपल्याकडे जास्त आवडीने खाल्ला जातो पण तो बाहेर कसा बनवतात त्यात किती कुत्रिम रंग असतो, ते कोणत्या तेलात बनवतात आपल्याला काहीच माहिती नसते.त्यामुळे अशे पदार्थ बाहेर खाणे शक्यतो टाळलेले बरे. बाहेर खायचे नाही मग कुठे खाणार? त्यापेक्षा घरीच बनवा आणि चटपटीत व्हेज मंचुरियन खाण्याचा आनंद घ्या.आपण आज कोबी मंचुरियन बनवायची चायनीज सेंटर सारखी सर्वात सोप्या पद्धतीची व्हेज मंचूरियन रेसिपी (veg Manchurian Recipe in Marathi) बगणार आहोत.

साहित्य :

Ingredients to make Veg Manchurian Recipe in Marathi : व्हेज मंचूरियन बनवण्यासाठी साहित्य

 • ३ वाटी पत्ता कोबी (patta gobi ) बारीक चिरून
 • 1 सिमला मिरची लहान वाटी
 • 1 वाटी गाजर बारीक चिरून
 • २ चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी
 • 2 चमचा आले बारीक चिरून घ्या
 • 2 चमचा कांदा पात
 • 1 वाटी कॉर्नफ्लोर
 • 1 वाटी मैदा
 • चवीनुसार मीठ
 • 2 चमचा ब्लॅक पेपर पावडर
 • ग्रेव्हीचे साहित्य ( Manchurian Gravy )
 • ७ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
 • ४ ते ५ मध्यम हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
 • १/२ चमचा सोया सॉस
 • १ चमचा टोमॅटो सॉस
 • चवीनुसार चिली सॉस
 • 1 चमचा व्हिनेगर
 • १/२ वाटी पाणी
 • अर्धा इंच किसलेलं आलं
 • १ वाटी पाण्यामध्ये १/२ चमचा कॉर्नफ्लोअर एकत्र करून
 • १ चमचा तेल
 • १ चिमूटभर साखर
 • मीठ
 • कोथिंबिर

कृती :

How to Make Veg Manchurian Recipe in Marathi : व्हेज मंचुरियन रेसिपी

 • व्हेज मंचुरियन रेसिपी Manchurian बनवण्यासाठी प्रथम कोबी, कांदापात,गाजर आणि सिमला मिरची सर्व बारीक बारीक चिरून घ्या.
 • नंतर एका बाऊलमध्ये ह्या सर्व चिरलेल्या भाज्या मैदा, कार्न फ्लावर, लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर ,आल लसूण पेस्ट, मीठ आणि खाण्याचा रंग घालून मिक्स करून घेतले.
 • आता ह्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करून करावे. मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना खूप लवकर पाणी सुटते, त्यामुळे गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये.
 • सर्व गोळे तयार करून झाले कि कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करून मंचुरियन गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे. मंचुरियन गोळे पूर्ण तळून झाले कि ग्रेव्ही बनवूया .

ग्रेव्हीची कृती ( How To Make Manchurian Gravy )

 • ग्रेव्ही (Gravy) बनवण्यासाठी एका कढईत किंवा पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालावे.(तुम्हाला आवडत असेल तर उभी उभी कापलेली शिमला मिरची पण घालू शकता) आता हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.
 • आता ह्या सर्व मिश्रणात कॉर्नफ्लोअर घालावे. त्यानंतर ग्रेव्हीचे मिश्रण उकळू लागले कि त्यामध्ये साखर, मीठ आणि कोथिंबिर घालावी.
  मग मिश्रणाला उकळी फुटली की मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्यावे.
 • आता तयार केलेले मांचुरियन गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे. ( सर्व्ह करण्याच्या थोडा वेळ अगोदर गोळे घालावेत.)
  एका डिश मध्ये तयार गरम बॉल्स घेऊन त्यावर गरम ग्रेव्ही घालावी.

टिप्स :Tips Manchurian Recipe

 • पत्ता कोबी बारीक कापून घेण्यापेक्षा जर किसून घेतली तर ती जास्त चविष्ट लागते .
 • एका बाऊलमध्ये भजी, चटणी, कापलेला कोबी, कांदापात घालून एकत्र मिक्स करून खा. अजून छान लागेल.

veg Manchurian Recipe in Marathiमंचुरियन रेसिपी


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *