Veg Biryani Recipe in Marathi : व्हेज बिर्याणी रेसिपी । Step By Step Veg Biryani Recipe

Published by Uma on

Veg Biryani Recipe in Marathi

व्हेज बिर्याणी (Veg Biryani ) बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ (Recipe) आहे . साधारणपणे बिर्याणी हि Non-vegetarian असते .पण व्हेज बिर्याणी (Veg Biryani ) सुद्धा प्रसिद्ध आहे.बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी (Veg Biryani Recipe in Marathi) सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी.

साहित्य : Ingredient For Veg Biryani Recipe in Marathi

 • १ कप बासमती तांदूळ (Rice )
 • १/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
 • २ मध्यम कांदे पातळ उभे चिरून
 • १/२ कप मटार
 • ६-७ फ्लॉवरचे तूरे
 • १०-१५ काजू बी
 • १ टेस्पून लसूण पेस्ट
 • १ टेस्पून आले पेस्ट
 • पाव कप घट्ट दही
 • चवीपुरते मीठ
 • ३ ते ४ टेस्पून तूप किंवा बटर
 • १/२ टिस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
 • २ चिमटी केशर + २ टेस्पून गरम दुध
 • १/४ कप फरसबीचे तुकडे (आवडत असलेल्या भाज्यांचे तुकडे सुद्धा घालू शकतो)
 • १ कप टॉमेटोची प्युरी (३-४ मोठे टोमॅटो शिजवून त्याची मिकसरमध्ये २-३ टेस्पून पाणी घालून प्युरी करावी. प्युरी नंतर गाळून घ्यावी )
 • अख्खे गरम मसाले – १ इंच दालचिनीची काडी, ४-५ लवंगा, २-३ वेलची, ३-४ तमालपत्र, ४-५ काळी मिरी, १ मसाला वेलची

कृती : Step By Step Veg Biryani Recipe in Marathi

कृती :

step १) सर्वप्रथम बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही बनून घेऊया : बिर्याणीसाठी ग्रेव्ही (Biryani Gravy)

१) काजू टाळून घेण्यासाठी कढईत १ टेस्पून तूप गरम करावे.त्यात काजू तळून घ्यावे ,आता तळलेले काजू बाजूला एका प्लेट मध्ये काढून ठेवावेत.आता सर्व गरम मसाल्याचे साहित्य घालावे आणि काही सेकंद परतावे.
३) त्यानंतर एक चिरलेला कांदा घालावा. आले-लसूण पेस्ट घालावी. कांदा थोडा परतून झाला कि त्यात फरसबी, फ्लॉवरचे तूरे, गाजराचे चौकोनी तुकडे, मटार या भाज्या घालाव्यात. तिखट आणि मीठ घालावे. मग चांगले परतून घ्यावे व त्यानंतर मध्यम आचेवर ३-४ मिनिटे वाफ काढावी.
४) आता वाफ काढली कि त्यात टॉमेटोची प्युरी घालावी. मध्यम आचेवर टॉमेटोचा कच्चा वास जाईस्तोवर शिजवावे. टॉमेटो शिजला आणि ग्रेव्ही (Gravy) घट्ट झाली नसेल तर ती होण्यासाठी मोठ्या आचेवर उकळी काढावी. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले पाहिजे. कारण नंतर आपण यात दही घालणार आहोत. ग्रेव्ही पातळ राहिल्यास व्हेज बिर्याणी (Veg Biryani Recipe) बनवताना भात ओलसट होतो आणि मग बिर्याणी मोकळी होत नाही. त्यासाठी आपल्याला त्याची अगोदरच कलगी घ्यायची आहे .
५) आता आपली ग्रेव्ही तयार आहे.ग्रेव्ही गार झाली कि त्यात घोटलेले दही मिक्स करावे.

Step २) बिर्याणी साठी कांदा तळून घेउया: तळलेला कांदा (Fry Onion )

१) आपण कापलेल्या कांद्यापैकी १/२ कांदा तेलामध्ये कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यावा. किंवा जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर बेकिंग ट्रेमध्ये अल्यूमिनीयाम फॉईल ठेवावी. २) त्यात चिरलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा त्यावर पसरवा. १-२ टीस्पून तेल कांद्याला हलकेच चोळून घ्यावे. ४०० F ओव्हन गरम करावा. ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा. मध्येमध्ये ट्रे बाहेर काढून कांदा थोडा परतावा म्हणजे सर्व ठिकाणी नीट शिजेल. ३) कांद्याच्या कडा जर ब्राउन झाल्या कि ओव्हनचे टेम्परेचर २०० F वर ठेवावे आणि कांदा डार्क ब्राउन होईस्तोवर बेक करावा.

Step ३) बिर्याणी साठी लागणार भात शिजून घेऊया : भात (Rice)

१) बिर्याणीची तयारी करे पर्यंत बासमती तांदूळ पाण्यात धुवून निथळून घ्यावा. १५-२० मिनिटे निथळत ठेवावा.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टेस्पून तूप गरम करून त्यात १-२ लवंगा, १-२ वेलची आणि १ तमालपत्र घालून त्यांचा सुगंध येईस्तोवर परतावे. यात निथळलेळे तांदूळ घालावेत. मध्यम आचेवर तांदूळ कोरडे होईपर्यंत सतत परतावे. तांदूळ भाजतानाच दुसऱ्या गॅसवर दीड कप पाणी गरम करावे. तांदूळ चांगले परतले गेले कि त्यात गरम पाणी घालावे आणि गॅस मोठा ठेवावा. मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटेल आणि भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद होईल. या पॉइंटला आच एकदम कमी करावी आणि वर झाकण ठेवावे. ३) मंद आचेवर भात शिजू द्यावा. भात आपल्याला १००% शिजून नाही घ्यायचा आहे कारण आपण नंतर त्याला परत बिर्याणी मध्ये सुद्धा शिजवणार आहोत .
४) भात शिजला कि हलकेच एका परातीत काढून ठेवावा आणि हवेवर गार होवू द्यावा. लगेच वापरायचा असल्यास ३-४ मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवावा.

Step ४) व्हेज बिर्याणी (Veg Biryani Recipe in Marathi : व्हेज बिर्याणी रेसिपी)

१) व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो खोलगट नॉनस्टिक पातेले घ्यावा. शक्य नसल्यास तुम्ही कुकर पण वापरू शकता .तळाला आधी तूप पसरवून घ्यावे. त्यानंतर त्यावर एकूण भातापैकी १/४ भाग भात समान पसरवा. त्यावर तळलेल्या कांद्यापैकी थोडा कांदा, थोडे काजू आणि त्यावर थोडी ग्रेव्ही पसरावी. याच प्रकारे ३-४ थर बनवावे. २) प्रत्येक थरामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे चमचाभर तूप घातले तरी चालेल. सर्वात वरचा थर भाताचा असावा त्यावर दुधात कालवलेले केशर, काजू आणि तळलेला कांदा घालून भांड्यावर घट्ट झाकण ठेवावे. मंद आचेवर बिर्याणीला किमान २० मिनिटे तरी वाफ काढावी.
९) बिर्याणी तयार झाली कि गॅस बंद करून झाकण काढावे आणि हलकेच बिर्याणी मिक्स करावी. मिक्स करून थोडावेळ परत नुसतीच झाकून मुरू द्यावी.
१०) आता तयार झालेली गरमा गरम व्हेज बिर्याणी (Veg Biryani Recipe in Marathi ) काकडी-कांदा-टॉमेटोच्या रायत्याबरोबर खायला द्या .

व्हेज बिर्याणी (Veg Biryani Recipe in Marathi ) टीपा:

१) तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही कांदा तळून घेऊ नका .कांदा तळून घेण्यापेक्षा तो ओव्हनमध्ये कमी तेल वापरून छान कुरकुरीत होतो.
२) तुम्हाला ग्रेव्ही चवदार पाहिजे असेल तर टॉमेटोच्या ग्रेव्हीमध्ये १/४ कप हेवी क्रीम किंवा मिल्क पावडर घालू शकतो. क्रीम घातल्यास ग्रेव्हीला उकळी काढावी. आणि उकळताना क्रीम फुटू नये म्हणून सारखे ढवळावे.
३) त्तुम्ही बिर्याणी लव्हर असाल आणि तुम्हाला सारखी सारखी बिर्याणी बनवायची असेक तर हि ग्रेव्ही तयार करून ३-४ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो. म्हणजे हवी तेव्हा झटपट बिर्याणी तयार करता येते.
४) ग्रेव्हीमध्ये मिठाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. भातामध्ये मिक्स झाल्यावर मीठ अड्जस्ट होते. बिर्याणी तयार झाल्यावर मीठ घालून मिक्स केल्यास शीतं मोडतात.
५)व्हेज बिर्याणी ( Veg Biryani) बिर्याणीच्या थरांमध्ये चिरलेली पुदिना किंवा बारीक चिरलेली कोथम्बीर घातल्यास छान स्वाद येतो.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *