Vanraskhak Bharti 2023 : वन विभागात 9,640 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात

Vanraskhak Bharti 2023 : राज्यातील ९६४० हुन अधिक वन विभागातील रिक्त वनरक्षक ( Forest Guard )पदासाठी लवकरच जाहिरात निघणार आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असून, त्यांची लेखी व शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार. राज्यात लवकरच मेगा भरती होणार असून विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी हालचाली सुरु आहे. वनविभागातील वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु असून या किंवा पुढील महिन्यात जाहिरात निघेल असे वाटते.

वनरक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : वनरक्षक भरतीसाठी उमेदवार हा १८ वर्षांपेक्षा कमी नसावा व २५ वर्षांपेक्षा जास्त नसावा.

वनरक्षक वेतनश्रेणी :- रु.५२०० रु.२०२००, ग्रेड पे- रु.१८००

निवड प्रक्रिया : लेखी व शारीरिक चाचणी

ग्रामसेवक भरती १३ हजार जागा

पात्र असलेल्या उमेदवारांची १२० गुणांची सरळ सेवा लेखी परिक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये  ४ विषयांना गुण देण्यात येईल.
लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत पातळीची राहील.

वनरक्षक भरतीची शासकीय प्रक्रिया शेवटच्या टप्यात असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे वाटते .

Leave a Comment