उपमा रेसिपी : Upma Recipe in Marathi

उपमा रेसिपी : Upma Recipe in Marathi
आपण दररोज नाश्त्यासाठी काहीं न काही वेगळं आणि चविस्ट शोधत असतो. आज अशीच अगदी सोपी चविष्ट रेसिपी आज आपण बगणार आहोत. उपमा रेसिपी (Upma Recipe in Marathi).उपमा जितक्या सध्या पद्धतीने केला जातो तितका तो चविस्ट आणि चॅन बनतो.अगदी सोपी आणि कोणीही बनवू शकेल अशी चवीष्ट उपमा रेसिपी (Upma Recipe) आज आपण बनवणार आहोत.
चला तर मग बगूया चविष्ट उपमा रेसिपी कशी बनवायची?
साहित्य : Ingredients for Upma Recipe
- एक वाटी रवा
- ३ वाटी पाणी
- १ चमचा तूप (रवा भाजण्यासाठी )
- छोटी वाटी शेंगदाणे
- एक कांदा (बारीक चिरलेला)
- हिरवी मिरची ( तुमच्या चवीनुसार )
- ७-८ कढीपत्ता पाने
- २ टेस्पून तेल
- १/४ टिस्पून मोहोरी
- १/४ टिस्पून जीरे
- १/४ टिस्पून हिंग
कृती : How To Make Upma Recipe
1) उपमा रेसिपी (Upma Recipe) बनवण्यासाठी सगळ्यात आधी रवा भाजून घ्यायचाय.त्यासाठी गॅसवर एक पॅन किंवा कढईत ठेवा.आता त्यात एक चमचा तूप घाला मग त्यात रवा टाका आता रवा चांगला ७-८ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. (टीप: शिरा बनण्यासाठी भाजतो अगदी तसा लालसर रंग येई पर्यंत भाजायचा नाही.)
2) त्यानंतर रवा एका प्लेट मध्ये काढून घ्या.त्यात आता एक चमचा तेल घाला.ह्या तेलात आपल्याला शेंगदाणे तळून घ्या.
3) आता ह्याच तेलात आपण उपम्याची फोडणी घालून घेणार आहोत.त्यासाठी त्यात पहिले मोहरी घाला . मोहरी चांगली तडतडली कि त्यात जिरे,हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
4) आता त्यात हिरवी मिरची,कढीपत्ता घाला.कांदा खूप लालसर नाही करायचा मऊ झाला तरी चालेल. ७-८ मिनिटे कांदा परतून घ्यायचा.कांदा परतून झाला कि त्यात रवा घाला.
5) रवा चांगला एकजीव झाला कि त्यात गरम पाणी घालायचं .आपण एक कप रवा घेतला म्हणून २ कप गरम पाणी घाला. नंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घाला.
६) आता ह्याला चांगलं एकत्र करून घ्या. त्यावर झाकण ठेऊन साधारणपणे ७-८ मिनिटे होऊ द्या.
७) अशाप्रकारे अगदी सोपी आणि चविष्ट उपमा रेसिपी (upma recipe in marathi) तयार आहे.
८) आता छान कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे उपम्यात घालून गरमा गरम खायला घ्या.
0 Comments