Ukhane |उखाणे

Published by Uma on

1) चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप

……राव समवेत ओलांडते माप

2) सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खूण

….रावांचे नाव घेते…..ची सून

3) कामाची सुरुवात होते गणेशा पासून

…..रावांचे नाव घेण्यास सुरुवात केली आज पासून

4) कुंकवात कुंकू कुंकवात होता मोती

….रावांचे नाव घेते ते माझे पती अन मी त्यांची सौभाग्यवती

5)साजूक तुपात नाजूक चमचा

….रावांचे नाव घेते आशीर्वाद असू देत तुमचा

6)हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी

…रावाच नाव घेते …च्या लग्नाच्या दिवशी

7)रिमझीम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात

…रावाच नाव घेते असू द्या लक्षात

8) महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून

..रावांच नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान राखून

9)जेजुरीचा खंडोबा ,तुळजापूरची भवानी

….रावांची आहे मी अर्धांगिनी

10)पौर्निमेचा दिवस, चंद्राला लागते चाहूल

…..रावांच्या जीवनात टाकते मी पाहिले पाऊल

11) कृष्णनाने लिहिली भगवतगीता

….राव माझे राम, तर मी त्यांची सीता

12) विरह वाढवणार अंतरपाठ क्षणात झाला दूर

….आणि … च्या संसारात ऐकू येतील प्रेमाचे सूर

13) पती पत्नीचे नाते म्हणजे फुले अबोलीची

…च्या नावाला जोड मिळाली …रावांच्या नावाची

14) दारा पुढे काढली रांगोळी फुलांची

…चे नाव घेते ,नवी सून ….ची

15) नाव घे,नाव घे आग्रह कशाचा

…रावांचं नाव ओठात प्रश्न असतो उखण्याचा

16) शब्दावाचून कळले सारे शब्दाच्याही पलीकडले

….च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयला आले

17)….ची लाडकी लेक ,झाली …ची सून

…रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून

18)कळी उमलली खुदकन हसली,स्पर्श झाला वाऱ्याचा

…रावांच नाव घेते आशीर्वाद असू द्या सर्वांचा

19) नेत्राच्या निरंजनी ,अश्रूंच्या वाती

…साठी सोडली माझ्या माहेरची नाती

20) एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती

….राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती

21) विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने

…रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने

22) दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी

….रावांच्या जीवावर मी आहे आनंदी

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *