Udid Papad Recipe in Marathi – उडदाचे पापड

0
35
udid papad in marathi
Indian snacks, deep fried crackers or papad. Mung dal and urad dal papad an Indian fried dish, which is an side dish for lunch and dinner

उन्हाळा लागला कि आपण सगळे वाळवणाचे तयारीला लागतो, म्हणून आज आपण उडीद पापड ची रेसिपी Udid Papad Recipe in Marathi बगणार आहोत . उडीद पापड खायला खूप चविस्ट असतात , त्याच बरोबर ते करायला पण खूप सोपे असतात. कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळात हे पापड तयार होतात. चला तर बघूया उडीद पापड ची रेसिपी Udid Papad Recipe

साहित्य – Ingredients for Udid Papad Recipe:

  • एक किलो उडदाची डाळ,
  • ३० ग्रॅम पापडखार (भाजलेला)
  • ५० ग्रॅम पांढरे मिरे
  • २५ ग्रॅम हिंग
  • एक सपाट वाटी मीठ
  • पाव किलो ओल्या मिरच्या
  • पाव वाटी तेल
  • पापड लाटण्याकरता अंदाजे पाव किलो उडदाच्या डाळीचे पीठ निराळे द्यावे.

कृती – How to Make Udid Papad in Marathi :

1) मिरच्यांवर उकळते पाणी घालून, त्या उन्हात वाळत घालाव्या, म्हणजे त्यांना पांढरा रंग येईल.

2) उडदाची डाळ, मिरे, पापडखार, हिंग व वरील मिरच्या एकत्र करून दळावे.

3) घरी जात्यावर दळून घेतल्यास जास्त चांगले.

4) गिरणीतून दळून आणल्यास उडदाची डाळ दळून आणावी व बाकीचे साहित्य घरी कुटून बारीक पूड करावी.

5) पाण्यात मीठ घालून उकळावे व गाळून घ्यावे. त्या पाण्यात वरील तयार केलेले पीठ व तेल घालून भिजवावे व चांगले कुटावे.

6) नंतर लहान गोळ्या (लाट्या) करून, उडदाचीच पिठी लावून पापड लाटावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here