Tomato Soup Recipe in Marathi : टोमॅटो सूप रेसिपी

Published by Uma on

Tomato Soup Recipe

Tomato Soup Recipe : टोमॅटो सूप (tomato soup) हे पचायला हलकं आणि आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असत. हिवाळा असेल किंवा पावसाळ्यात थंडगार वातावरण असेल तर आपण घरी टोमॅटो सूप (tomato soup recipe) नक्की बनवतो.काही ठिकाणी टोमॅटो सुपला टोमॅटो सार (Tomato Saar) असही म्हणतात .टोमॅटो सूप बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत,आपण त्यामध्ये कांदा ,गाजर , भाज्या (Vegetables ) आणि भरपूर काही घालतो ,पण तरीही त्याला हॉटेल सारख्या टोमॅटो सूपची चव येत नाही .म्हणून आज मी तुम्हाला अगदी कमीत कमी सामग्रीत आणि कमीत कमी वेळात हॉटेल सारखं टोमॅटो सूप कस बनवायचं याची रेसिपी (tomato soup recipe in marathi) सांगणार आहे. चला तर मग सुरवाय करूया आपल्या साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या टोमॅटो सूप रेसिपीला tomato soup recipe.त्यासाठी लागणार साहित्य खालीलप्रमाणे आहे.

साहित्य : Ingredients for Tomato Soup Recipe in Marathi

  1. ४ टमाटर (Tomato)
  2. ३-४ चमचा बटर
  3. ३-४ लसूण पाकळ्या (बारीक करून )
  4. १ चमचा अद्रक (बारीक केलेली)
  5. मीठ चवीनुसार
  6. ४ चमचा साखर
  7. २ चमचा तांदळाचं पीठ
  8. २ मोठे (मध्यम आकाराचा) चमचा टोमॅटो सॉस
  9. ब्रेड

टोमॅटो सूप कृती : How to Make Tomato Soup

१) टोमॅटो सूप बनवण्यासाठी टोमॅटो बारीक कापून घ्यायचेत .टोमॅटो कापतानी त्याच देठ बाजूला कापून टाकायच .तुम्ही टोमॅटो कुठल्या पण आकारात कापू शकता .पण जर बारीक बारीक कापलेत तर त्याचा स्वाद छान येतो. पण टोमॅटो सूप ची रेसिपी (tomato soup recipe) बनवत असताना आपल्याला टोमॅटो मिक्सवर बारीक करून नाही घ्यायचे ,यामुळे त्याच्या बिया पण पिसल्या जातात आणि थोडी कडुसर चव येते .

२) टमाटर बारीक बारीक कापून झाल्यानंतर त्यांना कुकर मध्ये नाही शिजवायचे.आपण त्याला कढईत शिजून घेणार आहोत . त्यासाठी गॅसवर कढई ठेवा आणि गॅस मध्यम आचेवर राहू द्या .

३) कढई गरम झाली कि त्यात ३ चमचा बटर टाका. बटर वितळायला लागलं कि लगेच त्यात बारीक केलेला लसूण टाका.तुम्हाला जर लसूणचा स्वाद आवडत नसेल ,तर तुम्ही त्याला पर्यायी ठेऊ शकता त्यानंतर बारीक बारीक केलेली अद्रक घाला. बटर पूर्ण वितळायच्या आधी आपल्याला अद्रक आणि लसूण टाकायचं .मग बटर हळूहळू बुडबुडे यायला लागले कि त्यात बारीक कापलेले टमाटर घालायचे .

४) आता टमाटर चांगले शिजून घ्यायचे आहे.टमाटे शिजवताना त्यात चवीनुसार मीठ टाकायचे.टमाटर चांगले शिजून घ्यायचे टमाटर शिजायला ५ ते १० मिनिटे लागतात.त्यानंतर त्यात साखर घालायचीय आपण चार टमाटरचे सूप बनवतोय म्हणून चार छोटा चमचा साख्रर त्यात घालायचीय .टोमॅटो सूप(Tomato Soup) बनवंतांनी त्याच्या आंबट चवीसोबत त्याची गोड चव पण मस्त लागते .

५) साखर विरघळली कि त्यात टोमॅटो सॉस घाला.सर्व एकत्र करून घ्या.टोमॅटो सॉसमुळे आपल्या सूपला छान रंग येतो.आणि चव पण एकसारखी राहते .

६) आता आपण टोमॅटो शिजवत असताना पाणी टाकणार आहोत .४ मध्यम आकाराचे टोमॅटो सूप बनवत असताना आपल्याला त्यात साधारणपणे २ मोठे कप पाणी घालायचं.

७) पाणी टाकल्यानंतर सगळं एकत्र करून घ्या .आता थोडी तिखट चव येण्यासाठी त्यात थोडी मिरेपूड टाका.तुमच्याकडे खाण्याचा कलर असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता त्यामुळे त्याचा रंग अगदी हॉटेलच्या टोमॅटो सूप सारखा येईल.

८) आता आपलं टोमॅटो सूप तयार आहे. तयार टोमॅटो सूपला आपण गाळणीच्या साहाय्यानं गाळून घेणार आहोत.आता गाळणीने गाळलेल्या सूपला परत एकदा गॅसवर ठेवा आणि त्यात २ चमचा तांदळालाच पीठ घाला .

९) तांदळाचं पीठ घालत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे .तांदळाचं पीठ आधी एका छोट्या वाटीत काढून घ्या त्यात थोडं पाणी टाकून एकत्र करून घ्या .मग त्या नंतर ते हळू हळू सूप मध्ये घाला.नंतर सूपला एक उकळी आली कि गॅस बंद करा.

10) आता हॉटेल सारखं गरमागरम टोमॅटो सूप रेसिपी (Tomato Soup Recipe in Marathi) तयार आहे, तुम्ही भाजलेल्या ब्रेड सोबत सर्व्ह करू शकता.0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *