टोमॅटो ऑम्लेट रेसिपी मराठी । Tomato Omelette Recipe in Marathi

Published by Uma on

Tomato Omelette Recipe in Marathi

आज आपण अतिशय सोप्पी आणि उत्तम टोमॅटो ऑम्लेट रेसिपी मराठी (tomato omelette recipe in marathi) बगणार आहोत.टोमॅटो ऑम्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे.

टोमॅटो ऑम्लेट बनवण्यासाठी साहित्य :-

  • ३/४ वाटी डाळीचे पीठ
  • २ चमचा रवा (optional )
  • ३/४ वाटी  टोमॅटो बारीक चिरून
  • १/२ वाटी कांदा बारीक चिरून
  • १/२ चमचा आलं बारीक वाटून
  • १ चमचा मिरची पावडर किंवा २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • १/२ चमचा धने पावडर (optional )
  • १/२ चमचा जिरे पावडर (optional )
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चीमुठ्भर हळद
  • तेल
  • मीठ
  • सोडा

कृती :-

  • डाळीच्या पिठात कांदे, बेकिंग सोडा ,हळद ,मिरची पावडर ,तेल ,मीठ आणि टोमॅटो घालून सर्व मिक्स करून घ्यावे.
  • हे मिश्रण जास्त पातळ न करता मध्यम करावे.
  • तव्याला तेल लावून तवा गरम करून घ्यावे. तवा गरम झाला की गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
  • एक डावभर मिश्रण तव्यामध्ये घालावे .पाण्याचा हात घेऊन मिश्रण बोटांनी किंवा डावेनेच पसरवावे. कडेने तेल घालावे.
  • वरून झाकण ठेवावे .एक बाजू खरपूस झाली की कालथ्याने दुसरी बाजू पालटावी. दुसरी बाजू शिजू द्यावी.
  • टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर गरमा गरम सर्व करावे .तसेच टोमॅटो ऑम्लेट बरोबर स्लाईस ब्रेड सुध्दा छान लागतो.


1 Comment

Rhishikesh Gaikwad · May 4, 2021 at 6:54 am

Wow Superr!! looks absolutely amazing.. beautiful pictures too.. 🙂 thanks for sharing..

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *