मोबाईल विकत घेताय, मग आधी हे वाचा! : Tips to Remember While Buying Mobile

Published by Uma on

Tips to Remember While Buying Mobile

एकवेळ अन्नाशिवाय दिवसभर राहू, पण मोबाईलशिवाय तासभर घालवणंही कठीण! हे यंत्र न वापरणारे क्वचितच सापडतील, कारण फोन करण्यापलिकडे आता बॅंक, ऑफिस किंवा बिलाचे पैसे भरण्यासारखी कामेही मोबाईल चुटकीसरशी करु लागलाय. त्याचा जास्त वापर केल्याने, तो तिकक्याच लवकर खराबही होतो आणि मग, पुन्हा एकदा स्मार्ट फोन खरेदीचा कार्यक्रम समोर उभा ठाकतो. ही फोन खरेदी स्मार्टली व्हावी, यासाठी पुढील टिप्स लक्षपूर्वक वाचा!

मोबाईल विकत घेताय, मग आधी हे वाचा! : Tips to Remember While Buying Mobile

 1. हल्ली ३००० रुपयांपासूनचे मोबाईल्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे, साधारण बजेट ठरवले, की त्यापुढे इतर आवश्यक फिचर्सची यादी बनवता येते.
 2. फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीमचाही विचार करणे गरजेचे आहे. फोन सतत चार्ज करावा लागू नये. यासाठी दिर्घकाळ टिकणारी बॅटरी मोबाईलमध्ये हवी. ही गरज चांगली ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण करु शकेल.
 3. कार्डच्या मदतीने काही फोन्समध्ये १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येत असली, तरी काही अॅप्लिकेशन्स फक्त फोन मेमरीमध्येच सेव्ह होत असल्याने फोनची मुख्य मेमरी किमान ३ ते ४ जीबी असावी.
 4. फोन विकत घेतानाच रॅम व प्रोसेसरचा विचार करावा लागतो. कारण, एक्सटर्नल मेमरीप्रमाणे रॅम व प्रोसेसर नंतर वाढवता येत नाहीत. मुख्यत्वे, गेमिंग किंवा तत्सम अधिक जागा व्यापणा-या अॅप्लिकेशन्ससाठी रॅम व प्रोसेसर जास्त क्षमतेचे असणे गरजेचे आहेत.
 5. इंटरनेटच्या कुटुंबातून ३ जी हळूहळू बाद होत असून, त्याहून वेगवानसे ४ जी व ५ जी कनेक्ट होऊ शकतील, अशाच मोबाईलचा सध्या विचार करायला हवा.
 6. मोठ्या स्क्रीनच्या मोबाईन्सना सध्या पसंती मिळत असून, ६ इंचाच्या स्क्रीनला मोठी मागणी आहे. मोठ्या स्क्रिनवर फोटेज, व्हिडीओज देखील छान दिसतात. असा दुहेरी फायदा साधता येतो.
 7. जितका महागडा मोबाईल, तितका चांगला कॅमेराही त्याला असणार हे नक्की! पण, हल्ली काही कॅमेरा स्पेशल मोबाईलही उपलब्ध आहेत. ज्यामध्ये, इतर फिचर्सच्या तुलनेत मोबाईलला जास्त महत्त्व दिले आहे.
 8. विशिष्ट ब्रॅंड्सचे मोबाईल आवडत असल्यास त्यानुसार, मोबाईलची निवड करणे अधिक सोप्पे जाईल. शक्यतो नामांकित कंपन्याचा फोन खरेदी करण्यावर भर द्यावा. अशा कंपन्यांची वस्तू दुरुस्तीबाबतची सेवा फायदेशीर असते. फोनचा लूकही ट्रेंडी असतो.

नवाकोरा मोबाईल विकत घ्यायचा, तर असा गृहपाठ करुन जायलाच हवे. तरच, बजेटमध्ये बसणारा व आवश्यक ते सर्व फिचर्स असलेला मोबाईल विकत घेणे शक्य होईल. दुकानदार एखाद्या मोबाईलची खोटी स्तुती करीत तुमच्या गळ्यात मारणार नाही व वस्तूबाबत कुठलीही फसवणूक होणार नाही.

Buy a mobile, then read this first!

Once upon a time there was a day without food, but it is difficult to spend an hour without a mobile! Those who do not use these devices are seldom found, as they are now able to do bank, office or bill payments with a pinch of mobile, in addition to making phone calls. The more you use it, the sooner it goes bad and then, once again, the smart phone shopping program comes to the fore. To make this phone purchase smart, read the following tips.

 1. Mobiles starting from Rs 3,000 are available in the market nowadays. So, once the general budget is decided, a list of other essential features can be made.
 2. The operating system in the phone also needs to be considered. The phone should not be constantly charged. This requires a long lasting battery in the mobile. A good operating system can meet this need.
 3. With the help of the card, some phones can expand the memory up to 128 GB, but some applications only save in the phone memory, so the main memory of the phone should be at least 3 to 4 GB.
 4. RAM and processor have to be considered while buying a phone. This is because, like external memory, RAM and processors cannot be expanded later. Primarily, RAM and processors are required for gaming or similar applications that take up more space.
 5. 3G is slowly disappearing from the Internet family, and 4G and 5G can be connected faster than that.
 6. Larger screen mobiles are currently gaining popularity, with 6-inch screens in high demand. Footage, videos also look great on the big screen. Such a double benefit can be achieved.
 7. The more expensive the mobile, the better the camera! But, nowadays some camera special mobiles are also available. In which, mobile is given more importance than other features.

If you want to buy a new mobile phone, you have to do your homework. Only then, it will be possible to buy a mobile that fits in the budget and has all the necessary features. The shopkeeper will not hit you on the neck with a mobile phone and will not cheat you about the goods.

Accordingly, if you like mobiles of specific brands, it will be easier to choose a mobile. Emphasis should be placed on buying a phone from a reputed company if possible. The repair service of such companies is beneficial. The look of the phone is also trendy.

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *