वाचा, ब्रेकफास्ट न करण्याचे धोके!

Published by Uma on

Read on, the dangers of not having breakfast !

संपूर्ण दिवस सतत कामांची रेलचेल असते. न थांबता कार्यरत रहायचे असेल, तर शरीरात पुरेशी ऊर्जा हवी. नाहितर येणारी मरगळ, थकवा यामुळे कामात लक्ष लागत नाही. मुख्यत्वे नोकरी करणा-या स्त्रियांनी तर आवर्जून ब्रेकफास्ट करुनच घराबाहेर पडायला हवे. सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डबे तयार करायचे, मुलांना शाळेसाठी तयार करायचं, स्वत:चं आवारायचं, वर ऑफिस पर्यंतचा प्रवास तिथे पुन्हा दिवसभर काम करुन, घरी पोहोचल्यावरही उसंत नाही. रात्रीच्या जेवणाची कामगिरी पार पाडायची आहेच. हुश्श्श्….! पुरुषांच्या तुलनेत बाईच्या पदरी आलेली कामांची यादी नक्कीच मोठी आहे, नाही का?

वाचा, ब्रेकफास्ट न करण्याचे धोके !

1) तिने तर आहाराच्या वेळा अधिक कटाक्षाने पाळायला हव्यात. ब्रेकफास्टविना तिची सकाळ सरता कामा नये. राजासारखा ब्रेकफास्ट, गरिबासारखं दुपारचं जेवण त्याहून कमी रात्रीचं जेवण घ्यावं, असं म्हणतात ते सौ टक्के खरे आहे. फक्त ते प्रत्येकानं अमलात आणायला हवं.

2) कारण, ७ ते ८ तासाच्या झोपेनंतर शरीराला मुबलक उर्जेची गरज असते. वेळीच इंधन मिळाल्यास ते दिवसभर सुरळीत कार्य करु शकतं. तुम्ही म्हणाल, ब्रेकफास्ट न करता, थेट पोटभर दुपारचं जेवणच जेवतो, तर ही सवय वेळीच बदलायला हवी.

3) सकाळी काहीही न खाता, थेट दुपारी जेवल्याने अतिरिक्त जेवले जाते. जास्तीचं खाल्ल्याने साहजिकच लठ्ठपणा वाढतो. मधुमेहाचा धोका संभवतो. त्यातून ह्र्दयासंबंधीच्या तक्रारी डोके वर काढतात.

4) मेटॅबोलिझमची प्रक्रिया देखील बिघडते. मुळात, वेळेवर न खाल्ल्याने शरीराला गरजेच्यावेळी आवश्यक तितकी ऊर्जा मिळत नाही. यामुळे, हळूहळू शरीर कमकुवत होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागते. कमी झालेल्या ह्याच रोगप्रतिकारशक्तीमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

5) नाश्ता न करण्याचा एक सर्वसाधारण परिणाम तुम्हीही अनुभवला असेल, तो म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच जाणवणारी डोकेदुखी.

6) साखरेची पातळी कमी झाल्याने ही समस्या त्रास देते आणि दिवसाची सुरुवातच दुखण्याने झाल्यावर पुढचा संपूर्ण दिवस हसतमुख रहाणे कसे शक्या होईल?  मग, चिडचिड, डोळ्यांवर येणारा ताण, शरीराला येणारे जडत्व, थकवा, अशक्तपणा, निरुत्साही मन, या ना अशा अनेक जाणिवांनी आपण ग्रासले जातो.

7) यातून, घरकामाचा कंटाळा, तर नोकरीचा वीट येण्यापर्यंतच्या भावना उफाळून येतात. यासा-या नकारात्मकतेला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचे नसेल. तर, वेळीच दिवसाची प्रसन्न सुरुवात करण्यावर भर द्या. अगदी भरपेट बेदम नाश्ता करा.

8) मैत्रिणींनो, मुख्यत्वे तुम्ही नव-याला आणि मुलांना आग्रहानं खाऊ घालताना स्वत:ही मनापासून खा, टाळाटाळ न करता. पटतंय ना? मग, उद्याच्या ब्रेकफास्टला काहितरी मस्त, चविष्ट, हेल्दी डिश बनवाच!

Read on, the dangers of not having breakfast !

There is a constant trainload of work throughout the day. If you want to work non-stop, your body needs enough energy. Otherwise, there is no attention at work due to fatigue. Most of the working women should have breakfast and go out of the house. I used to get up early in the morning and prepare everyone’s coaches, prepare the children for school, take care of myself, travel to the upper office, work there all day again, even when I reach home, it is not good.

1) She should follow the diet times more carefully. She should not go out in the morning without breakfast. It is one hundred percent true to say that breakfast like a king, lunch like a poor man should have less dinner. Only everyone should implement it.

2) Because, after 7 to 8 hours of sleep, the body needs abundant energy. If you get fuel on time, it can work smoothly throughout the day. You say, if you eat lunch without having breakfast, then this habit should be changed in time.

3) Extra meals are eaten directly in the afternoon without eating anything in the morning. Eating too much can lead to obesity. There is a risk of diabetes. From that, heart related complaints come to the fore.

4) The process of metabolism also deteriorates. Basically, not eating on time does not give the body the energy it needs. As a result, the body gradually weakens and the immune system begins to grow. This same weakened immune system invites many diseases.

5) One of the most common side effects of not eating breakfast is the headache you feel at the beginning of the day.

6) This problem is caused due to low sugar level and how can it be possible to be smiling for the whole day after the beginning of the day due to pain? Then, we are overwhelmed by the perceptions of irritability, eye strain, inertia, fatigue, weakness, depressed mind, and so on.

7) This leads to boredom of housework and feelings of disgust with the job. You don’t want to give place to such negativity in your life. So, focus on starting the day on time. Have a hearty breakfast.

8) Friends, mainly when you are urging the newcomers and children to eat, eat yourself wholeheartedly, without hesitation. Pattanya right? Then, make something cool, tasty, healthy dish for tomorrow’s breakfast!

Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *