शिवाजी महाराज मराठी भाषण : Speech on Shivaji Maharaj in Marathi

Published by Uma on

Speech on Shivaji Maharaj in Marathi

शिवाजी महाराज मराठी भाषण : आज आपण त्या महान व्यक्तीबद्दल बोलणार आहो ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांचा माहिती आहे,पण कधी त्याच्या विषयी भाषण करायला लावले तर आपल्या तोंडातून शब्दच फुटत नाही त्यासाठी आज खास शिवाजी महाराज मराठी भाषण(Speech on Shivaji Maharaj in Marathi) तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. असे भाषण कराल तर लोक तुमचं कौतुक केल्या शिवाय राहणार नाही.

शिवाजी महाराज मराठी भाषण : Speech on Shivaji Maharaj in Marathi

• मित्रही साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कतृत्ववान विरपुत्र मिळाला. ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्यान, धाडसाने आणि जिद्दीने नव्हत्याच होत आणि होत्याच नव्हत करुन मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला.त्यावेळी अनेक परकिय सत्ता या महाराष्ट्रात धुमाकुळ माजवत होत्या. मुघलाच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतक-याचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली : अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी १६३० रोजी

शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजाला..

ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला…!!!

• शिवनेरीवर जन्म झाला म्हणून त्यांचे नाव शिवबा ठेण्यात आले.ते शहाजी राजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते.लहान वयात असतानी जिजाऊंनी त्यांना उत्तम शिक्षण दिले.त्यांना रामाच्या,कृष्णाच्या कथा सांगत होत्या.आणि याचाच परिणाम लहान वयात असतानाच त्याच्यात एक स्वाभाविक,नैसर्गिक नेतृत्वाची गुणवत्ता दिसायला लागली होती.

• शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षांपासुन अंधारात चाचपडणा-या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16 व्या वर्षापासुन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे साहसी धाडस केले व ते पूर्णत्वासही नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, मावळ या सारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

• त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहका-यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे, शिवा काशिद, मुरारबाजी, येसाजी, नेताजी यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाही.

• शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवराया नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतक-याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असे म्हणत शेतक-यावर जिवापाड प्रेम करणारे व पर स्त्रीला आई समान मानणारे शिवाजी

• शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे.

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते,

जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटूंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा

फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता.

• शिवाजी महाराज हे एक सर्वगुणसंपन्न असे व्यक्ती होते. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकटे आली तर डगमगुन न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहका-यांच्या मदतीने बल्याढ शत्रुंशी लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माहवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याया विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता जगात एक होता. अशा या थोर महापुरुषाचा जयजयकार तर झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की….जय …

तुम्हाला शिवाजी महाराजांवरील हे भाषण (Speech on Shivaji Maharaj in Marathi) कस वाटलं आम्हाला नक्की कळवा.

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *