छत्रपती शिवाजी महाराज माहिती : Shivaji Maharaj Information in Marathi

Published by Uma on

Shivaji Maharaj Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज माहिती : Shivaji Maharaj Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज असे नाव जरी कानी आले तरी आपली छाती गर्वाने फुलून येते.ज्या राज्याच्या जन्मानं त्याच्या शूर पराक्रमान स्वराज्य निर्माण झालं.एक नवा इतिहास उदयास आला. ३५० वर्षानंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Information in Marathi).अशा महान राजाची वीरगाथा आज आपण जाणून घेऊया.

छत्रपती शिवाजी महाराज माहिती : Shivaji Maharaj Information in Marathi

•  शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी (फाल्गुन वद्य तृतीया शक १५५१) झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते. त्यांच्या वडीलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते.

शिवबा जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांना अनेक सवंगडीदेखील मिळाले. ते त्यांच्याशी खेळण्यात रममाण होत असे त्यांना मर्दानी खेळ खेळ व्यास खूप आवडत असे.

• जिजामाता शिवबांना रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगत व ते त्या अतिशय लक्षपूर्वक ऐकत असे. शिवबा कधी-कधी खेळताना मातीचे किल्ले करण्यात खूप गढून जात असे ते त्यावर मातीची केलेली चित्रे ठेवून लढाईचा देखावा निर्माण करीत.

अशा प्रकारे शिवबा लहानाच मोठे होते होते. जिजामाता शिवबांना काही गोष्टी समजावून सांगत आणि म्हणत शिवबा, आपल्या राज्यात खूप शत्रु आहेत ते आपल्या लोकांवर अन्याय करून त्यांना खूप त्रास देतात .त्यांच्यावर अत्याचार करतात आपला महाराष्ट्र त्यांच्या अत्याचारामुळे रडतो आहे म्हणून तू त्या शत्रूंना रडव आणि आपल्या प्रजेला हसव माझी तुझ्याकडून ऐवढीचे अपेक्षा आहे आणि ती तू पूर्ण कर” जिजामातेच्या गोष्टींचा शिवबांच्या मनावर परिणाम झाला होता.

•  शूर माणसे रडत नाहीत तर ती शत्रूला रडवतात हे त्यांच्या लक्षात आले होते. शिवबा लहानाचे मोठे झाले. इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाचा ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजी महाराजांनी पुरंदर व. कोंढाणा (सिंहगड) हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

याशिवाय त्यांनी तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले आदिलशाही इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे हे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरुद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे.

त्याला घडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजी महाराजांनी रायरी किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला. आदिलशहाचा ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारीय असलेल्या अफजलखान नावाच्या सरदाराने उचलला मोठ्या सैन्यासह आणि लवा जम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला.

अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले होते.

तसेच सोबत बिचवा व वाघनखे ठेवली. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टे बाज होता.

प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंच पुऱ्या बलदंड अफझलखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले. त्याचवेळी अफझलखानने कट्यारीचा वार छत्रपती शिवाजी महाराजांवर केला परंतू चिलखतामुळे शिवाजी महाराज बचावले.

अफझलखानचा दगा पाहूने शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली खानाचा सहकारी सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याचा वार किला जो तत्पर महाराजांचा विश्वासू सरदार जिवा महालाने स्वतःवर झेलला. आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचले यामुळेच ” होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी दोरोजी नावाच्या सरदारला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूर पर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजी पालकर यांनी त्यांच्या सैन्यासह विजापूरापर्यंत धडक मारली.

औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतू साठी दख्खनच्या मोहिमेवर पाठविले प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौज फाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक गावात त्याने दहशत पसरवीत.

शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजी महाराजांच्या लाल महालातच तळ ठोकला शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा.

एके रात्री महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह महाराज हे स्वत: लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहित असल्यामुळे लवकर प्रत्यक्ष शिवाजी महाराज हे शाहिस्तेखानाच्या खोलीत शिरले महालात कोठेतरी झटपट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानाला जाग आली.

शिवाजी महाराजांना समोर पाहुन खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून उडी मारली. शिवाजीराजांनी चपकाईने केलेला वार हुकल्यामुळे शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली.

इ.स. १६६४ ची सततची युद्धे आणि यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर छ. शिवाजी महाराजांनी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे सुरतेची लुट ! लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे.

सुरतेची लूट ही पूर्णपणे शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. चर्च मारीदी यांसारख्या देवस्थानांनाही लूटीतून संरक्षण दिले गेले.

इ.स. १६६५ मध्ये औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्जा राजे जयसिंह याला प्रचंड सैन्यांसह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि तहाच्या अटी नुसार 23 किल्ले द्यावे लागले.

त्याचबरोबर स्वतः आग्रा येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले. इ.स. १९६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी व विजापूरच्या केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहचले.त्यांच्या सोबत ९ वर्षाचा संभाजीदेखील होता.

परंतू दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारखा रोजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांची रवानगी लवकरच मिर्झाराजे जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे करण्यात आली. (आग्रा येथे करण्यात आली.)

शिवाजी महाराजांवर कडक पहारा ठेवण्यात आला काही दिवस निघून गेले सुटकेसाठी सर्व प्रयत्न फोल ठरत होते. शेवटी शिवाजी महाराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडलाचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पाहत पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली.

या गोष्टीचा फायदा घेऊन शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटायामध्ये बसून निसटल्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये म्हणून शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशी पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करित होता.

शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला आग्रा येथ शिवाजी महाराजांनी वेषांतर करून स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसन्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला.

शिवाजी महाराज परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहान दिलेले सर्व 23 किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. याच कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले.

६ जून इ.स. १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन सुरू केिले. या शिवाय नवी कालगणना सुरु होऊन नवा शक सुरु झाला ३ एप्रिल १६८० रोजी या शूर, पराक्रमी, रयतेचा राजाचे निधन झाले.

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *