Shankarpali Recipe in Marathi : खुसखुशीत शंकरपाळी

Published by Uma on

Shankarpali Recipe in Marathi

Shankarpali Recipe in Marathi :अगदी झटपट सँक्स म्हणून बनवता येणारी गोड डिश कुठली असेल ती म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी !! जिभेवर रेंगाळणारी हलकी गोड चव असते आणि वेलचीचा स्वाद, यामुळे जो आस्वाद येतो न त्यामुळे वाटीभर खाल्ले तरी समाधान होत नाही,आपलं पोट भरत पण मन भरत नाही.

दिवाळीच्या फराळात तर शंकरपाळीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे कारण महाराष्ट्रीयन कुटुंबात दिवाळीच्या सणाला फराळ म्हणून शंकरपाळी हमखास बनवली जाते. त्याशिवाय दिवाळीच फराळ पूर्ण होत नाही . शंकरपाळी संपूर्ण वर्षभर कधीही करुन खाता येणारा कुरकुरीत व स्वादिष्ट पदार्थ आहे . सणालाच नाही तर अगदी सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत खाण्यासाठी हा बेस्ट व टेस्टी पर्याय आहे. पण शंकरपाळी खाण्यात तेव्हा मज्या येते किंवा असं म्हणता येईल त्याचा खरा आस्वाद तेव्हा येतो जेव्हा ते कुरकुरीत आणि मऊ असतील .

आपण नेहमी विचार करतो बाहेरून आणलेली शंकरपाळी कुरकुरीत व मऊ कशी लागतात व आपल्याला घरी तशी का नाही बनवता येत .तर याच प्रश्नाच उत्तर आज तुम्हाला भेटणार आहे .अगदी बाहेरून आणलेल्या शंकरपाळ्यासारखी आज आपण बनवणार आहोत.

आज मी तुम्हाला खास कुरकुरीत Shankarpali Recipe in Marathi सांगणार आहे .तर चला सुरवात करूया आपल्या आजच्या खास रेसिपीला कुशीकुशींत शंकरपाळी.

साहित्य : Ingredient For Sankarpali Recipe in Marathi

Ingredient For Sankarpali Recipe

  • भिजेल तेवढा मैदा (साधारण ३ वाटी)
  • १ वाटी दूध
  • १ वाटी साखर
  • पाव वाटी तूप
  • चिमूटभर मीठ

कृती : How To Make Shankarpali

१) आता आपण शंकरपाळी करायला घेऊया .त्यासाठी सगळ्यात आधी दूध व साखर गॅस वर गरम करून चांगली विरघळून घ्या व त्याला थंड करून घ्या.

२) हेय मिश्रण चांगले थंड झाले कि त्यात साहित्यात घेतल्या प्रमाणे तूप घाला .हे मिश्रण एकत्र करून घ्या .

३) आता ज्या मध्ये शंकरपाळी साठी पीठ मळणार आहोत त्या भांड्यात हे मिश्रण घाला ,आणि त्यात हळूहळू लागेल तसा मैदा घाला .

४) शंकरपाळी साठी पीठ मलतानी पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल पण नाही मळायच, मऊ असं पीठ मळून घ्यायचं . त्याचा एक मऊसर गोळा बनून घ्या.

५) आता पिठाचा एक गोळा घेऊन त्याची माध्यम आकाराची म्हणजे जास्त जाड नाही आणि जास्त पतली नाही अशी पोळी लाटून घ्या .आणि तुम्हाला हव्या त्या आकाराची शंकरपाळी बनून घ्या .

६) तुम्ही सर्व शंकरपाळी तयार करे पर्यंत गॅस वर शंकरपाळी तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवा .

७) तेल गरम झाले कि गॅस छोट्या आचेवर करून शंकरपाळी तळून घ्या .

८) शंकरपाळ्या गोल्डन-ब्राऊन रंग येईपर्यंत तेलात चांगल्या तळून घ्या. अशा पद्धतीने तयार झाल्यात आपल्या कुरकुरीत व स्वादिष्ट शंकरपाळ्या! या शंकरपाळ्यांचा तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा चहासोबत आस्वाद घेऊ शकता. पाहुणे आल्यानंतर नास्ता म्हणून बाहेरील बिस्कीट देण्यापेक्षा आपण घरी बनवलेली कुरकुरीत शंकपाळी देऊ शकतो.

टिप्स : Tips For Shankarpali Recipe in Marathi

१) जर तुम्ही शंकरपाळी दूध मध्ये बनवायला घेत असाल तर ते जास्त दिवस टिकत नाही , आणि तुम्ही पाणी वापरून करत असाल तर ते जास्त दिवस टिकतात .

२) दुध आणि तूप एकत्र केल्यास काहीवेळा फाटते. म्हणून साखर आणि दुध गरम करून थंड करून घ्यावे आणि त्यात नंतर तुपाचे मोहन घालावे . व नंतर हे मिश्रण मैद्यामध्ये घालावे .

३) तूप घालून शंकरपाळी बनवत असाल तर पीठ मळून झाल्या बरोबर करायला घ्यायचे. आपण ते पीठ थोड्या वेळ ठेवलं कि पीठ घट्ट होते .

४) पूर्ण शंकरपाळी करून झाल्यावर त्यांना चांगले थंड झाल्याशिवाय हवा बंद डब्यात भरू नका .

४) याउलट जर तुम्ही पाणी घालून शंकरपाळी करत असाल तर थोडा तेलाचा हात लावून पीठ सारखं करून अर्धा ते एक तास झाकून बाजूला ठेऊन द्यायचं.

५) शंकरपाळीची पोळी लाटताना पोळी फार पातळ नाही लाटायची त्यामुळे शंकरपाळी कडक होतात, थोडी जाडसर पोळी लाटायची त्यामुळे ते छान कुरकुरीत (Khuskhushit Shankarpali)होतात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *