Samosa Recipe in Marathi – खुशखुशीत समोसा रेसिपी

Published by Uma on

Samosa Recipe in Marathi

samosa recipe in marathi : समोसा (samosa) हा लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांच्या आवडीचा फास्ट फूड आहे .त्याचा कुशीकुशींत पणा त्यात घातलेलं सारण याची मज्जाच वेगळी असते . शाळा कॉलेज ला असताना सगळ्यात जास्त कॅन्टीन मध्ये खाल्लेलं फास्ट फूड कुठलं असेल तर ते म्हणजे समोसा (samosa) . समोसा आणि सोबत चहा याची जोडी असेल तर मग याचा थाटाचं वेगळा असतो.

पण आपल्याला सगळ्यांना असं वाटत कि समोसा हा इंडियाज फर्स्ट फास्ट फूड आहे पण मुळात समोसा का कुठून आला हे आपल्याला माहिती नाहीय.खर तर समोसा हा इराण मधून आलाय.साधरणपणे तेराव्या शतकात इराणमधल्या आचाऱ्यांनी समोसा तयार (Samosa Recipe)केला असावा. इराणमध्ये समोशाला सम्सा किंवा सेनबोगास असे म्हटले जाते. पण भारतात आपण त्याला समोसा असं म्हणतो.

समोसा हा दिल्लीत मुघलांचे राज्य असताना भारतात आला आणि सगळ्यांच्या चवीत बसला. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्याला बनवायला लागले .आज आपण बगतो भारताच्या प्रत्येक प्रातांत अगदी खेड्यातील चहा टपरी पासून ते शहरातील दुकानापर्यंत समोसा हा प्रकार मिळतो. नास्ता पासून ते सणासमारंभाला तो तयार केला जातो.

जगातील निरनिराळ्या  भागांतून प्रवास करत तिथल्या खाद्य संस्कृतीप्रमाणे हा स्वतःला बदलत गेला. आता तर याला वर्ल्ड  क्विझिन मध्ये अव्वल स्थान आहे. आणि आज खऱ्या अर्थाने समोसा हा इंडियाज फर्स्ट फास्ट फूड आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपण अशीच खुशखुशीत समोसा रेसिपी – Samosa Recipe in Marathi बगणार आहोत .समोसा कसा बनवायचा मी आज स्टेप बाय स्टेप (How to Make samosa Step By Step) सांगणार आहे चला तर आपण बगूया त्याला लागणार साहित्य व कृती.

साहित्य : Ingredients for Samosa Recipe in Marathi

साहित्य : Samosa Recipe

 • समोसा ची पारी सााठी
 • 2 वाटी मैदा
 • 1 टी स्पून ओवा
 • 2 टेबलस्पून तेल
 • चवीनुसार मीठ
 • समोसा ची भाजी साठी
 • 1 किलो आलू
 • 1/2 वाटी मटर (फ्रोझन)
 • 1 टेबलस्पून तिखट
 • 1 टेबलस्पून गोडा मसाला
 • 1/2 टेबलस्पून जिरे पावडर
 • 1 टी स्पून जिर
 • 1/2 टेबलस्पून धने पावडर
 • 1 टी स्पून हिंग
 • 4,5 हिरवी मिरची
 • 15,16 कडीपत्ता
 • 1 टेबलस्पून तेल
 • चवीनुसार मीठ
 • 1 टी स्पून साखर
 • तळण्याकरता तेल

कृती : How to Make samosa Recipe Step By Step

१) आपण सर्व प्रथम समोस्याचे बाहेरील आवरण आधी बनवु या.

२) आवरण बनण्याच्या आधी बटाटे शिजायला टाकायचे म्हणजे पीठ तयार होई पर्यंत बटाटे शिजले जातात .आपल्याला आधी पीठ मळून घ्यावं लागेल . आता मैद्यामध्ये ओवा व मीठ टाकून मिक्स करून घ्या व आता त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकुन चांगले मळून घ्या आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून घट्ट गोळा तयार करा व साईडला ठेवा तोपर्यंत आपण समोसे ची भाजी बनवून घेऊ.

३) बटाटे उकडले कि त्याचे साल काढून घ्या व त्याला मॅश करून घ्या . आता बटाटे मॅश करून झाले कि भाजी बनण्याआधी त्याला लागणारे सर्व मसाले एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे जेणेकरून भाजी बनवताना घाईत ते जळणार .

४) तयारी झाली कि मग एका कढईत एक टेबलस्पून तेल गरम करा व त्यात जिरे व हिंग टाका थोडे तडतडले की त्यात हिरवी मिरची व कढीपत्ता टाका व थोडे होऊ द्या आता त्यात हे बटाने टाका व थोडे होऊ द्या व आता कढईत आलू टाका व सुके मसाले तिखट मसाला जिरे पावडर धने पावडर व मीठ टाका चांगले मिक्स करा व दोन-तीन मिनिटे झाकून ठेवा.

५) मग त्यावर कोथिंबीर टाकून मिक्स करा व गॅस बंद करा थंड होऊ द्या.आपल्याकडे सामोसा रेसिपीसाठी (Samosa Recipe in Marathi ) लागणारी भाजी तयार आहे .

६) भाजी तयार झालीय .समोसा बनवण्यासाठी भिजवलेला गोळा घ्या व त्याचे सारख्या आकारात गोळे करून ठेवा .त्या गोल लाटून घ्या मधातून काप करा आता एक काप घेऊन त्याचे साईड समोसे सारखे जोडून घ्या व त्यात थोडा आलुचा मसाला भरा व साईडला पाणी लावून चांगले बंद करून घ्या असे सर्व समोसे तयार करून घ्या.

७) आपल्याला तयार झालेले समोसे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी आता एका कढईत तळण्याकरता तेल गरम करा पण तेल जास्त गरम होऊ देऊ नका व छोट्या गॅसवर समोसे टाका जर वाटलं तरच मिडीयम ठेवा हळूहळू समोसे वर येतील तपकिरी रंगाचे होई पर्यंत तळा अशे गरमागरम समोसे चटणी किंवा तळलेल्या मिरच्या सोबत खायला द्या.

८) जर नुसता समोसा तुम्हाला खायला आवडत नसेल तर तुम्ही दही शेव चिंचेची गोड चटणी कांदा टाकून आपण दही समोसा पण करू शकतो.

Tips : टिप्स Samosa Recipe in Marathi

१) समोसे तळण्याआधी ते १० मिनिटे न झाकता हवेवर कोरडे होऊ द्यावेत जेणेकरून तळताना त्यावर हवेचे बुडबुडे येणार नाहीत.

२) पीठ मळून ठेवल्या नंतर ३० मिनिटे झाकून ठेवा. म्हणजे मैद्याचा गोळा थोडा नरम होतो.

३) खुसखुशीत समोश्याच्या आवरणासाठी मैदा आणि तूप यांचे प्रमाण ५:१ इतके घ्यावे. जर तुम्हाला समोसे कुरकरीत आवडत असतील तर तुपाच्याच प्रमाणात हलके गरम तेल घालावे . समोसे अगदी कुरकुरीत होतात.

खुशखुशीत समोसा रेसिपी – Samosa Recipe in Marathi । How to Make samosa Step By Step


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *