Sambar Recipe in Marathi : सांबर रेसिपी मराठी

Published by Uma on

सांबर रेसिपी: sambar recipe

Sambar Recipe in Marathi : सांबर हा साऊथ इंडियन पदार्थ आहे.तो आपण इडली, डोसा,अप्पे,उत्तप्पा यांच्या सोबत खात असतो.आपण जेव्हा हॉटेल मध्ये जातो तेव्हा आपण इटली ,डोसा घेतो त्याबरोबर येणार चमचमीत सांबर आपल्याला खूप आवडत . त्या सांबर ची रेसिपी (sambar recipe) आपण घरी बनून बगतो,पण हॉटेल सारखी चवदार बनत नाही.

आज आपण साऊथ इंडियन ( idli sambar Marathi recipe south Indian style) पद्धतीने घरच्या घरी सांबर रेसिपी बनवणार आहोत . चला तर सुरवात करूया आपल्या खास सांबर रेसिपीला (Marathi sambar recipe).सांबरला लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहेत.

साहित्य : Ingredients of Sambar

 • १/२ कप तूर डाळ
 • २ टोमॅटो
 • १ गाजर (बारीक तुकडे करून )
 • १ कप दुधी भोपळा
 • १ शेवग्याची शेंग (बारीक तुकडे करून )
 • १ बटाटा
 • २ लहान वांगी
 • १ कांदा (बारीक चिरून )
 • १ टेबलस्पून लाल तिखट
 • १ टेबलस्पून सांबर मसाला
 • चिमूटभर हिंग
 • चिंच
 • तेल फोडणीसाठी
 • ७-८ कढीपत्ता पाने
 • १ टेबलस्पून हळद
 • १ टेबलस्पून गूळ
 • ४ टेबलस्पून ओले खोबरे
 • २-३ लाल सुक्या मिरच्या

सांबर बनवण्याची कृती : How To Make Sambar Recipe

१) सांबर रेसिपी (sambar recipe) बनवण्यासाठी सगळ्यात पहिले डाळ शिजून घ्यायची आहे.त्यासाठी १/२ कप तूरडाळ स्वछ धुऊन घ्यायची त्यानंतर त्यात २ टोमॅटो बारीक चिरून त्यात टाकायचे व डाळ कुकर मध्ये ४,५ शिट्या करून शिजून घ्यायची.

२) आता आपल्याला चिंचेचे पाणी बनवायचे आहे . त्यासाठी चिंच गरम पाण्यात १५ मिनिटे भिजत घालायची व त्याचे आता आपल्याला घट्ट पाणी बनून घ्यायचे .पाणी बनून झाले कि आता आपल्याला खोबऱ्याचे दूध बनवायचे आहे. मिक्सर भांड्यात साहित्यात घेतल्याप्रमाणे खोबरे घेऊन त्यात पाव कप बानी ओतून बारीक वाटून घ्या त्यानंतर त्याला गाळणीने घालून घ्या.

३) आता सांबरसाठी एक पॅनमध्ये तुमच्या आवडीनुसार ३-४ चमचा तेल टाका.त्यात मोहरी,हिंग,कढीपत्ता,सुकी मिरची ,कांदा टाकावा.कांदा चांगला परतून झाला कि त्यात हळद,सांबर मसाला,लाल मिरची व मीठ टाका.

४) याना चांगले एकत्र करून घ्या.मग त्यात आपण कापलेल्या भाज्या शेवग्याच्या शेंगा ,गाजर ,दुधी भोपळा ,बटाटा टाकून चांगले २,३ मिनिटे परतावे. व झाकण ठेऊन ७-८ मिनिटे शिजू द्या.

५) आता झाकण काढून त्यात शिजवलेले डाळ टाका .त्यानंतर त्यात नारळाचं दूध ,चिंचेचे पाणी,गूळ टाकावा.आता त्यात अर्धा लिटर गरम पाणी टाका.व सांबर १५ मिनिटे मद्यम आचेवर उकळून घ्या.

६) अशाप्रकारे आपली सांबर रेसिपी (sambar recipe in marathi) तयार आहे.

तुम्हाला हि अतिशय सोपी सांबर रेसिपी (sambar recipe in marathi) कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

तुम्हाला आवडेल इतर मराठी रेसिपी


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *