salad recipe in marathi
salad recipe in marathi

सलाड रेसिपी (salad recipe in marathi) : थोडं हेल्दी आणि खूप टेस्टी असं सलाड आज आपण बनवणार आहोत. आगळी वेगळी सलाड रेसिपी आज आपण करणार आहोत,ज्यात आपण आंबा वापरणार आहोत .आंबा लहान मुलांना खूप आवडतो त्यामुळे ते सुद्धा हे सलाड आवडीने खातील.म्हणून तुम्ही आता आंब्याच्या मोसम मध्ये हे आंबा सलाड रेसिपी नक्की एकदा करून बघा.

सलाड रेसिपी : salad recipe in marathi

साहित्य :

  • १ आंबा ( कैरी )
  • १ काकडी
  • १ टी स्पून मस्टर्ड सॉस
  • १०-१२ बारीक चिरलेली पुदिन्याची पाने
  • पाव कप व्हिनेगर किंवा लिंबाचा रस
  • २ टेबल स्पून साखर
  • पाव टी स्पून काळे तीळ
  • रेड चिली फ्लेक्स
  • चिमूटभर मीठ

कृती :

१) काकडी आणि आंबा धुउन त्याचे तुकडे करा.

२) मिश्रणासाठी एका भांड्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस ,साखर ,मीठ ,रेड चिली फ्लेक्स,बारीक चिरलेली पुदिन्याची पाने,मस्टर्ड सॉस या सर्व गोष्टी एकत्र करा.

३) साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा. एका मोठ्या बाऊलमध्ये आंबा आणि काकडीचे तुकडे घ्या.

४) मिश्रण एकजीव करा.त्यामुळे आंबा आणि काकडीच्या तुकड्याने बनवलेले मिश्रण व्यवस्थित लागेल.

५) वरून काळ्या तिळांनी सजवा आणि सर्व्ह करा. हे सलाड तुम्ही लगेच खाऊ शकता किंवा काहीवेळ फ्रिजमध्ये ठेऊन नंतरसुद्धा खाऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here