श्रावण विशेष साबुदाणा पुरी रेसिपी : Sabudana Puri Recipe in Marathi

Published by Uma on

आज आम्ही खास श्रावण स्पेशल साबुदाणा पुरी रेसिपी (Sabudana Puri Recipe in Marathi) तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी या श्रावणात उपवासाला साबुदाणा खिचडी न् बनवता हि खास श्रावण विशेष साबुदाणा पुरी रेसिपी बनून बघा.आम्हाला खात्री आहे की,ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल .चला तर सुरु करूया आपली आजची खास रेसिपी (Sabudana Puri Recipe) साबुदाणा पुरी.

साहित्य ( Sabudana Puri Recipe Ingredients ) :

 • २ उकडलेले बटाटे
 • १/२ कप साबुदाणा
 • ७ ते ८ मिरच्या
 • १/४ कप कोथिंबीर
 • १/२ टि. जिरे
 • ३ टि. शेंगदाणा कूट
 • १ टि. जिरेपूड
 • १ ते २ टि. शिंगाडा पीठ
 • मीठ
 • तेल

पाककृती : How To Make Sabudana Puri Recipe in Marathi

 1. १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा, त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे.
 2. मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे व थोडे मीठ घालावे व पाणी न मिसळता हे मिश्रण बारीक करुन घ्यावे.
 3. शिजलेले बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यामध्ये मिरची कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाण्याचा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड व शिंगाडा पीठ मिसळून सर्व मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे. आवश्यक वाटल्यास त्यात थोडे मीठ घालावे.
 4. आता, तेल तापवत ठेवावे व तयार पिठाचे लहान लहान गोळे करुन घ्यावेत.
 5. प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाचा हात लावावा व त्यावर पिठाचे लहान गोळे जाडसर थापून घ्यावेत. त्यावर मध्याभागी बोटाने भोक पाडावे.
 6. ह्या पु-या पातळ थापल्यास, तेलात टाकल्यावर तुटतात.
 7. पुरी तेलात टाकल्यावर झटकन पलटू नये, असे केल्यानेही पुरी तुटण्याची शक्यता असते. म्हणून, पूरी झा-याने अलगद तेलात बुडवावी. छान तपकिरी रंगाची होईस्तोपर पुरी तळून घ्यावी.
 8. तयार झालेली गरमागरम साबुदाणा पुरी ( Sabudana Puri Recipe ) चटणीसोबत सर्व्ह करावी.

कशी वाटली आजची उपवास स्पेशल रेसिपी? नक्की कळवा व लवकराच लवकर साबुदाणा पुरी करुनही पाहा!!


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *