Rava Besan Ladoo Recipe in Marathi – रवा बेसनाचे लाडू

0
19

Rava Besan Ladoo Recipe in Marathi अशा प्रकारे बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसनाचे लाडू. सण सभारंभ असेल तर प्रत्येक घरात आवर्जून गोड पदार्थ बनवण्यात येतो,मग ती कुठली मिठाई असो किंवा लाडू असो त्यात लाडू सगळ्यांचे आवडीची असता.म्हणून आज आपण चटकन बनणारे ,जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसनाचे लाडू कशे बनवायचे ( How to Make Rava Besan Ladu with Tips ) ते ते बगणार आहोत त्याच बरोबर

साहित्य ( Ingredients for Rava Besan Ladoo Recipe in Marathi )

Rava Besan Ladoo Recipe बनवण्यासाठी आपण साहित्य कपच्या मेजरमेंटनि (मापणी ) घेणार आहोत .रवा बेसनाचे लाडू(Rava Besan Ladoo Recipe) बनवण्यासाठी साहित्य पुढीलप्रमाणे आहे .

१) एक मोठा कप बारीक रवा (तुम्ही मापासाठी घरातील मोठी वाटी वापरू शकता ).

२) एक कप साखर (दोन्ही पण सारख्याच प्रमाणात घ्यायचे आहेत ).

३) अर्धा कप बेसन (रव्याच्या अर्ध्याप्रमाणात ).

४) अर्धा कप तूप (साखरच्या अर्ध्याप्रमाणात ).

५) सुका मेवा (आवडीप्रमाणे

६) वेलची पूड (आवडीनुसार )

Rava Besan Ladoo Recipe in Marathi |How to Make Rava Besan Ladu with Tips – जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसनाचे लाडू

कृती ( How To Make Besan Rava Ladoo Recipe in Marathi ) :

step 1) सर्वप्रथम गॅसवर एक भांड ठेवा त्या भांड्यात आपण जे तूप साहित्या मध्ये घेतलय त्यातून दोन चमचे तूप त्यात घाला आता तूप चांगले गरम होऊ द्या.मग त्यात आता रवा घाला रवा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे . रवा ७-८ मिनिटे भाजून त्याचा चांगला सुवास यायला लागला कि रवा भांड्यातून एका मोठ्या प्लेट मध्ये काढून घ्या नंतर त्याच प्लेट मध्ये आपल्याला लाडू करायचे आहेत (रवा जास्त भाजायचा नाही,नाहीतर त्याची चव कडवट लागते ) .

step २) आता आपण रवा ज्या भांड्यात भाजून घेतलाय त्याच भांड्यात उरलेलं तूप घाला आणि त्या तुपात आता बेसन घाला बेसन घालतानी गॅसची आच मध्यम ठेवा .बेसन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे .बेसनाचा रंग बदलायला लागला कि त्यात आता रवा घाला आणि चांगला एकत्र करून घ्या .

step ३) त्या मिश्रणात तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घाला .आणि ते बेसन ,रवा चे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घ्या .

step ४) त्यानंतर लाडू (Ladoo) बनवण्यासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे.पाक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गॅसवर ठेवा त्यानंतर साहित्यामध्ये घेतलेली एक कप साखर त्यात घाला आता त्यामध्ये पाणी आपल्याला बरोबर अंदाजाने घालायचं आहे .कपाणी आपण साखरेचं माप घेतलेलं होत त्याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी साखरेत पाक बनवण्यासाठी घालायचं आहे .त्यानंतर आपल्याला साखर चांगली विरघळून घ्यायची आहे साखर चांगली विरघळळी कि अजून ५ ते ६ मिनिटे होऊ द्यायचा . पाक तयार झाला कि नाही हे बगण्यासाठी एका चमच्याने त्याची consistency चेक करायची त्यासाठी एक चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने पाक चमच्यावर घ्यायचा आणि त्यातून जर पाकचे थेंब खाली पडत असतील तर आपला पाक अजून तयार नाही झाला .एकतारी होई पर्यंत आपल्याला पाक बनून घ्यायचा आहे. ५ मिनिटे झाले कि परत चेक करून पाहायचाय कारण कुठल्या पण रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo) असो वा कुठले पण लाडू असो त्यात पाकची भूमिका फार महत्त्वाची असते कारण जर पाक बनवतानी आपण चुकीच्या पद्धतीने बनवला तर लाडू बिघडण्याची शक्यता असते.किंवा एक तर लाडू सैल होतात म्हणजे ते वळल्या जात नाही ,नाहीतर खूपच घट्ट होतात .म्हणून पाक चांगला होणं खूप गरजेचं आहे .

step ५) आता आपला पाक झाला तयार झाला कि त्यात वेलची पूड घालायची ती नीट एकत्र करून घ्यायची आणि तो पाक आता आपण रवा बेसन लाडू मिश्रण ज्या प्लेट मध्ये काढून घेतलय त्यात हा पाक घालायचा पाक घेतल्या नंतर ते मिश्रण चांगलं एकत्र करायचं आणि अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं कारण याचे लगेच लाडू नाही वळता येत अर्धा तास झाला कि बगायचं पाक मुरलाय का ते आणि मुरला असेल तर लगेच लाडू वळून घ्या .अश्याप्रकारे आपले रवा बेसन लाडू ((Rava Besan Ladoo)तयार आहेत.

टीप : जर तुमचा पाक हा नीट नाही झाला आणि मिश्रणात एकत्र केल्यानंतर पण मुरत नसेल आणि लाडू वळल्या जात नसेल तर तुम्ही ते मिश्रण ३,४ मिनिटे पुन्हा गॅस वर ठेवा.किंवा तुमचा पाक खूप घट्ट झाला तर अगदी १ किंवा २ चमचे साखर घालून थोडासा पाक बनून घ्या आणि त्यात घाला म्हणजे लाडू घट्ट नाही होणार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here