रायगड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती । Raigad Fort Information in Marathi | रायगड किल्ल्याचा इतिहास

Published by Uma on

Raigad Fort Information in Marathi

रायगड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती (Raigad Fort Information in Marathi) : आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांपैकी एक अतिशय महत्त्वाचे स्थळ म्हणजे रायगड किल्ला (Raigad Fort).जो शिवाजी महाराजांच्या प्रतापाची साक्ष देत उभा आहे.मराठी साम्राज्याच्या इतिहासात रायगड किल्ल्याची एक खास ओळख आहे.आज आपण रायगड किल्ल्याबद्दल माहिती (Raigad Fort Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

रायगड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती : Raigad Fort Information in Marathi

रायगड किल्ल्याचा इतिहास :

‘रायगड किल्ला’ हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्यद्रीच्या पर्वतरांगेत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजे २७०० फूट उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्याचे स्थान आणि महत्त्व पाहून सतराव्या शतकात आपल्या राज्याची राजधानी करून घेतली. शिवराज्यभिषेक सुद्धा ह्याच ठिकाणी झाला. निजामशाही मध्ये रायगड किल्ल्याचा उपयोग कैदी ठेण्यासाठी करण्यात येत होता.अनेक परकीय सत्ता इथे राज्य करून गेल्या,कारण १२ व्या शतकापासून हा किल्ला आहे.सर्वप्रथम १२ व्या शतकात हा किल्ला यादवकालीन होता.यादवा नंतर आदिलशाही कडे गेला.नंतर १६ व्या शतकात हा किल्ला शिवाजी महाराजांकडे आला.रायगड किल्ला हा चहुबाजूनी डोंगरांगानी वेढलेला आहे.याच्या पूर्वेला आणि उत्तरेला नदीचे खोरे पसरलेले आहे.

रायगड किल्ल्याची स्थापना १०३० मध्ये झाली.त्यावेळी हा किल्ला जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या कडे होता.त्यावेळचे त्याचे नाव ‘रायरी’ होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ह्या डोंगराकडे पहिले ,तेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेची सर नसणारा पण त्याच ताकदीने डौलाने उभा असलेला रायरी आपल्या साम्राज्यात सामील करून घ्यायची त्यांची जिद्द होती.म्हणून त्यांनी जावळीच्या चंद्रराव मोरे याना पत्र लिहिले,कि आपण दोघे मिळून स्वराज्य उभे करू पण त्यांनी नकार दिला .त्यांनतर शिवाजी महाराजांनी १५४ सैनिकांना घेऊन किल्ल्यावर हल्ला केला.आणि रायरीचा डोंगर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला.

रायरी,इस्लामगड,नंदादीप,जंबुद्विप,तणस,राशिवटा,बदेनूर,रायगिरी,राजगिरी,भिवगड,रेड्डी,शिवलंका,राहीर,पूर्वेकडील जिब्राल्टर अशा १४ नावाने रायगड किल्ल्याला पूर्वी ओळखलं जायचं .५०० वर्षांपूर्वी याला गडाचे स्वरूप नव्हते.तो नुसता एक डोंगर होता.रायगड किल्याचे संपूर्ण बांधकाम ‘हिरोजी इंदलकर’ यांनी केले.असा रायगड किल्ल्यावरील एका पायरीवर उल्लेखहि सापडतो .यांनीच किल्ल्यावर ३०० इमारती ,११ तलाव आणि ८४ पाण्याच्या टाक्या बांधल्या .१४ वर्ष ह्या गडाचे काम चालू राहिले .आणि ६ जून १६७४ या दिनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकासाठी हा किल्ला सज्ज झाला.शिवाजी महाराज असेपर्यंत हा किल्ला अंजिक्य राहिला .पुढे १६८९ मध्ये औरंगजेबाणे तर १७०७ मध्ये पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला,परंतु १८०८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने आलेल्या इंग्रजांनी घेतला.परंतु १९४७ च्या तह नंतर हि वस्तू पुन्हा महाराष्ट्राकडे आली आणि आजही महाराष्ट्राची साक्ष देत हा किल्ला मानाने उभा आहे.

रायगड किल्ल्यावर जाणारे मार्ग :

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.एक रोपवे आणि दुसरा म्हणजे ‘चित्त दरवाजा’ रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी ‘चित्त दरवाजा’ हा एकमेव मार्ग होता.रोपवेने गडावर जाण्यासाठी ५-१० मिनिटाचा कालावधी लागतो. रायगड किल्ला चढण्यासाठी १५००-१६०० पायऱ्या चढाव्या लागतात.चित्त दरवाज्यापासून एक मार्ग नाणे दरवाजा तर दुसरा मजीद मोर्चा या पॉंईंटला जातो.

रायगड किल्ल्यावरील प्रवास :

ज्या लोकांना रायगडावर जाता येत नाही किंवा फिरत येत नाही.ज्यांना रायगडाचा इतिहास माहिती नाहीय त्यांच्यासाठी रायगड किल्याचा हा एक खास प्रवास आहे.किंवा रायगड किल्ल्याचा इतिहास आहे.रायगड किल्ल्याच्या पूर्ण प्रवास बद्दल आपण माहिती बगणार आहोत.किल्ल्यावर बगण्यासाठी काय काय आहे. तशेच राजे असताना असलेल्या सगळ्या गोष्टीचा आठावा आपण घेणार आहोत.चला तर सुरु करूया रायगड किल्ल्याचा अविस्मरणीय प्रवास.

नाणे दरवाजा मजीद मोर्चा :

रायगड किल्ल्यावर जात असताना आपल्याला दोन मार्ग लागतात त्यात पहिला म्हणजे नाणे दरवाजा आणि दुसरा म्हणजे मजीद मोर्चा.पहिल्यांदा आपल्याला नाणे दरवाजाचा भक्कम बुरुज दिसतो.त्यावर सुंदर असं नक्षी काम केले आहे. त्यानंतर पुढे मारुती मंदिर आहे. त्यापासून थोडे पुढे आले कि आपल्याला दगड तासून बनवलेली पाण्याची टाकी पाहायला मिळते.त्यानंतर मजीद मोर्च्याकडे आल्यावर तिथे एक तोप पाहायला भेटते.किल्ल्यावर असणारी हि मजीद शिवाजी महाराजांनी कधीही जाती भेद केला नाही याची आजही जाणीव करून देते.

रायगड महाद्वार :

मजीद मोर्च्याकडून पुढे महा दरवाज्याकडे मार्ग जातो.हिंदी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे मावळे आणि राज्यांच्या संरक्षणासाठी बनवलेली तटबंदी पाहून मन भाराहून जाते .महाद्वारापाशी उभे असलेले दोन बुरुज आजही किल्याच्या मजबूतीची साक्ष देत उभे आहेत. महाद्वाराची रचना हि अशा पद्धतीने केलेली आहे कि दुष्मनाने खालून गडावर दारूगोळ्याचा हल्ला केला तरी त्याला महाद्वार दिसू नये.महा दरवाज्यापासून काही पायऱ्या चढून आल्यावर उजव्या हाताला आपल्याला ‘हत्ती तलाव’ पाहायला मिळतो.तर डाव्या बाजूला हनुमान टाकी आहे. त्याच्या थोडे पुढेच शिरकाई देवीचे मंदिर लागते.मंदिराच्या समोर हत्तीखाना आहे .हत्तीखान्यामध्ये त्या वेळी गडावर असलेले हत्ती ठेवण्यात येत असत.

होळीचा माळ :

हत्तीखान्यासमोर होळीचा माळ आहे त्या काळी होळी खेळण्यासाठी याचा वापर होत असे. होळी पेटली कि महाराज येत आणि त्या होळीत नारळ टाकून आपल्या प्रजेच्या सुखासाठी प्रार्थना करत.त्यावेळी त्यांची एक अट असे कि जो कोणी त्यांनी होळीत टाकलेला जळता नारळ काढेल त्यांना ते आपल्या हातातील सव्वा किलो सोनाचे कडे बक्षिस म्हणून देण्यात देतील.फक्त शिव पुत्र संभाजी राजे यांनाच हा पराक्रम करता आला होता.होळीचा माळ समोर शिवाजी महाराजांची सिंहावर बसलेली सुंदर प्रतिमा आहे.

होळीच्या माळ पासून नागरखान्याकडे जाताना डावीकडे एक वळण जाते तिथे आपल्याला वाघ दरवाजा,कुरुषावत तलाव ,वाडेश्वर मंदिर,बारा टाकी हि चार ठिकाण पाहायला भेटतात.राजदरबारात प्रवेश करण्याआधी आपल्याला एक नगारखाना पाहण्यास मिळतो त्याकाळी इथे नगारे आणि चौघडे वाजवण्यात येत असत. वाजवताच गडावरील महाद्वार बंद करण्यात येई . त्यापुढे गेल्यास नागखान्यातून राजदरबारात प्रवेश करताच समोरच शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली दुसरी प्रतिमा पाहायला मिळते तीच हि जागा जिथे शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला होता.

टेहाळनी बुरुज & ‘हिरकणी बुरुज‘:

त्यापुढे जाताच एक ‘टेहाळनी बुरुज’ आहे.या बुरुजाला २१ खिडक्या आहेत .त्याकाळी शिवाजी महाराज शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर करत असे.त्यानंतर गडावर एक ‘खलबत खाना‘ आहे खलबत खाना एक खोली होती त्या वेळी गुप्त चर्चा करण्यासाठी हीचा वापर होत असे. त्याच्या जवळच शिवाजी महाराजांचे सचिवालय आहे जिथे त्या काळी न्याय निवड केला जायचा.त्या शेजारी राजाचा महल आहे जिथे शिवाजी महाराज राहायचे पण आता तिथे तो नाहीय. पुढे मेळा दरवाज्यातून खाली गेल्यावर ‘हिरकणी बुरुज‘ दिसतो.हिरकणीच्या धाडसी साहसाची कथा आपल्या सांगण्याचं माहिती आहे. आज हि ‘हिरकणी बुरुज‘ आईच्या प्रेमाची तिच्या धाडसाची साक्ष देत उभा आहे.

मेना दरवाज्यातून पुढे आल्यावर आपल्याला धान्याचे कोठार,ताशे अष्टप्रधान वाडा पाहायला मिळतो.गडावर असलेल्या धान्याच्या कोठाराची क्षमता एव्हडी होती कि शत्रू ४-५ महिने जरी गडाला वेढा घालून राहिला तरी गडावर असलेले तीन चार हजार लोकांना अन्नसाठा पुरेल.पालखी दरवाज्यातून पुढे गेल्यास ‘सप्त मनोरा ‘पाहायला मिळतो.सध्या त्याचे फक्त ढासाललेले अवशेष आहेत त्या काळी हे मनोरे ५ माळ्याचे असून याचा वापर शिवाजी कोणता नवीन किल्ला जिंकीन स्वराज्यात सामील केलाय हे लोकांना कळण्यासाठी होत असे.केला जिंकल्यानंतर ह्या मनोऱ्यावर झेंडा फडकवण्यात येई.

टक मक टोक :

किल्ल्यावर असलेल्या बाजारपेठेतून पुढे आल्यावर डाव्या बाजूला दारूखाना आणि टक मक टोक हे दोन स्थान पाहावयास मिळतात.टक मक टोकाचा एक इतिहास आहे त्या काळी इथे एक घंटा होती.ज्यावेळी शिवाजी महाराज जिजाऊ मातेला प्रणाम करण्यासाठी या ठिकाणी येई तेव्हा हि घंटा वाजवत घंटा वाजली कि पाचाडगावी असलेल्या राजमाता जिजाऊ झेंडा घेऊन बाहेर येत.त्यावेळी राजांसोबत त्याचा सेवक निजाम छत्री धरून असे.एके दिवशी राजे मुजरा करण्यासाठी आले तेव्हा जोराचे वारे सुटले होते .त्या वाऱ्याचा वेग इतका होता कि त्यांच्या सोबत असलेला निजाम छत्रीसोबतच त्या कड्यावरून उडाला त्याच वेळी राजे त्याला म्हणाले काहीही झाले तरी छत्रीचा दांडा सोडू नको.निजामाने तसे केलेही आणि वाऱ्याचा वेग कमी झाला तेव्हा निजाम याच छत्रीच्या साहाय्याने गडाखाली असलेल्या एका गावात उतरला.आणि याच गावाला आज छत्री निजामपूर म्हणून ओळखले जाते.

त्या टोकापासून पुढे जगदीश्वराच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला कोलिम्ब तलाव पाहायला मिळतो. जगदीश्वराच्या मंदिरात जात असताना मंदिराच्या पहिल्या पायरीवर “सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुळकर ” असे लिहिले आहे.ज्यांनी रायगड किल्ल्यासारखी भव्य इमारत साक्षात स्वर्ग उभारला होता त्यांचे हे नाव. मंदिराच्या पुढे भवानी कडा आहे.अगदी त्या कड्यासमोरच “पोटल्याचा डोंगर ” नजरेला दिसतो .हा तोच डोंगर जिथून इंग्रंजानी आणि काही फितूर माणसांनी मिळून रायगडावर तोफांचा मारा केला होता.आणि ११ दिवस रायगड जळत होता.किल्ल्यावरून परतीच्या प्रवासाला निघाल्या नंतर मनात फक्त एकच गोष्ट येते ती म्हणजे….

राजे पुन्हा जन्म घ्यावा ह्या ढासळलेल्या गडावरी
स्वर्ग तो पुन्हा अवतरावा आपल्या या रायगडावरी
भक्कम आहे अजूनही पाया आपुल्या या रायगडाचा
जिवंत आहे स्वर्ग भूतलावर सरदार हिरोजिंचा
जिवंत आहे तटबंदी अन बुरुज या रायगडाचा
वाट पाहत आहे सिंहासन तुमची राजे आशीर्वाद आहे जगदीश्वराचा

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *