लुसलुशीत पुरणपोळी रेसिपी- Puranpoli Recipe In Marathi । popular Maharastriyan recipe

पूरण पोळी (puranpoli recipe)ही गणेश चतुर्थी किंवा दिवाळी किंवा इतर कोणत्याही उत्सवाच्या वेळी बनविलेले एक लोकप्रिय (popular Maharastriyan recipe) महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. गणेश चतुर्थी उत्सवात मोदक, पूरण पोळी(puranpoli ) आणि नरियाल लाडू सामान्यत: महाराष्ट्रात बनवले जातात. तर आज आपण बगूया महाराष्ट्राची ( Maharastriyan recipe) पुरणपोळी कशी बनवायची?

पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य ( puranpoli Recipe Ingredients)

  • एक वाटी चना डाळ
  • एक वाटी साखर किंवा गूळ (आवडीनुसार)
  • एक चमचा तूप
  • अर्धा चमचा इलायची पावडर
  • गव्हाचं पीठ (अंदाजा नुसार)

पुरणपोळीसाठी  लागणारे भरण: ( puranpoli recipe stuffing)

Step १: सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवा.डाळ भिजवली तरी चालते आणि नाही भिजवली तरी चालते तुम्हाला डाळ भिजून घ्यायची असेल तर एका तासासाठी भिजवू शकता आणि नंतर त्यातलं पाणी गाळून घ्या.

Step 2. नंतर त्या चना डाळ ला प्रेशर कुकरमध्ये 5-6 ते शिट्ट्या होई पर्यंत शिजवा. डाळ पूर्णपणे शिजवण्याची गरज नाही सुमारे 85 ते 90% शिजवलेले ठीक आहे. एकदा डाळ शिजली कि ती गाळून घ्या. काही मिनिटांसाठी डाळ स्ट्रेनरमध्ये ठेवा म्हणजे सर्व पाण्याचा निचरा होईल आता हे डाळीतून निघालेलं पाणी तुम्ही कटाची आमटी (पातळ डाळ) तयार करण्यासाठी वापरु शकता किंवा वेजी डिशमध्ये किंवा रोटीमध्ये पण वापरू शकता.

Step 3.आता एका कढईत तूप गरम करा आणि त्यात कोरडे आले पूड, जायफळ पावडर, वेलची पूड आणि बडीशेप घाला आणि चांगले परतून घ्या .आता यात शिजलेली चणा डाळ साखर किंवा किसलेले गूळ घाला.आणि आता हे मिश्रण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या. अधून मधून त्याला हलवत राहा म्हणजे ते कढईला चिटकणार नाही.

Step 4.तोपर्यंत तुम्ही पुरणपोळीसाठी (puranpoli) गव्हाचे पीठ मळून घ्या पीठ मळतानी त्यात थोडे तूप किंवा तेल घालून मिक्स करावे.

Step 5. आता आपले पुरन थंड करून घ्या आणि पिठाला 10 मिनिटे झाकुन ठेवा म्हणजे पिठ नरम होत .

Step 6. आता तुम्ही ते थंड झालेलं पुरण मिक्सर मधून बारीक करून घ्या किंवा तुमच्या कडे ‘पूरण यंत्र’ असेल तर त्यात बारीक करून घ्या.

Step 7. आता आपल्या कडे पुरणपोळी च पुरन तयार आहे तर चला मग बगूया याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची

पुरणपोळी कशी बनवायची ?(how to make puranpoli recipe)

Step : 1 पुरणपोळी तयार होईपर्यंत तवा गरम करायला ठेवा. आता आपले पीठ छान मुरलाय आता त्यातून छोटा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा तो पुरींच्या आकारा इतका लाटून घ्यायचा आणि त्यात पुरनाचा गोळा ठेवायचा .

Step : 2 नंतर छान पैकी ते पुरन मध्ये झाकल्या जाईल असा गोळा बनवा आणि तो गोळा हलक्या हाताने हळू हळू लाटून घ्या जेणेकरून पोळी मधून पुरण बाहेर येणार नाही .

Step :3 तवा गरम झाला की त्यावर थोडं तूप घालून पोळी छान सोनेरी रंगाची झाली की दोन्ही बाजूने तूप लावून घ्या .आता आपली पुरणपोळी तयार आहे

तुम्ही पुरणपोळी दूध किंवा रस सोबत खाऊ शकता .

तर नक्की घरी बनवून बगा हि अतिशय चविष्ट (puranpoli recipe)पुरणपोळी.

Leave a Comment