पाव भाजी रेसिपी Mumbai Style Pav Bhaji Recipe In Marathi

0
48

Pav bhaji recipe in marathi | Mumbai style pav bhaji with tips –

पाव भाजी रेसिपी : मुंबईची पावभाजी म्हंटल तर आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पावभाजी पाककृती ( pav bhaji recipe in marathi ) हि महाराष्ट्रातीलंच नाही तर जगप्रसिद्ध डिश आहे आपण फास्ट फूडचा राजा पण पावभाजीला म्हणू शकतो.गरम तव्यावर लोण्यात घोळवलेल्या भाजीच्या सुगंधाने तर, पोट भरलेले असेल तरी परत भूक लागेल आणि पावभाजी खाण्याचा मोह आवरत नाही.

लॉकडाऊन च्या काळात आपण बाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवरची पावभाजी नाही खाऊ शकत, म्हणून मी तुम्हाला अतिशय सोपी मुंबईच्या पद्धतीने ( Mumbai style Pav bhaji) अशी पावभाजीची पाककृती (Pav bhaji recipe) सांगणार आहे.

साहित्य : Ingredients for Mumbai style pav bhaji

पावभाजी रेसिपी साहित्य खालीलप्रमाणे:

 1. 1 टेस्पून + 1 टेस्पून लोणी
 2. 3 टमाटर बारीक चिरून
 3. 1 वाटी वाटाणे / मटर
 4. ½ कॅप्सिकम ( शिमला), बारीक चिरून
 5. 2 बटाटा, उकडलेले आणि मॅश करून
 6. १ टीस्पून मीठ
 7. १ टीस्पून + ¼ टीस्पून कश्मिरी लाल तिखट / लाल मिरची पूड
 8. 1 टीस्पून हळद / हळदी
 9. १ टीस्पून + ½ टीस्पून पाव भाजी मसाला
 10. १ चमचा + १ चमचा कसुरी मेथी / कोरडी मेथीची पाने
 11. २ चमचे + १ टेस्पून धणे पाने( कोशमबीर), बारीक चिरून घ्यावी
 12. १ टीस्पून आले लसूण पेस्ट
 13. १ कांदा, बारीक चिरून
 14. ½ लिंबाचा रस
 15. 3 थेंब लाल फूड रंग, पर्यायी
 16. आवश्यकतेनुसार पाणी

पाव भाजीसाठी पाव भाजताना लागणारे साहित्य: 

 1. 8 पाव / ब्रेड रोल
 2. 4 टिस्पून लोणी
 3. 1 टीस्पून कश्मिरी लाल तिखट / लाल मिरची पूड
 4. ½ टिस्पून पाव भाजी मसाला
 5. 1 टीस्पून धणे पाने बारीक चिरून घ्यावी

पाव भाजी कशी बनवायची ?

 1. सर्वप्रथम, एका मोठ्या कढईत 1 टेस्पून बटर गरम करून त्यात सर्व भाज्या घाला. त्या चांगल्या शिजवून घ्या आणि नंतर मिक्सर मध्ये मॅश करा.
 2. आता चांगल्या मॅश झाल्या की कढईत बटर घाला गरम झालं की त्यात मॅश केलेल्या भाज्या घाला .
 3. आता त्यात १ टीस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, १ टीस्पून पाव भाजी मसाला, १ चमचा कसुरी मेथी आणि २ चमचे कोथिंबीर घालावी.
 4. १ टेस्पून धणे पाने, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ कांदा आणि ½ लिंबाचा रस घाला. चांगले परता.
 5. आता रेड फूड कलरचे 3 थेंब घाला आणि चांगले मिक्स करावे.
 6. आता आपली पावभाजी तयार आहे आता तुम्ही पॅन वर लोणी किंवा बटर लावून पावभाजून घ्या
 7. आता आपली पावभाजी रेसिपी तयार आहे .गरमागरम पावभाजी सर्व्ह करताना बारीक चिरलेला कांदा आणि कोथमबीर नक्की त्यावर टाका आणि मुंबई पद्धतीच्या पाव भाजी चा घरच्या घरी आनंद घ्याम

आणखी नवीन रेसिपी बघा : आमचीमराठी.कॉम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here