Pani Puri Recipe in Marathi – घरच्या घरी पाणी पुरी कशी बनवायची

Published by Uma on

Pani Puri Recipe in Marathi

Pani Puri Recipe in Marathi

नुसतं पाणी पुरी असा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यात आपल्या सगळ्यांना बाहेर बनणारी पाणी पुरी जास्त आवडते. पाणी पुरी रेसिपी खूप सोप्पी आहे. अगदी बाहेर मिळणाऱ्या पाणी पुरी सारखी चविस्ट, चटपटीत पाणी पुरी आपण घरी बनवू शकतो.अशीच चविष्ट घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची ? ते आज आपण बगणार आहोत Pani Puri Recipe in Marathi.

खूप वेळेस आपण पाणी पुरी रेसिपी Pani Puri Marathi Madhe बनवायचं ठरवतो, पण पाणी पुरी साठी लागणाऱ्या पुऱ्या बाजारातून विकत आणतो आणि पाणी घरी बनवतो. पण आज आपण तस करणार नाहीय.पाणी पुरी ची पुरी कशी बनवायची ते सुद्धा आपण आज बगणार आहोत.

साहित्य : Ingredients For Marathi Pani Puri Recipe

पाणी पुरीची पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • एक कप रवा (बारीक रवा) (टीप : रवा भाजून घ्यायचा नाही)
 • पाव कप मैदा
 • मीठ चवीनुसार
 • अर्धा कप पाणी
 • चिमूटभर सोडा
 • तेल (पुरी तळण्यासाठी)

पाणी पुरीचे पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • 1 वाटी कोथिंबीर
 • 1०-१५ पुदिना पाने
 • 4 हिरव्या मिरच्या
 • 1 इंच आले
 • १-२ लसूण पाकळ्या
 • 1/2 लिटर थंड पाणी
 • 1 टीस्पून जिरेपूड
 • 1 टीस्पून काळ मिठ
 • १ वाटी खारी बुंदी
 • १/२ चमचा चाट मसाला

पाणी पुरीचा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • ३-४ माध्यम आकाराचे शिजवलेले बटाटे
 • १ माध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून )
 • १ वाटी कोथिंबीर ( बारीक चिरून )
 • चाट मसाला
 • मीठ

कृती : घरच्या घरी पाणी पुरी कशी बनवायची

 1. पाणी पुरी बनवताना आपण सर्व प्रथम पाणी पुरी च्या पुऱ्या बनवणून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक कप रवा घेतलाय.रवा आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये.
 2. आता एक डिश घ्यायची त्या डिश मध्ये एक कप रवा घालायचा,त्यानंतर मैदा आपल्याला यात तेल किंवा तूप घालायचं नाहीये. त्यानंतर मीठ घालायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट असा गोळा बनून घ्यायचाय. तुम्ही तो गोळा मळून झाल्यावर तो मऊ असेल, पण जसा वेळ जाईल रव्यामुळे हा गोळा घट्ट होईल.
 3. तो गोळा ७-८ मिनिटे झाकुन ठेवायचा.त्यानंतर आपण पुरी बनवू शकतो.त्या गोळ्याचे अगदी छोटे छोटे गोळे बनून घ्यायचे.आणि त्याच्या पुऱ्या लाटायच्या. (टीप : सगळ्या पुऱ्या एकदा बनून मग नंतर नाही तळायच्या.खूप वेळ झाला कि पुऱ्या कोरड्या होतात व त्या फुगत नाही.)
 4. पुऱ्या लाटत असताना तेल गरम करायला ठेवायचं.तेल गरम झालं कि त्यात एक एक पुरी टाळून घ्यायची तळताना गॅसची आच मध्यम आकाराची ठेवायची. असं करून सगळ्या पुऱ्या टाळून घ्यायच्या.
 5. पाणी पुरीच पाणी: पाणी पुरीच पाणी बनवण्यासाठी आपण साहित्यात घेतल्याप्रमाणे 1 वाटी कोथिंबीर , 1०-१५ पुदिना पाने, 4 हिरव्या मिरच्या , 1 इंच आले ,१-२ लसूण पाकळ्या याना मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. आता हि चटणी एका मोठ्या भांडयात काढून घ्यायची.
 6. आता ह्यात १/२ लिटर पाणी घालायचं.आता ह्या पाण्यात चाट मसाला ,जिरे पूड ,काळ मीठ घालायचं. (टीप : चाट मसाला आणि काळे मीठ याला खारटपणा असतो म्हणून आपण पाणी पुरीच्या पाण्यात नेहमीचे मीठ घालायचे नाही )
 7. पाणी पुरीचा मसाला : पाणी पुरीचा मसाला बनण्यासाठी ३-४ बटाटे शिजून घ्यायचे. त्यानंतर त्यांना बारीक (मॅश ) करून घ्यायचे. आता त्यात बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर,काळे मीठ घालायचे व चांगले एकत्र करून घ्यायचे.
 8. अशाप्रकारे आपली चविष्ट पाणी पुरी तयार आहे .


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *