New Marathi SMS Messages | New Marathi SMS Collection | बेस्ट मराठी विचार

Published by Uma on

New Marathi SMS Messages

New Marathi SMS Messages : There is so much creativity in Marathi language that everyday there is new creation of Marathi SMS. We are presenting here good collection of New Marathi SMS for you . New Marathi SMS Collection of Life , love,attitude, kalji . If you are writing messages please post it in the comment.

New Marathi SMS Messages | New Marathi SMS Collection | बेस्ट मराठी विचार

शोधायचं असेल तर, तुमची “काळजी” करणाऱ्यांना शोधा
बाकी उपयोग करून घेणारे, तुम्हाला शोधत येतील…..

नातं तेच टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त
तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो

समजून सांगणारे भरपूर असतात पण वेळ आल्यावर समजून घेणारे खूप कमी असतात

पाण्यामुळे लोखंड गंजने, थंडीमुळे सर्दी होणे, वाऱ्यामुळे झाडाची पाने हालने आणि
मुलींमुळे मुले भिकारी होणे हा निसर्गाचा नियमच आहे.

प्रत्येकात दुसऱ्याला काही न काही तरी असतचं
दुःखं, त्रास, वेदना, प्रेम, आनंद, हसू
निवडायचं फक्त आपल्याला असतं… काय द्यायचं
बाकी फुले देणाऱ्या च्या हाताला सुंगध असतोच की

गोड मधं बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही. माणसाने नेहमीच सावधगिरी बाळगायला हवी कारण जास्त गोड बोलणारे पण इजा पोहचवु शकतात

गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की मग “पाण्याची चव” आणि “माणसाची नियत” दोन्ही बदलतात

प्रत्येक कणात देव असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?
खुप सुंदर उत्तर : वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो

एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं – आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी
आजोबा म्हणाले माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुल स्पर्धा नाही

हरून पण जिंकतो तोच बादशहा असतो…
जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की तो मरेपर्यंत लढू शकतो
कारण तो दाखवून देतो की आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका
नशीब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे.
लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो

छापा असो वा काटा असो नाणे खरे असावे लागते
प्रेम असो वा नसो भावना शुद्ध असाव्या लागतात
तोडू नयेत दुसऱ्याची मने झाडाच्या फांदीसारखी
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण माने मात्र कायमची तुटतात

साप घरी आला तर लोक त्याला काठीने ठेचून मारतात आणि तोच साप जर शिवलिंगावर दिसला तर त्याला हात जोडतात
लोक तुमचा सन्मान करत नाही तर तुमच्या पदाचा व तुमच्या परिस्थितीचा सन्मान करतात

शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही
पण जर पाण्याचे पुरात रूपांतर झाले तर
भले भले डोंगरही फोडून निघतात…

काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो, विचारात एक तेज असते
बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असतं आणि हृदयात असतो स्नेहाचा झरा
अशा माणसांना शुभेच्या देणे हे देणाऱ्यांसाठीच भाग्याचं असतं

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपतेची गरज नसते
नदीला वाहण्यासाठी कुठल्यारस्त्याची गरज नसते
जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात
त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते.

Marathi SMS New

आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात, आणि
प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही

देवाची मूर्ति विकत घेताना, रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ति घरात आली की देवाकडे कोटी मागतात.
खरंच अंधार असतो मनात आणि दीवा लावतात देवळात.

कोणतंही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही
कारण त्यांना पण माहित असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलंय, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलंय

पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते
मृत्यू पेक्षा “श्वासाला” जास्त किंमत असते
या जगात नाते तर सर्वच जोडतात पण
नात्यापेक्षा “विश्वासाला” जास्त किंमत असते

शब्दांनीच शिकवलंय पडता पडता सावरायला
शब्दांनीच शिकवलंय रडता रडता हसायला
शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ
शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा
शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि
शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल

कुणाची निंदा करणे हे ‘रोमिंग’ सारखे आहे. केली तरी ‘चार्ज’ लागतो, ऐकली तरी ‘चार्ज’
परोपकार करणे हे LIC सारखे आहे. “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी”
आपण मात्र नित्यनियमाने नामस्मरणाचा ‘प्रीमियम’ भरत रहावा. सदगुरुकृपेचा ‘बोनस’ अखंड मिळत जातो

नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखेच असतात ज्यांना बनवणं सोप असत पण टिकवण खूप अवघड असत.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय – “कायम शीतलता ठेवा !”

सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवतो
अपयश विनम्रता शिकवतो, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो
म्हणूनच विश्वास ठेवा आपल्या माणसावर आणि ध्येयावर

कुणावाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले
तरी कोण कधी उपयोगी पडेल हे ही सांगता येत नाही ….
डोके शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि
भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत …. !

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे …
परंतु पोपट दुसर्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो …
म्हणून स्वतःची मधुर भाषा, स्वतःचे चांगले विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा
खूप चांगले नाव कामवाल आणि मुक्त राहाल

Latest Marathi SMS

रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच जन असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो
नशीबवान सगळेच असतात, नशीबालाही बदलवणारा एखादाच असतो
जिंकणारे तर बरेच असतात, पण हरून जिंकणारा एखादाच असतो

मला एकाने विचारले की सर्वात महाग जागा कोणती?
मी म्हणालो जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा.
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं अवघड बनून जातं

पान जरी कोरं असलं तरी पानालाही भावना असतात
मन जरी वेडं असलं तरी मनालाही भावना असतात
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत, मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत
मन हे असच असतं, इकडून तिकडे बागडत असतं
मनाला काही बंधनं असतात, म्हणून तर स्पंदनं असतात

श्रद्धेने ज्ञान मिळते, नम्रतेने मन मिळतो, योग्यतेने स्थान मिळते
वरील तिन्ही गोष्टी एकत्रीत असल्यास त्या व्यक्तीला सन्मान मिळतो

आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरती ती फक्त “तडजोड”
कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही, आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही

नावासाठी काम करू नका. कामासाठी काम करा
जे कामासाठी काम करतात त्यांचाच नावलौकिक होतो
अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरूनच काम होते

जेव्हा चालता येत नव्हते तेव्हा पडू देत नव्हते लोक आणि जेव्हापासून स्वतःचा तोल सावरायला लागलोय,
तेव्हापासून पावला पावलांवर खाली पडायला टपून बसलेत लोक!
एक मात्र नक्की खरं आहे की, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातच !

स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणातच तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात

तहान नसताना पाण्याची बाटली गच्च भरलेली असेल तर तिची किंमत वाटत नाही पण सणकून घसा कोरडा पडला कि बाटलीच्या तळाशी शिल्लक राहिलेलं घोटभर पाणी देखील अमृतसमान मोलाचं वाटत.
माणसाचं पण असच असते जवळ असली की किंमत काळत नाही आणि दूर गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते

आपली नियत कितीही चांगली असली तरी ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते,
आणि आपला दिखावा कितीही चांगला असुद्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर
दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल

Fresh SMS Marathi

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा.
कारण जिथे विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनत जातं

चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो
मग संकट कितीही मोठ असुद्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो

लोकांचं कसं असत… जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात
आणि थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ फोडतात

आपली “नियत” कितीही चांगली असुद्या, ही दुनिया आपल्या “दिखाव्या” वरून आपली किंमत ठरवत असते
आणि आपला “दिखावा” कितीही चांगला असुद्या परमेश्वर आपली “नियत” ओळखून फळ देत असतो

New Marathi SMS Collection


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *