तुमच्या किचनमध्ये या ‘१०’ वस्तू आहेत का?

Published by Uma on

must-have-kitchen-tools

किचनमधील कामे उरकताना होणा-या धावपळीला तुम्हीही सामोरे जात असाल ना! स्वयंपाकात माणसांचा हातभार लागताच कमी वेळात भरभर जेवण तयार होते. तसेच, सोबत योग्य वस्तूही हाताशी हव्यात. त्यापैकी काही देतोय आजच्या ब्लॉगमध्ये…

1. किचनमध्ये भाजी निवडणे किवा कापणे सर्वात किचकट काम असते ,त्याच बरोबर जास्त वेळ सुद्धा लागतो. अशावेळी भाजी कापण्याचे काम झटपट करायचे असेल, तर अशी चार ब्लेडची कातर वापरायला हवी. कमीतकमी वेळात भाजी छान बारीक चिरता येईल.

2. सूप घरोघरी वरेचेवर बनतेच, ते सर्व्ह करताना सोबत ब्रेड किंवा इतर काही स्कॅन्सही दिले जाते. बर बऱ्याच वेळा आपण लहान मुलांना देतो तेव्हा डिशमधील बाऊल कलंडण्याची शक्यता असते. यासाठीच डिशलाच जोडलेले बाऊल हा छान पर्याय आहे.

3. आपण भाजीपाला असो किवा फळे ते कापण्यासाठी सूरीचा वापर करतो ,पण त्या पेक्षा ही उत्तम पर्याय हा चिमटा ठरू शकतो.टोमॅटो, कांदा किंवा फळे कापण्यासाठी अचूक वस्तू ठरणारा हा चिमटा प्रत्येक सुगरणीकडे हवाच. घाईगडबडीत काम करताना बोट कापण्याचा धोकाही यामध्ये उरत नाही.

4. आपल्या संगल्याना प्लॅस्टिक पिशव्या वापरायची सवय झालीय,पण त्या बंद झाल्या पासून खूप पंचायत होते. आणि आता पर्याय नाही म्हणून आपण कापडी पिशव्या वापरतो. प्लॅस्टिक पिशव्या वापरणे तुम्ही बंद केलेच असेल, तेव्हा दोन चार कापडी पिशव्यांचे बंद एकावेळी हातात व्यवस्थित पकडता यावे म्हणून ही उपयोगी वस्तू!

5. पॉपकॉर्न लवर्स असणाऱ्या लोकांसाठी ही पॉपकॉर्न बकेट नक्की तुमच्या किचन मध्ये समाविष्ट करा, ह्या बकटेमध्ये मक्याचे दाणे ठेवून, ते बंद करावे व मायक्रोव्हेवमध्ये ठेवावे. काही मिनिटांतच ते छान फुलतात.

6. बाहेरून माघवलेल्या पिझ्झा जेव्हा घरी येतो तेव्हा आपण त्याचे बरोबर स्लाइस मध्ये कट करतो पण कधी कधी ते विस्ककटले जातात ,त्यासाठी घरी बनवलेला पिझ्झा कट करण्यात घरातील लहान मुलंही तुम्हाला हसत खेळत मदत करतील, जर सायकल कटरची निवड केलीत.

7.  पराठा, स्टॅण्डविज, भजी, इडली, असे चटणीसोबत खाण्याचे कुठलेही पदार्थ असोत, ते खाताना सोयीस्कर जावं यासाठी, डिशला लावता येईल अशी सुंदरशी छोटी वाटी खवय्यांनाही आवडेल.

8. भाज्या किंवा फळभाज्या उकडविण्यासाठी फ्लेक्झिबल बास्केट वापरता येईल. यामुळे, उकडलेल्या पदार्थांतील पाणी व्यवस्थित निथळून जाते.

9. किचनमधील महत्त्वाची, तितकीच जपून वापरावी अशी वस्तू म्हणजे सुरी. पण कधी कधी ती हरवते आणि येण वेळी आपली फजिती होते त्यासाठी विविध आकाराच्या सु-या एकत्र व्यवस्थित ठेवाव्यात यासाठी वरील स्टॅंण्ड तर किचनमध्ये हवाच.

10. अंड फोडल्यावार त्यातील पिवळा बलक वेगळा काढायचा असेल, तर ही छोटीशी वस्तू वापरता येईल.

मैत्रिणींनो, कशी वाटली आजची हटके शॉपिंग? कळवा तुमच्या प्रतिक्रियांद्वारे, आम्ही वाट पाहातोय!

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *