मूग डाळ कचोरी रेसिपी : Moong Dal Kachori Recipe in Marathi & English

Published by Uma on

Moong Dal Kachori Recipe in Marathi & English

मूग डाळ कचोरी रेसिपी (Moong Dal Kachori Recipe in Marathi & English) : कचोरी खायला सर्वानाच खूप आवडते.आणि आपल्या सगळ्यांचा एक आवडता स्टॉल किवा कुक असतो,जिथे आपल्याला कुरकुरीत कचोरी मिळते,आणि ती आपल्याला प्रचंड आवडते.आज आम्ही तुमच्या सोबत अशीच हलवाई स्टाईल वाली मूग डाळची कुरकुरीत कचोरी रेसीपी (Moong Dal Kachori Recipe) शेअर करत आहोत.

Moong Dal Kachori Recipe in Marathi

साहित्य :

 • (सारण) १/२ कप मूग डाळ
 • १/२ टे.स्पू. तूप
 • १/४ टि.स्पू. हळद
 • १/२ टि.स्पू. लालतिखट
 • १/२ टि.स्पू. जिरेपूड
 • १/२ टि.स्पू. सुंठ पावडर
 • १ टि.स्पू. धणेपूड
 • १ टि.स्पू. बडीशेपपूड
 • १ टि.स्पू. आमचूर पावडर
 • मीठ

आवरण :

 • २ कप मैदा
 • १/२ कप पाणी
 • तूप किंवा तेल
 • मीठ
 • तेल तळण्यासाठी

पाककृती :

 1. प्रथम बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तूप व चवीनुसार मीठ घालावे.
 2. पीठ मळून घ्यावे. त्यानंतर, थोडे पाणी मिसळून पुन्हा पीठ मळून घ्यावे.
 3. पीठ फार घट्ट किंवा फार मऊ देखील मळू नये. आता हे पीठ ओलसर कापडाखाली झाकून ठेवावे.
 4. त्यांनतर, कचोरी आतील सारणाची तयारी करण्यास घ्यावी. दोन तास भिजवलेली मूगडाळ मिक्सरमध्ये हलकीशी बारीक करावी.
 5. आता, गरम पॅनमध्ये तूप घालून ते छान तापल्यावर त्यामध्ये हळद, लालतिखट, जिरेपूड, धणेपूड, बडीशेप पूड, आमचूर पावडर घालून सर्व जिन्नस छान परतून घ्यावीत.
 6. त्यानंतर, त्यामध्ये वाटलेली मूग डाळ, चवीला मीठ व थोडा हिंग घालून पुन्हा एकदा जिन्नस मंद आचेवर परतून घ्यावा.
 7. तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावेत आणि ओलसर कपड्याखाली झाकून ठेवलेल्या मिश्रणाची हातानाचे लहान पुरीतयार करुन त्यामध्ये सारणचा गोळी भरावी.
 8. आवरण नीट बंद करावे व हाताने हलकेच दाबावे.
 9. अशाप्रकारे, तयार झालेल्या कचोरी गरमागरम तेलात खुसखुशीत तळून घ्यावेत व आवडत्या चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.

Moong Dal Kachori Recipe in English

Moong Dal Kachori Recipe (Moong Dal Kachori Recipe in Marathi & English) : Everyone loves to eat kachori. And we all have a favorite stall or cook, where you get crispy kachori, and you love it immensely. We are sharing Moong Dal Kachori Recipe.

Ingredients of Kachori Recipe :

 • (Saran) 1/2 cup green dal
 • 1/2 tsp Ghee
 • 1/4 tsp. Turmeric
 • 1/2 tsp. Laltikhat
 • 1/2 tsp. Cumin powder
 • 1/2 tsp. Ginger powder
 • 1 tsp. Coriander powder
 • 1 tsp. Fennel powder
 • 1 tsp. Amchoor powder
 • Salt

The cover :

 • 2 cups flour
 • 1/2 cup water
 • Ghee or oil
 • Salt
 • To fry in oil

How to Make Kachori Recipe :

 1. First take flour in a bowl and add ghee and salt to taste.
 2. Knead the dough. After that, knead the dough again with a little water.
 3. The flour should not be too thick or too soft. Now cover the dough under a damp cloth.
 4. After that, the kachori should be prepared for the interior. Lightly grind the soaked groundnuts in a mixer for two hours.
 5. Now put ghee in a hot pan and heat it well. Add turmeric powder, red chilli powder, cumin powder, coriander powder, dill powder, amchoor powder and saute all the ingredients.
 6. After that, add chopped green dal, salt to taste and a little asafoetida and bring to a simmer.
 7. Make small balls of the prepared mixture and make small handfuls of the mixture under a damp cloth.
 8. Close the lid tightly and press lightly by hand.
 9. In this way, fry the prepared kachori in hot oil and serve with your favorite chutney.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *