मोदक रेसिपी : Modak Recipe in Marathi

Published by Uma on

Modak Recipe in Marathi

मोदक रेसिपी (Modak Recipe in Marathi) : गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर आपल्याला ओढ लागते ती मोदक खाण्याची. आई बाप्पाला नैवेद्य बनवणार आणि मग आपण सुद्धा मोदकावर ताव मारणार असं काहीस आपल्या मनात सुरु असत.तर आज आपण खास गणपती बाप्पांचे आवडते मोदक रेसिपी (Modak Recipe) बगणार आहोत.

साहित्य:- Ingredients Of Modak Recipe

 • 1 नारळ खवून
 • 1 वाटी चिरलेला गुळ अथवा 1 वाटीभर साखर
 • 4,5 वेलदोड्याची पूड
 • 1 वाटी गहू पीठ [कणीक]
 • चिमूटभर मीठ
 • 2 टेबलस्पून कडकडीत तेल
 • काजू काप
 • बदाम काप
 • बेदाणे
 • तळण्याकरता तेल

कृती :- How To Make Modak Recipe

 1. 1 खवलेले नारळ, साखर अथवा गुळ घालून सारण चिकट होईल असे शिजवून घ्यावे व वेलदोडा पूड घालून त्यामध्ये काजू काप, बदाम काप, बेदाणे घालून सारण मिक्स करून ठेवावे.
 2. कणीक मध्ये कडकडीत तेलाचे मोहन, मीठ घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.
 3. भिजवलेला कणीक हाताने चांगला मळून लाट्या कराव्यात.
 4. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी. हातावर घेऊन मुखऱ्या पाडून वाटी करावी. 1 चहाचा चमचा भरून सारण मध्ये भरावे व मोदकाचे तोंड बंद करावे.असे सर्व मोदक भरून घ्यावेत.
 5. कढईत मंद आचेवर सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.

टीप  :-

 1. हवे असल्यास सारणात केशर व 50 ग्रॅम खवा घालावा. मोदक छान लागतात.

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *