माझा भारत देश निबंध/भाषण । Maza Bharat Desh Essay in Marathi । अप्रतिम निबंध व भाषणासाठी उपयुक्त

Published by Uma on

Maza Bharat Desh Essay in Marathi

maza bharat desh essay in marathi :

माझा भारत देश निबंध : शाळेत असताना आपण सगळ्यांनी निबंध लिहिलेले आहेत. पण आपल्या सगळ्यांच्या आवडीचा निबंध असायचा तो म्हणजे “माझा भारत देश “(maza bharat desh essay in marathi ) आपण “माझा भारत देश ” हा निबंध फार अभिमानाने लिहिला होता .आपण ज्या देशात राहतो त्या देशाबद्दल आपल्या सगळ्यांना खूप अभिमान असतो.आणि त्याच्याविषयी लिहायचे म्हंटल्यावर आपल्याला गर्व वाटतो.आज आपण आपल्या भारत देशाविषयी माहिती बगणार आहोत.तुम्ही हि माहिती तुम्हाला आपल्या देशाविषयी भाषण करायांचे असल्यास पण वापरू शकता किंवा शाळेत हा निबंध लिहिला तर तुम्हाला शाबासकी भेटल्या शिवाय राहणार नाही.

माझा भारत देश निबंध/भाषण । Maza Bharat Desh Essay in Marathi । अप्रतिम निबंध व भाषणासाठी उपयुक्त

जहाँ डाल-डाल पर सोने कि चिडिया करतीय बसेरा,ओ भारत देश है मेरा…. ओ भारत देश है मेरा..!!!!

भारत या शब्दांमधील ‘भा’ म्हणजे तेज आणि आणि रत म्हणजे रममाण झालेला.तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय.भारत देशात प्राणी,पशुपक्षी ,निसर्ग ,भाषा ,धर्म या सगळ्या बाबतीत विविधता आहे. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे.

साऱ्या जगाला शांतता,समृद्धी ,योगा,आयुर्वेद,महान परंपरा आणि विविधतेतुन एकतेची शिकवण देणारा भारत देश आपल्या सर्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे.आपल्या भारत देशाला संघर्षाचा इतिहास लाभला आहे.साऱ्या जगाला हेवा वाटणारी नैसर्गिक संपदा,श्रीमंती,समृद्धी याकडे आकर्षित होत अनेक परकीय सत्तानी भारतावर आक्रमण केले.

मुघल सत्तेपासून तर ब्रिटिशापर्यंत अनेक परकीय सत्तानी इथली संपत्ती ,ज्ञान ,वैभव लुटण्याचा प्रयत्न केला.भारत देश हा सगळ्या देशाचा मुकुट आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

इंग्रजांनी लादलेल्या एकसे पन्नास वर्षाच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी अनेक स्वतंत्र विराणी प्राणाची आहुती दिली.संपूर्ण जगामध्ये भौगोलिक निसर्गसंपदेने नटलेला आपला भारत देश हिमालयापासून तर निसर्गसंपन्न कन्याकुमारी पर्यंत खुलून दिसतो.जगातल्या अनेक पर्यटकांना भुरळ घालतो.

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या रूपाने आपली एक वेगळी ओळख आहे.भारतीय संविधानानुसार आपण सर्वधर्मसमभावाचे अंगिकारले आहे.

भारत देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत ,दक्षिण दिशेला हिंदी महासागर,पश्चिम दिशेला अरबी समुद्र आणि पूर्व दिशेला बंगालचा उपसागर लाभला आहे.भारत देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.भारत देशाची राजधानी दिल्ली आहे.भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे.भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे.

भारत माझा देश आहे.आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत,अशी प्रतिज्ञा आपण करतो.भारत हा असा एकमेव देश आहे कि सर्व जाती धर्माचे लोक इथे एकत्र राहतात.म्हणून या देशाला सर्व धर्म समभाव असलेला देश असतात.

भौगोलिक रचनेचा विचार करताना देशाची दक्षिण – पूर्व आणि दक्षिण – पश्चिम सीमा ही अथांग महासागराने व्यापली आहे तर उत्तरेत हिमालय पर्वत अडीग असा उभा आहे. पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने आणि निसर्गाची कधीच मोठी अवकृपा न झाल्याने शेती हा परंपरागत व्यवसाय या देशात केला जातो. कित्येक हजारो वर्षांची शेतकी परंपरा भारताला लाभलेली आहे.

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे.वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. गंगा भारताची राष्ट्रीय नदी आहे.या नैसर्गिक विविधतेने भारत देश नटला आहे.भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे.आपल्या भारत देशासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले त्यांच्या या महान कार्यामुळेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळाले.

भारत देशात अनेक खेळाडू ,कलावंत ,वैज्ञानिक होऊन गेले त्यांनी भारताचे नवं उंचावले आहे .तशेच इतिहास ,खगोलशास्त्र ,गणित ,विज्ञान या सगळ्यामध्ये भारताने खूप प्रगती केली आहे.भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.भारतातील ८०% लोक शेती करतात.

‘जय जवान जय किसान ‘हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे.उद्योगामध्ये सुद्धा अनेक उदयोगपतींनी भारताचे स्टेषन उंचावर नेले आहे.दिवसेंदिवस आपला भारत देश विकसित होत आहे .असा विविध कलानी सजलेला भारत देश आहे.जगातील सात आश्चर्यापैकी एकआश्चर्य भारतात आहे.ताजमहाल हे ते आश्चर्य आहे.

भारत हा भूप्रदेश अशा भौगोलिक रचनेत स्थित आहे ज्याद्वारे येथील संस्कृती आणि परंपरा या खूप प्राचीन काळापासून टिकून आहेत. भारतीय संस्कृती ही कधीच विनाश न पावलेली संस्कृती आहे. येथील लोकांचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पाया मजबूत असल्याने भारताच्या अस्तित्वात एक प्रकारची सुसंगतता आणि नाळ आढळते. त्याबरोबर आज वैज्ञानिकता आणि आधुनिकतेचा पुरस्कारही भारताने केलेला आहे.

भारत देश हा सणाचा देश आहे .या देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात.दिलेली दिवाळी दसरा ,होळी ,रक्षाबंधन ,गुढीपाडवा अशे सॅन साजरे केले जातात.विविध धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र मिळून साजरे करतात.भारत देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात जसे हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध, जैन, फारसी, ई आणि त्याचबरोबर काही बाहेर देशातील लोक देखील भारतात स्थायिक आहेत.

प्रत्येक धर्माची भाषा ही वेगळी आहे जसे हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी, पारशी, ई वेगवेगळ्या भाषा आपल्याला भारतात अनुभवायला मिळतील. भारत सगळ्या धर्माचे लोक एकीच्या भावनेने राहतात.आपल्या जाती धर्माच्या आधी आपण भारतीय आहोत याचा गर्व आपल्याला गर्व आहे.

भारत प्रत्येक शतकात वेगवेगळा भासतो. मागील काही शतकांत भारतावर खूप मोठी परदेशी आक्रमणे झाली . भारत हा देश परकीय सत्तेत होता ज्यामध्ये अफगाणी, इंग्रज, पोर्तुगिज अशा सत्तांचा समावेश होता. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अगदी १६ व्या शतकापासून येथील विरपुत्रांनी आपले प्राण गमावले आहेत. भारत देश अनेक वेळा लुटला गेला पण येथील लोकांचे आत्मिक बळ आणि जगण्याचे नियम कोणी हिरावू शकले नाही.

तुम्हाला हा माझा भारत देश निबंध/भाषण (Maza Bharat Desh Essay in Marathi) कसा वाटला आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *