Masala Papad Recipe in Marathi
Masala Papad Recipe in Marathi

आज आपण बनवणार आहोत मसाला पापड रेसिपी (Masala Papad Recipe in Marathi). जी बनवायला खूप सोप्पी आहे. खूप वेळा आपण मसाला पापड जेवण सुरु करण्याअगोदर खातो.पण आपण हा मसाला पापड अगदी कधीही नास्ता किंवा लहान मुलांना खाण्यासाठी बनून देऊ शकतो.

साहित्य :-

  • ४ पापड
  • १ मोठा कांदा, बारीक चिरून
  • २ लहान टोमॅटो, बारीक चिरून
  • १ टिस्पून लाल तिखट
  • २ टिस्पून चाट मसाला
  • २ टिस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
  • मीठ चवीनुसार
  • तेल, पापड तळण्यासाठी.

कृती :-

  • प्रथम एका बाउल मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. नंतर बाजूला ठेवावे. ह्या मिक्शर ला मसाला पापाडचा टोप्पिंग म्हणू शकतो.
  • एका पनमध्ये पापड बुडण्याइतपर्यंत तेल गरम करावे. नेहमी प्रमाणे पापड तळून घ्यावे.
  • पापडावर चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरावे.
  • आता पापडावर मिक्स केलेलं टोप्पिंग पसरावा.
  • पुन्हा येगदा टोप्पिंग केलेल्या पापडावर चाट मसाला भुरभुरावे.
  • लगेच सर्व्ह करावे.

टिप्स :-

  • मसाला पापड लगेच सर्व्ह करावे. कारण हा पापड कांदा आणि टोमॅटो असल्याने लवकर मऊ होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here