मॉडर्न मराठी उखाणे 2021| Best Modern Marathi ukhane List- नवरा नवरीचे उखाणे

Published by Uma on

Marathi Ukhane

नवरा नवरीचे मराठी उखाणे ( Best Modern Marathi ukhane 2021) आज आपण नव्या पिढीला आवडतील आणि त्याच्या lifestyle ला जुळतील अशे modern मराठी उखाणे (Marathi ukhane) बगणार आहोत .

1) “माझी लेक आहे चमचमणारी चांदणी,
लग्नघटिका समीप आली, गाऊ आनंदाची गाणी,
ग्रहमुखाच्या दिवशी सांगते ….. माझे
राजा आणि मी त्यांची राणी.”

2) मिळून काम केल्यावर, कामं होतात लवकर…
मी चिरते भाजी, आणि लावतो कुकर

3) माझ्या चा चेहरा, आहे खूपच हसरा
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा!

4) तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल…
माझी आहे. खरंच कित्ती व्युटीफुल!

5) इस्त्री केल्यावर, कॉलर राहते एकदम ताठ…
माझ्या चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

6) दिसते इतकी गोड की, नजर तिच्याकडेच वळते…
च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.

7) मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम…
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी…कटकट करते जाम.

8) यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली…
आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली.

9) गुलाबाचे फुल देठाला ताजे
……रावांचं नाव घेते सौभाग्य माझे.

10) आग्रहाखातर नाव घेते,आशीर्वाद द्यावा ….
रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा.

11) ” मंगलसुत्रातील दोन वाट्या
सासर आणी माहेर..
रावांनी दिला मला
सौभाग्याचा आहेर ॥

12) सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश…
रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

13) लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा …
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

14) संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा…
रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

15) चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप,
……रावा समवेत ओलांडते माप

16) सोन्याच्या अंगठीवर नागाची खुन,
….रावांचे नाव घेते….ची सुन.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *