Marathi Ukhane For Marriage

Published by Uma on

Marathi Ukhane

Marathi Ukhane For Marriage

1) अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला ग्रंथ गीता
…. रावांचे नाव घेऊन येते मी आता

2) चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप
…. रावां समवेत ओलांडते माप

3) लग्न मंडपामध्ये पसरले सनईचे मंजुळ सूर
…. च्या साठी माहेर केले दूर

4) सासरच्या निरांजनात तेवते माहेरची फुलवात
…. च्या बरोबर आ संसाराला करते सुरवात

5) माहेरची नाती जणू रेशमाच्या गाठी
रेशीमबंध सोडून सासरी आले …. च्या साठी

6) मेंदीने रंगले हात, दागिन्यांचा चढविला साज
…. शी विवाह केला, नववधू बनले आज

Ukhane in Marathi for Marriage

7) गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
…. व घेते सोडा माझी वाट

8) माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा
…. रावांनीनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा

9) मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
…. रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

10) बारिक मणी घरभर पसरले, …. रावांसाठी माहेर विसरले

11) राजहंसाच्या पिल्लास चारा हवा मोत्याचा
…. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा

12) प्राजक्ताच्या फुलांनी भरले आंगण
…. रावांचे नाव घेऊन सोडले कंकण

Marathi Ukhane for Wedding

13) मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेत …. ची सून

14) फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
…. रावांसह चालले सात पावलांवरी

15) लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
……रावांना घास देताना मला येई गोड हसू

16) फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. राव आणि माझे जन्मो जन्माचे धागे

17) तु्ळजा भवानीची कृपा आणि खंडोबाचा आशिर्वाद माहेरचे निरांजन आणि सासरची फूलवात
…. रावांचे नाव घेउन करते संसाराला सूरवात

Marathi Lagnache Ukhane

18) सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले,
…. रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले

19) चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
…..रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

20) शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
…..राव म्हाजे माझ्या जीवनसाथी


1 Comment

Marathi Ukhane - आमचीमराठी.कॉम · May 14, 2021 at 6:26 pm

[…] Marathi Ukhane For Marriage […]

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *