Marathi Ukhane for Marriage | मराठी उखाणे 2022

0
46
Marathi Ukhane for Marriage

मराठी संस्कृतीमध्ये उखाणे म्हणजेच नाव घेणे ही एक जुनी प्रथा आहे. उखाणे म्हणजे आपल्या पतीचे वा पत्नीचे नाव कोणत्याही मंगल प्रसंगी चारोळीमध्ये घेणे. Marathi Ukhane विविध प्रकारच्या समारंभांमध्ये घेतले जातात उदाहरणार्थ सत्यनारायणाची पूजा, डोहाळे जेवण, लग्न, मंगळागौर, गृहप्रवेश इत्यादी. पूर्वी मराठी स्त्रियां आपल्या पतीचे नाव सर्वांसमोर घेत नसत (म्हणजे आताही नाही) आपल्या पतीला नावाने हाक मारणे किंवा त्यांचे नाव घेणे हे पतीचा अनादर केल्यासारखे होते. त्या वेळी उखाण्यात पतीच्या नावाचा उल्लेख करणे हे खूप मनाचे समजले जात. प्रत्येक स्त्री उत्कृष्ट उखाणा म्हणण्याचा प्रयत्न करत कारण याच वेळी त्या आपल्या पतीचे नाव सर्वांसमोर घेऊ शकत होत्या. ही प्रथा अजूनही चालू आहे.

Marathi Ukhane हे फक्त स्त्रियांपुरते मर्यादित नसून पुरुषही मंगल प्रसंगी उखाणे घेतात. परंतु उखाणे घेणे सर्व पुरुषांना जमत नाही. एक common उखाणा पुरुष मंडळींमध्ये प्रचलित आहे. “भाजीत भाजी मेथीची, XXXXX माझ्या प्रीतीची”. हा उखाणा जवळ जवळ ९९% म्हटला जातो.

Marathi Ukhane For Marriage


अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला ग्रंथ गीता
…. रावांचे नाव घेऊन येते मी आता

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप
…. रावां समवेत ओलांडते माप

लग्न मंडपामध्ये पसरले सनईचे मंजुळ सूर
…. च्या साठी माहेर केले दूर

सासरच्या निरांजनात तेवते माहेरची फुलवात
…. च्या बरोबर आ संसाराला करते सुरवात

माहेरची नाती जणू रेशमाच्या गाठी
रेशीमबंध सोडून सासरी आले …. च्या साठी

मेंदीने रंगले हात, दागिन्यांचा चढविला साज
…. शी विवाह केला, नववधू बनले आज

Ukhane in Marathi for Marriage

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
…. व घेते सोडा माझी वाट

माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा
…. रावांनीनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
…. रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

बारिक मणी घरभर पसरले, …. रावांसाठी माहेर विसरले

राजहंसाच्या पिल्लास चारा हवा मोत्याचा
…. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा

प्राजक्ताच्या फुलांनी भरले आंगण
…. रावांचे नाव घेऊन सोडले कंकण

Marathi Ukhane for Wedding

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेत …. ची सून

फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
…. रावांसह चालले सात पावलांवरी

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
XXXX रावांना घास देताना मला येई गोड हसू

फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. राव आणि माझे जन्मो जन्माचे धागे

तु्ळजा भवानीची कृपा आणि खंडोबाचा आशिर्वाद
माहेरचे निरांजन आणि सासरची फूलवात
…. रावांचे नाव घेउन करते संसाराला सूरवात

Marathi Lagnache Ukhane

सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले,
…. रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
XXXX रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
XXXX राव म्हाजे माझ्या जीवनसाथी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here