Navardevache Ukhane in Marathi

25+Marathi Ukhane for Male : महाराष्ट्रात लग्न म्हंटल कि परंपरा आल्याचं अशीच एक गमतीशीर परंपरा म्हणजे लग्नानंतर नवरी- नवरदेवाने नाव (ukhana) घेणे . आजकालच्या नव्या पिढीत मुली नवऱ्याचं नाव अगदी सहजतेणे घेतात पण पहिलं असं नसायचं बायको नवऱ्याला नावाने कधीच हाक नाही मारायची मग म्हणून ती त्याच नाव ह्या उखाणा( Navardevache Ukhane in Marathi) घेण्याच्या परंपरेतून घ्यायची.

25+Marathi Ukhane for Male|Navardevache Ukhane in Marathi – नवरदेवासाठी उखाणे

बायका उखाणा (marathi ukhane for male) अगदी जुन्या काळापासून घेत आल्यात पण आजकाल लग्न झालं की मुलांना पण उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो आणि अशा वेळी मुलांची मात्र फजिती होते त्यांना उखाणे येत नसतात,म्हणून आज आम्ही खास नवरदेवासाठी ( navdevache ukhane in marathi) नवीन आणि सुंदर अशे उखाणे मराठीतुन(marathi ukhane) घेऊन आलेलो आहोत.

1) पुरणपोळीत तूप असावे साजूक,
….आहेत आमच्या नाजूक.

2) तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट…
पण बघता बघता ……च्या प्रेमात पडलीमाझी विकेट.

3) हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे …मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.

4) भारताची परंपरा आहे मुलीने नेसावी साडी…
तुझ्यासाठी आणली मी फॉरचुनर(Fortuner) गाडी.

5) ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल,
…चं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

6) “निसंगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन …..ने दिसा माझ्या हातात हात”.

7) हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी,
…..आपण संसाराची सुरवात, करूया सर्वांच्याआशीर्वादांनी.

8) “जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने”

9) निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे
…..च नाव घेतो, लक्ष द्या सारे.

10) माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…
ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

11) उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात
नवनांचा हा हार …..च्या गळ्यात.

12) “मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…..चे बरोबर बांधली जीवन गाठ.”

13) गुढीपाडव्याला केलाय …..ने बदामाचा हलवा,
खायला आता सगळ्यांना बोलवा.

14) राजा म्हणती राणीला एकदा तरी हास,
……. नाव घेतो तुमच्यासाठी खास.

15) चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी… माझी
गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

16) “चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
….चे नाव घेऊन सोडतो कंकण”.

17) दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग…
सुखी आहे संसारात, …..च्या संग.

18) देवाच्या देव्हा-यात फुलांना प्रथम स्थान
सौ….ने दिला मला पतिराजांचा मान.

19) झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ……..ची जोडी.

20) मोगऱ्याच्या गजऱ्याचा, मस्त सुटलाय सुगंध…
…..सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद!

21) ” सितेसारखे चरित्र,लक्ष्मी सारखं रूप,
— मला मिळाली आहे अनुरूप”.

22) अंगणात पडतो पारिजातकाचा सडा
…..ला आवडतो गरम बटाटेवडा.

23) “निळे पाणी निळे आकाश… हिरवे हिरवे रान
—चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

24) आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
…..चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

25) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
…..झाली आज माझी गृहमंत्री.

26) काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात.

27) एक होती चिऊ एक होता काऊ
…..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

28) दोन शिंपले एक मोती,दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ…ची अखंड राहो प्रीती !!!!!

29) “चंद्राला पाहून भरती येते सागराला
….ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला”.

30) हातात हात घेऊन सप्तपदीचालती,
शतजन्माचे नाते..सोबत जीडती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here