जीवनाचे वेगळे रंग – Marathi Prem Virah Kavita

Published by Uma on

मराठी प्रेम विरह (marathi prem virah kavita ) जीवनाचे वेगळे रंग written by subhash katakdound यांनी प्रेमाच्या विरहाची खूप सुंदर कविता लिहिलीय यात त्यांनी प्रेमाच्या सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत यात ते सांगताय कि ती दिसताच प्रेमाचे गाणे कशे सुरु झाले सूर कशे जुळले आणि प्रेमाचे रंग कशे फुलत गेले या मराठी प्रेम विरह कवितेत ( marathi prem virah kavita) त्यांनी पुढे सांगितलंय प्रेमाचे रंग फुलल्या नंतर विरहाचे दुःख किती कठीण असते ती मात्र सहज रित्या मेणाचे घरटे असल्या सारखे तोडून निघून जाते पण यात मात्र अजून खूप सुंदर ओळी लिहिल्यात कि तू दिलेला प्रेमभंग तर मी विसरून गेलोय कारण तुझ्या येण्यानी जगण्याचे नवे रंग मला कळले .

ज्यांनी प्रेमभंग सहन केलाय त्यांनी ही जगण्याचे वेगळे रंग (prem virah marathi kavita) नक्की वाचावी यात खूप सुंदर भावना व्यक्त केल्यात कि कोणी सोडून गेले तरी पाठी माघे खूप सुंदर आयुष्य आहे जे आपण आनंदात जगू शकतो.

जीवनाचे वेगळे रंग – marathi prem virah kavita । Marathi kavita

अल्लड ते वय होते 
गीत शोधत होतो प्रणयाचे 
तू दिसलीस आणि मन माझे 
झाले गाणे प्रेमाचे 


एकटाच होतो गुणगुणत 
बोल नव्हते त्यात भावनांचे 
मला फक्त वेड होते 
एक टक तुझ्याकडे बघण्याचे 


कळले नाही कसे पण ओळखले तू 
भाव माझ्या डोळ्यांचे
शब्द मग गेले जुळत आणि 
रंग फुलले कवितेचे


तू दिलेस सुर कवितेस आणि 
रूपच बदलले गाण्याचे 
तुझ्या सुरात सुर मिसळून 
संगीत झाले जिवनाचे

कळले नाही कसे आवडले तुला 
वेगळे घरटे ते मेणाचे 
अगदी सहजच गेलीस मोडून 
स्वप्न ते माझे मिलनाचे


कळले पण वळले नव्हते 
कारण मला तुझ्या जाण्याचे 
प्रेमाचं गाणं घेऊन गेलीस 
सोडून मागे जग आठवणींचे


काव्य उमटले मनी माझ्या 
शब्द नि सुर ही ह्रुदयाचे 
जखमा माझ्या भरल्या आता 
आवडले गीत ते विरहाचे


दूःखी नाही अन् विसरलो आता 
दूःख ही त्या प्रेमभंगाचे 
अग तुझ्यामुळेच तर कळले मला 
वेगळे रंग ते जिवनाचे.

जीवनाचे वेगळे रंग written by subhash katakdound हि मराठी प्रेम विरह कविता ( marathi prem virah kavita ) तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा,.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *