Marathi prem kavita – प्रेम कविता

प्रेम म्हणजे (Prem mhnje) हि मराठी प्रेम कविता (marathi prem kavita) कुसुमाग्रज त्यानी लिहिलेली आहे या कवितांमधून कुसुमाग्रज प्रेम म्हणजे(prem mhnje) काय असतं याच्या भावना व्यक्त करत आहेत . या कवितेत कुसुमाग्रज एका प्रियकराला सांगताय जर तू प्रेम केलय तर त्याला सामोर जा भीऊ नकोस वेळ निघून जाण्यापूर्वी तुझ्या प्रेमाच्या भावना व्यक्त कर.हि मराठी प्रेम कविता (marathi prem kavita ) जणू कुसुमाग्रजानी त्या प्रियकरांसाठी लिहिलिय ज्यांनी आपल्या मनातल्या भावना तशाच्या मनात साचवल्यात ते त्यांना जाग करताय अन सांगताय तुमच्या भावना सांगून टाका आणि प्रेम हे एकाद्या भिल्लासारखं करा त्याच जश त्याच्या बाणावर अतोनात प्रेम असत आणि तो कधी त्याला एकटं सोडत नाही.हि कुसुमाग्रज यांनी लिहिलेली मराठी प्रेम कविता (marathi prem kavita )नक्की एकदा वाचून बगा

प्रेम म्हणजे – Marathi prem kavita

पुरे झाले चंद्रसूर्य, पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत, स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीनचिठ्ठी, आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या, भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं , बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

कुसुमाग्रज याची प्रेम म्हणजे ही मराठी प्रेम कविता (marathi prem kavita ) तुम्हाला आवडली का हे नक्की कंमेन्ट करून सांगा आणि हि प्रेम कविता तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा पाठवा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here