Skip to content

Marathi Lagna Patrika Majkur | मराठी लग्न पत्रिका मजकूर | लग्न निमंत्रण मेसेज

Marathi Lagna Patrika Majkur | मराठी लग्न पत्रिका मजकूर | लग्न निमंत्रण मेसेज


Get beautiful Lagna Patrika Majkur in Marathi!
Well, there might be many important functions and occasions in life, but marriage is the most important thing that happens in everyone’s life. Marriage is when two hearts meet and decide to be together for a lifetime. That is why marriage celebrations and preparations have to be on point. And it all starts with the Invitation cards for marriage. Maharashtrians call it Lagna Patrika, means “the wedding card”.

Nowadays, a majority of the people send wedding invitation messages on WhatsApp, thus doing it digitally, as it is fast, less time consuming and cheaper compared to the traditional Cards distributed in weddings. So for that, you need to have proper wordings and messages to invite people. Most people send their lagna patrika in kavita format.

The Lagna Patrika aamantran messages ( लग्न निमंत्रण मेसेज ) are in your favorite language – Marathi. We have all types of shubh vivah quotes in marathi for wedding invitation in Marathi for you, be it formal or a little casual. We have messages for different occasions as well, like casual Marathi messages for Sangeet, formal messages for Baarat.

All these lagna patrika matter in marathi ( लग्न पत्रिका नमुना मराठी ) are filled with affection and gratitude towards people who will be attending your wedding. Trust us, Aamchimarathi has the best Lagna Patrika matter in the Marathi charoli and kavita format. Well, if you don’t trust us still, then check them out yourself!

So without much ado, we are presenting to you some fascinating, wonderful and best marathi lagna patrika majkur – Only on Aamchimarathi! Share with your friends…

Marathi Lagna Patrika Majkur | मराठी लग्न पत्रिका मजकूर | लग्न निमंत्रण मेसेज

दोन पाखरांची भेट निळ्या उंच आभाळी । स्वप्न मनातले त्यांच्या एक घरटं बांधुनी ।।
नव्या पर्वाची, अशी सुरवात दोघांची । ईश्वरचरणी नमन करुनिया ।।
एक सोहळा मोलाचा अन मोलाचं हे नातं । जणू नक्षत्रांचं देणं ह्या प्रिय धर्तीला ।।
चिमणा-चिमणीचा इथं थाटतो संसार । मन भरुनी तुमचे, यांस लाभू द्या आशिर्वाद ।।

लग्न म्हणजे रेशीम गाठ । अक्षता आणि मंगलाष्ट्का सात
दोनाचे होणार आता चार हात । दोन जीव गुंतणार एकमेकांत
गोड गोजिरी लाड लाजिरी । लाडकी आई बाबाची
नवरी होणार आज तू । सून एका नव्या घराची
स्वप्न दोघांच्या लग्नाचे । मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आशीर्वादाच्या साथीने । नव्या संसाराची सुरवात होते

पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा ।। भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवांची ।। मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची
आपला सहभागही क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा ।। या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन
वधू – वरास शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती

Best Marathi Lagna Patrika Majkur

जन्म दिला पित्याने । गाठ बांधली ब्रह्मदेवाने । होईल विवाह अग्नीच्या साक्षिने
शुभ कार्य सिद्धीस जाईल श्री गणेशाच्या आशिर्वादाने
संसाराची सुरवात होईल सप्तपदीने । विवाह सोहळ्याची शोभा वाढू दे आपल्या आशिर्वादाने

एक क्षण… पहिला प्रहर, एक क्षण… मेंदीचा बहर, एक क्षण… लगीन घाई, एक क्षण… वाजे सनई,
एक क्षण… अंतरपाठ, एक क्षण… रेशीम गाठ, मुहूर्ताचा हा क्षण जणू काही एक सण…
म्हणूनच हजर रहा… प्रत्येक जण… आग्रहाचे निमंत्रण

Lagna Patrika Majkur Kavita

ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची, पृथ्वीतलावर जोडी शोभते ….. व …..ची
पुर्व जन्माची पुण्याई ….. घराण्याची, कन्या देउनी वाढविली कीर्ती नावाची
पुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सून शोभते….. घराण्याची
सगे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची
माथ्यावरती पडूद्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची

एका नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय
कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्निदेवतांच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आशीर्वादाने
आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहेत आपले शुभाशिर्वाद
आपण सर्वांनी यावं हे आग्रहाचे आमंत्रण !

Marathi Lagna Patrika Matter

विवाह ! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं एक जाणीव
एक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचं
एक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा

ऋणानुबंध ठाऊक नव्हते … एकमेकां शोधित होते । नाते तसे जुनेच होते !
आगमन झाले शुभयोगाचे … नाते जुळते दोन मनांचे । असे हे बंध रेशमाचे !
अथांग हा सागर संसाराचा … विवाह होतोय ….. आणि …..चा । आशीर्वाद असो मान्यवरांचा !
आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे !!

Marathi Lagna Patrika Wordings

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन
सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण
यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं

चमकला तो शुक्रतारा । धान्य तो ….. जिल्हा ।।
महाराष्ट्र आमची मे भूमी । जन्म घेतला जिथे शिवरायांनी ।।
सागर गंगेचे निर्मळ पाणी । संगम झाला …..या ठिकाणी ।।
….. आणि …..यांची इच्छा झाली म्हणूनी । विधी आला घडोनी ।।
पूर्व जन्माची पुण्याई ही ….. घराण्याची । परि शोभते सून ….. घराण्याची ।।
होतील कष्ट तरी सहन करून यावे लग्नाला । चुकून सांगू नका पत्रिका नव्हती आम्हाला ।।

Marathi Lagna Patrika Charoli

विश्वा दिली ज्ञानेश्वरी । तुकोबांनी केला संसार पांढरी ।
शिवरायांनी रोवला स्वराज्याचा झेंडा । असा महाराष्ट्र धर्म राजवेडा ।
याच मातीतील अभंग नाती-गोती । ….. आणि ….. परिवाराकरिता आपल्या अक्षदा पाडाव्यात

आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान । म्हटले तर दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा ।।
म्हटले तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध । सात जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा ।।
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादाशिवाय अपूर्णच । म्हणूनच या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती हवीच

लग्न म्हणजे जुळलेले बंध । लग्न म्हणजे नवे अनुबंध ।।

मराठी लग्न पत्रिका नवीन मजकूर

विवाह, सुख दुःखातील आजन्म सोबत, सुरांची साथ, हवीहवीशी संगत

……आणि …… ची जमली आता जोडी
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा या दिवसाची गोडी

सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची ।
पृथ्वीतलावर जोडी शोभे …… – ….. यांची ।
ईश्वराने गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्माची पुण्याई ….. – … घराण्याची ।
सहपरिवारासह येऊन शोभा वाढवावी मंडपाची, वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावा हिच विनंती ।।

सप्तपदींची सात पावलं साताजन्माच्या गाठी
यायलाच हवं तुम्हाला….. – … साठी
….. कन्या ….. ची तीन भावंडांत मोठी
…..ही घरात मोठा आमची म्हातारपणाची काठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *