Marathi Chavat Non Veg Ukhane

Published by Uma on

Marathi Ukhane For Bride

Marathi Chavat Non Veg Ukhane

1) आजघर माजघर माजघराला नाही दार, …. च्या घरात मात्र खिडक्या हजार

2) इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
…. रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव

3) डाळीत डाळ तुरीची डाळ, हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ

4) खंडाळ्याच्या घाटात पेरले होते गहू, लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

5) अंगणात पेरले पोतेभर गहू, लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

Latest Marathi Ukhane

6) माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा,
…. रावांनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा

7) Facebook वर ओळख झाली आणि WhatsApp वर प्रेम जुळले
.… राव आहेत खरंच बिनकामी हे लग्न झाल्यानंतर कळले

8) …. च्या येण्यानी घडलं माझे जीवन
तुमच्यावर खुप प्रेम करते, तुमच्यासाठी काय पण

9) आंब्याच्या झाडाला लागली होती मिर्ची
तू माझा परश्या आणि मी तुझी आर्ची

10) आहे चैत्र-वैशाख महिना, सुरात कोकिळा गाते
…. रावांचे नाव …. घेते

11) काव्य आणि कविता सागर आणि सरिता
…. रावांचे नाव घेते तुमच्या करीता

Marathi Ukhane New

12) नवरातत्रीनंतर येतोय दसरा,
…. रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा

13) चंदनी पानात मुग्ध कळी हसली
…रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

14) श्रावणात पडतात सरीवर सरी
…. रावांचे नाव घेते …. ही बावरी

15) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
…. रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल

16) मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
…. रावांमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ

Latest Marathi Ukhane

17) पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…. राव आहेत आमचे फार नाजुक

18) सूपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकु कशी, पायात पैंजण चालू कशी,
…. राव बसले मित्रपाशी, कपाटाची चावी मागू कशी??

19) परसात अंगण अंगणात तुळस
…. रावांचे नाव घ्यायचा मला नाही आळस

20) रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
….. चे नाव घेते असु द्या लक्षात

21) साजुक तुपात, नाजुक चमचा
…. रावांचे नाव घेते आशीर्वाद असुदे तुमचा

Latest New Ukhane in Marathi

22) नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
…. रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू

23) नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
…. रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

Dohale Jevan Ukhane


24) रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा
…… ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.

25) कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी, ….. रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.

26) चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ, …..चे नाव घेते केला डोहाळ जेवणाचा थाट

27) मावळला सूर्य, उगवला शशी, …..चे नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी

Baby Shower Ukhane in Marathi

28) सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी, ……चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी

29) हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस, ……चे नाव घेते सासरच्यांनी केली हौस

30) तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले, ……चे नाव गोड, पुरवा माझे डोहाळे

31) बाळराजांची चाहुल दरवळला परिसर, ….. च्या सहवासात माझे जीवन होईल सफल

Marathi Ukhane for Female for Baby Shower

32) घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे, ….. च्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे

33) संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट
….. राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट

34) मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल, ……चे नाव घेते आता जड झाले पाउल

35) पाच सुवासिनींनी भरली पाच फळांनी ओटी, ……चे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी

Dohale Jevan Marathi Charolya

36) पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी, ……चे नाव घेते भरली माझी ओटी

37) मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट, ……चे नाव घेते, केला थाटमाट

Marathi Ukhane for Griha Pravesh

38) आकाशाच्या अंगणात ब्रह्मा, विष्णू आणि महेश
….रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश

39) अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप, रुपसारखा जोडा
…. रावांचे नाव घेते वाट माझी सोडा

40) गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
…. रावांच्या हातात हात देउन झाले मी निर्भर

Mangalagaur Ukhane

41) सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
…. रावांचे नाव घेऊन घेते मी रजा

42) पुण्यकर्म केले असता राहतात जन्मो जन्मीच्या गाठी,
…. रावांचे नाव घेऊन जाते मी ग़ौरी पुजनासाठी

43) हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
…. रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

44) अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
…. रावांच नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *