Mango Milkshake Recipe in Marathi
Mango Milkshake Recipe in Marathi

आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार मॅंगो मिल्कशेक रेसीपी (Mango Milkshake Recipe in Marathi). मॅंगो मिल्कशेक बनवण खूप सोप आहे.यासाठी आज मी काही खास टिप्स सांगणार आहे ,जेणेकरून तुमचा मॅंगो मिल्कशेक अतिशय चवदार होईल.

साहित्य : Ingredients of Mango Milkshake Recipe in Marathi

  • 2 आंबे / 2 mango( तुमच्या गरजेनुसार जास्त पण वापरू शकता )
  • 1 ग्लास थंड दूध (1 glass chilled milk)
  • 2 टेबलस्पून साखर (suger /jaggery/brown suger)
  • 1 वाटी बर्फ ( 1 bowl icecube)
  • काजू,बदाम (Dryfruit) सजवण्यासाठी ( garnish)

कृती : How To Make Mango Milkshake Recipe

१) मॅंगो मिल्कशेक रेसीपी (Mango Milkshake Recipe) बनवण्यासाठी आपल्याला आंबे अर्धा तास थंड पाण्यात ठेवायचे आहेत,कारण आंबा हा गरम असतो आणि आंब्यातली गरमी निघून जाण्यासाठी त्यांना पाण्यात भिजत ठेवावे.

२) त्यानंतर आंबे चिरून घ्यायचे. कधीही मॅंगो मिल्कशेक बनवत असाल तर आंबा हा थोडा घट्ट असावा.आपण जर मऊ आंबा वापरला तर त्याचा मॅंगो मिल्कशेक हा दाटसर नाही बनत. पण जर तुमच्याकडे खूप पिकलेले आंबे असतील तरी तुम्ही त्याचा रस काढून सुद्धा मॅंगो मिल्कशेक बनवू शकता.

३) सगळे आंबे नीट कापून घ्या. तुम्ही आधी चाकुच्या साह्याने साल काढून पण बारीक बारीक काप करू शकता.

४) नाहीतर आधी आमच्या मोठ्या मोठ्या चीरा करून सूरीच्या साह्याने उभे आडवे चीर करून पण वरचा आंब्याचा गर काढून घेऊ शकता. यातील तुम्हाला जे नीट करता येईल ते करून गर काढून घ्या.

५) आता हा गर मिक्सरच्या भांड्यात टाका,त्यानंतर त्यात दोन चमचे साखर घाला. ज्याना साखर नसेल वापरायची ते ब्राऊन शुगर किवा गूळ पण वापरू शकता.

६) त्यानंतर त्यात एक ग्लास थंड दूध आणि एक वाटी बर्फ घाला. आता याला एकत्र दळून घ्या.

७) अशाप्रकारे आपला घरगुती दाटसर ,थंडगार मॅंगो मिल्कशेक तयार आहे. त्याला काचेच्या ग्लास मध्ये ओतून घ्या ,त्यावर थोडे काजू बदाम घाला आणि थंडगार प्यायला दया.

तुम्हाला आमची मॅंगो मिल्कशेक रेसीपी (Mango Milkshake Recipe )कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here