मँगो केक रेसिपी । Mango Cake Recipe in Marathi। उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट असा मँगो केक.

Published by Uma on

Mango Cake Recipe in Marathi

मँगो केक रेसिपी (Mango Cake Recipe in Marathi) : उन्हाळ्यात आंबा खाण्याची तशी सगळ्यांचीच चंगळ असते,पण त्यातल्या त्यात गावी असणाऱ्या लोकांची आंबा खाण्याची मज्जा वेगळी असते.आम्ही सुद्धा दरवर्षी उन्हाळ्यात गावी जाऊन आंबा खायचो.पण यंदा lockdown मुळे सगळंच मिस करतोय.तुम्ही सुद्धा दरवर्षी बाजारातुन आंबे आणून मानसोक्त खात आलात.पण ह्या वर्षी आंब्याचा भाव खूप वाढला आहे त्यामुळे मनसोक्त आंबे आणून खाता येत नाहीत.त्यावर पर्याय म्हणून आपण आंब्याचा शिरा ,आंबा बर्फी , मँगो केक रेसिपी (Mango Cake Recipe in Marathi ) बनवू शकतो. आणि आंबाच्या आमरस किंवा कापून खाण्यापेक्षा अशा प्रकारे आस्वाद घेऊ शकतो. आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा आणि उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट असा मँगो केक.

मँगो केक रेसिपी : Mango Cake Recipe in Marathi

साहित्य :

  • 1 वाटी रवा
  • 2 वाटी आंब्याचा रस
  • 3 चमचे साजूक तूप
  • 1 चमचा बटर
  • 1 वाटी पिठी साखर
  • 1 चमचा इनो
  • 1 चमचा वेलची पूड

कृती :

• प्रथम एका भांडयात तूप घ्या, त्यामध्ये पिठी साखर घालून ते एकत्र करा व थोडे बटर टाका.

• नंतर त्यामध्ये रवा घालून ते एकत्र करा व आंब्याचा रस घालून ते परत एकत्र करून घ्या.

• त्यामध्ये इनो आणि थोडे पाणी एकत्र करा. थोडी वेलची पूड घालून ते मिश्रण परत एकत्र करा.

• नंतर मिक्सरच्या भांड्यात ते मिश्रण एकत्र करून घ्या. नंतर एक भांडे घेऊन त्यात 4/4 तूप लावा आणि त्यामध्ये ते मिश्रण काढून घ्या.

• नंतर एक कढई घेऊन त्यामध्ये एक स्टँड ठेवा. त्यावर आपले ते भांडे ठेवून द्या व वरुन झाकण ठेवा. 30 ते 35 मिनिटांनी गॅस बंद करून नंतर ते 10 मिनिटे थंड होऊ द्या.

सुरीचा वापर करून ताटात काढून घ्या व केक आवडीनुसार सजवा.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *