Skip to content

झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव – Kolhapuri Misal Pav Recipe In Marathi

Kolhapuri Misal Pav : महाराष्ट्रात मिसळपाव म्हंटल्यावरती आपल्याला वेगवेगळे प्रकार आठवतात ,पण त्यात सगळ्यात जास्त आठवते ती झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव Kolhapuri Misal Pav Recipe In Marathi.

आज आपण वेगवेगळ्या मिसळपाव जशे कि ,दही मिसळ,नादखुळा मिसळ,गुजराती मिसळ,फराळी मिसळ ,पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ,यात प्रसिद्ध असलेली झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव कशी बनवायची (How to Make Misal Pav) ते बगणार आहोत.चला तर मग बनवायला घेऊया कोल्हापुरी मिसळ .त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे.

साहित्य (Ingredients For Kolhapuri Misal Pav Recipe In Marathi )

 1. 1/4 कप खोबर (Dry Coconut )
 2. 5-6 काश्मिरी लाल मिरची (Kashmiri Red Chillies )
 3. 2 Tbsp धनी (coriander seeds)
 4. 1 tsp जिरे (Cumin seeds)
 5. 1 tsp बडीशोप (fennel seeds)
 6. विलायची (Cardamom)
 7. जायपत्री (Nutmeg )
 8. दालचिनीचा तुकडा (Cinnamon Stick )
 9. दगडफुल (Stone- Flower )
 10. चक्रीफूल (Star Anise)
 11. 6-7 लवंग (Cloves)
 12. 6-7 मिरे (Black Pepper)
 13. 8-10 मेथीचे दाणे (Fenugreek Seeds)
 14. 2 Tbsp तीळ (White Sesam Seeds)
 15. 1 Tbsp खसखस (Poppy Seeds)
 16. 1 Inch आलं (Ginger)
 17. 8-10 लहसून पाकळ्या (Garlic 3-4)
 18. तेल आवश्यकतेनुसार (oil )
 19. 1 tsp मोहरी (mustard seeds )
 20. 1 tsp जिरे (cumin seeds )
 21. 1/2 tsp हिंग (asafoetida)
 22. कांदे (बारीक करून )(Onions chopped)
 23. टमाटर (बारीक करून )(chopped tomato)
 24. 1/2tsp हळद (turmeric)
 25. 1 tbsp लाल मिरची पावडर( red chilli powder)
 26. 3/4 tbsp कोल्हापुरी मिसळ मसाला (Kolhapuri missal masala)
 27. 1 and 1/2 कप मटकी (Moth Bean Sprouts)
 28. मीठ चवीनुसार (salt)
 29. 3 cups पाणी water
 30. कोथम्बीर (Coriander Leaves to garnish)
 31. आवश्यकतेनुसार पाव
 32. फरसाण

कृती : How to Make Misal Pav

Step १) : मिसळ बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कोल्हापुरी मसाला तयार करून घ्यायचा आहे .

Step २): त्यासाठी आपण वरती साहित्यामध्ये घेतल्या प्रमाणे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत .मसाले भाजून घेण्यासाठी गॅसवर पॅन ठेवा.आता पॅन चांगला गरम झाला कि त्यात सर्वप्रथम 1/4 कप खोबर घाला ,त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचं मग त्यात 5-6 काश्मिरी लाल मिरची,2 Tbsp धनी (coriander seeds),1 tsp जिरे (Cumin seeds),1 tsp बडीशोप (fennel seeds),2 विलायची (Cardamom),1 जायपत्री (Nutmeg ),1 दालचिनीचा तुकडा (Cinnamon Stick ),1 दगडफुल (Stone- Flower ),1 चक्रीफूल (Star Anise),6-7 लवंग (Cloves),6-7 मिरे (Black Pepper),8-10 मेथीचे दाणे (Fenugreek Seeds)2 Tbsp तीळ (White Sesam Seeds),1 Tbsp खसखस (Poppy Seeds),1 Inch आलं (Ginger),8-10 लहसून पाकळ्या (Garlic 3-4) यांना एक एक करून छान भाजून घ्या.

Step ३): भाजून झाल्यावर त्यांना आपल्याला दळून घ्यायचा आहे.मसाला चांगला बारीक दळून घ्या .आता आपल्याकडे कोल्हापुरी मिसळ मसाला तयार आहे.

Step ४): मसाला तयार झाला आहे म्हणून आता आपण मिसळ बनवायला सुरवात करूया .त्यासाठी सर्वात आधी आपल्याला मिसळ ज्या भांड्यात बनवायचीय ते भांडे गॅसवर ठेवायचं आहे ,त्यानंतर ते चांगलं गरम झालं कि त्यात तेल टाकायचं तेल आपल्याला थोडे जास्त प्रमाणात टाकायचे आहे,कारण आपल्याला मिसळ तर्ही आली पाहिजे.म्हणून साधारण ४-५ चमचे तेल टाकायचे आहे .

Step ५): तेल गरम झाले कि त्यात १ tsp मोहरी घालायची आहे ,मोहरी चांगली तडतडली कि त्यात जिरे घालायचे आहेत .मग त्यात हिंग घाला.

Step ६): याना एकत्र करून घेतलं कि त्यात बारीक केलेला कांदा घालायचा (कांदा थोडा बारीकच करून घ्यायचा ). आता कांदा घालून झाला कि आपण त्यात बारीक केलेले टमाटर घालायचा .आणि थोड्या वेळ शिजायला ठेवायचं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे.साधारपणे ५-६ मिनिटे होऊ द्या .

Step ७): आता यात आपण एक एक करून मसाले टाकणार आहोत .

Step ८): त्यात १/२ tsp हळद , १ tsp लाल मिरची पावडर आणि त्यानंतर आपण जो कोल्हापुरी मिसळपाव मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे.मसाला तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जर मिसळ थोडी तिखट म्हणजे म्हणजे झणझणीत लागत असेल तर थोडा जास्त घाला .मसाला घालून झाला कि आता त्यात आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे .

Step ९):मटकी घालून झाली कि सर्व चांगले एकत्र करून घ्यायचे आहे,मग त्यात चवीनुसार मीठ टाका.नंतर साधारणपणे ३ कप पाणी टाकायचे आहे .पाणी टाकल्यांनंतर परत चांगले एकत्र करून घ्या. आता भांडयावर झाकण ठेऊन मटकी शिजू द्या .मटकी शिजायला १०-१५ मिनिटे लागतात .

Step १०): मटकी शिजत आली कि त्यावर चांगली तर्ही यायला सुरु होते .मिसळ तयात झाली कि त्यावर बारीक चिरलेली कोथम्बीर घाला .आता आपली मिसळ तयार आहे .

आता हि झणझणीत कोल्हापूरी मिसळ  पाव, फरसाण ,कांदा बरोबर गरमागरम खायला द्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *