Karanji Recipe in Marathi – करंजी

0
24

करंजी : दिवाळी फराळ how to make karanji

करंजी पाककृती – karanji recipe in marathi | how to make karanji

करंजी ( karanji recipe ) हा एक महाराष्ट्रीयन गोड चवदार अल्पहार (नाश्ता) आहे ,जो बहुतेकदा दिवाळी आणि गणेश चतुर्थीच्या उत्सवांसाठी आवर्जून बनविला जातो. करंजी ( karanji recipe )हि खायला गोड व कुरकुरीत असते.दिवाळीतल्या फराळामध्ये करंजी हि असतेच.तशेच आपण दिवाळी व इतर सणांना सोडून देखील करंजी हा गोड नास्ता (स्नॅक्स) आपल्या घरी बनवून ठेवतो.

आपण करंजी रेसिपी ( karanji recipe in marathi ) नेहमी सणाच्या हंगामात घरी तयार करून ठेवतो .करंजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नाव आहेत. करंजीला कन्नडमध्ये करजीकई, महाराष्ट्रामध्ये करंजी, तमिळ नाडूमध्ये करचिका, आंध्र प्रदेशमध्ये कज्जिकायालु आणि गुजरातमध्ये गुजिया म्हणून ओळखले जाते. करंजीला वेगवेगळ्या भागात भिन्न नावे असली तरी करंजी ची चव मात्र सारखीच आहे.

करंजी रेसिपी ( karanji recipe) बनवण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असू शकते.काही भागात करंजी मैदा आणि रवा यांच्यापासून बनवतात काही ठिकाणी ओल्या नारळाची बनवतात महाराष्ट्रात शक्यतो करंजी गोड असते पण तुरळक भागात करंजी तिखट असते.करंजी सगळ्यांना फार आवडते.

करंजीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण करंजी तयार करून खूप दिवस एअर टाईट डब्यामध्ये साठून ठेऊ शकतो .करंजी लवकर खराब नाही होत आणि करंजी खाण्याचा आनंद आपण खूप दिवस घेऊ शकतो.

दिवाळीच्या काळात किंवा गणेश चतुर्थीतमध्ये माझ्या कुटुंबामध्ये करंजी रेसिपी ( karanji recipe ) आवडीने बनवतात.मी हि करंजी रेसिपी (karanji recipe) माझ्या आईकडून शिकलीय .हि रेसिपी इतर रेसिपी पेक्षा वेगळी आहे कारण इतर करंजी रेसिपीमध्ये(karaji recipe) साखर वापरतात माझी आई साखरे ऐवजी गूळ वापरते.तिची खास आणि वेगळी करंजी रेसिपी( karanji recipe ) आज मी सांगणार आहे तर चला मग बगूया गुळाची चवदार कुरकुरीत आणि जास्त काळ टिकणारी करंजी रेसिपी ( karanji recipe) कशी बनवायची( how to make karanji). त्याच बरोबर आज मी करंजी रेसिपी साठी काही खास टिप्स सुद्धा सांगणार आहे. त्या टिप्स नक्कीच तुम्हाला फायदेशिर ठरतील आणि तुमच्या करंजी कधीच बिघडणार नाही म्हणून अश्या पद्धतीच्या करंजी दिवाळीत आवर्जून करून बगा सगळे जण तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही.चला तर सुरु करूया आपली आजची रेसिपी-करंजी रेसिपी ( karanji recipe in marathi )

करंजी रेसिपी( karanji recipe ) साठी लागणारे साहित्य खालीप्रमाणे आहे

करंजी साहित्य : ingredients for karanji recipe in marathi

करंजी भरण्यासाठी : karanji recipe in marathi

1 किसलेले नारळ ( तुमच्या आवडी नुसार तुम्ही ओल नारळ सुद्धा घेऊ शकता)

1 चमचा पांढरे तीळ

8 ते 9 बदाम

9 ते 10 काजू

9 ते 10 सोनेरी मनुका

2,3 हिरवी वेलची पावडर किंवा वेलची पूड

3 चमचे चूर्ण साखर / 1 कप गूळ (घरची साखर सुद्धा वाटून घेऊ शकता) किंवा आवश्यकतेनुसार

जायफळ पावडर किंवा किसलेले जायफळ एक चिमूटभर

½ चमचे तूप

करंजीच्या बाह्य आवरणासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे : karanji recipe in marathi

2 कप मैदा

2 चमचे तूपच

चवीसाठी थोडं मीठ

1 कप दूध किंवा आवश्यकतेनुसार

करंजी कशी बनवायची : how to make karaji recipe

करंजी रेसिपी : karanji recipe in marathi

करंजी रेसिपी ( karanji recipe ) बनवण्यासाठी त्याला लागणारे स्टफिंग आपण आधी बनून घेऊया

 • करंजी स्टफिंग बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका कढईत किंवा पॅन मध्ये तूप गरम करा .आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे जेनेकरुन खोबर जळणार नाही .आता तूप चांगले गरम झाले की त्यात किसलेले खोबर टाका
 • किसलेले खोबर छान सोनेरी होऊ द्या आणि ते एका प्लेट मध्ये खाली काढून घ्या .
 • आता त्याच कढईत किंवा पॅनमध्ये तीळ घाला तीळ मस्त तडतड आणि छान खमंग वास यईस्तोवर भाजून घ्या भाजून झाले की त्याला भाजून ठेवलेल्या नारळाच्या प्लेट मधेच काढून घ्या.
 • आता काजू ,बदाम , मनुका ड्राई ग्राइंडर किंवा कॉफी ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या .खूप जास्त पावडर पण बनवायचे नाही मध्यम बारीक करून घ्या.( तुम्ही अजून छान चव लागण्यासाठी काजू बदाम भाजून त्याचे पावडर न करता छोटे छोटे तुकडे करून पण सारणात घालू शकता)
 • आता आपण तयार केलेली काजू,बदाम,आणि मनूकाची पावडर तीळ आणि खोबर असलेल्या मिश्रणामध्ये घाला.
 • हे सर्वकाही चांगले मिसळून घ्या आता ह्यात साखरेचे चूर्ण टाका आणि हे मिश्रण बाजूला ठेऊन द्या
 • आता आपण कंरजी रेसिपी साठी लागणारे बाहेरील आवरण तयार करून घेऊ

करंजीचे बाह्य आवरण : karanji recipe in marathi

 1. करंजीचे आवरण तयार करण्यासाठी एका भांड्यात किंवा पॅनमध्ये पीठ घ्या नंतर एका छोट्या भांड्यात तूप गरम करा तूप खूप जास्त तापऊ नका तूप थोडे हलके तापवा .
 2. आता भांड्यातील पिठात वितललेले तूप टाका त्यात चवीनुसार मीठ घाला आता हे सगळे हलके मिसळवा
 3. आता ह्यात दूध घाला आणि कणिक चांगलं गुळगुळीत मळून घ्या.
 4. मळून ठेवलेले पीठ स्वयंपाकघरातील टॉवेलने नीट झाकून ठेवा आणि 15 ते 20 मिनिटे हे पीठ बाजूला ठेवा.

रोलिंग आणि स्टफिंग करंजी : karanji recipe in marathi

 • आता आपण ठेवलेले पीठ घ्या आणि त्या पिठातून छोट्या छोट्या पिठाचे गोळे करा
 • आता त्या पिठाचे गोल गोल पुरी एव्हडे आकार बनवा
 • त्या गोल मध्ये कडा रिकाम्या ठेऊन 2,3 चमचे करंजीचे सारण भरा.आपल्याला सारण जास्त भरायचं नाही कारण आपण सारण जास्त भरलं तर करंजी तळतानी तुटतात. सारण मध्यभागी भरा कडा दाबण्यासाठी रिकाम्या राहू द्या
 • आता त्या गोल पिठाला ज्यात आपण करंजीचे सारण भरलय त्याच्या कडेला आपल्या बोटानी काठावर थोडं थोडं पाणी लावा .
 • हळूवारपणे दोन्ही कडा एकत्र आणा आणी हळूहळू चमच्याने त्या कडा दाबून घ्या .
 • अशाप्रकारे सगळ्या पिठाची कंरजी बनून घ्या त्यांना ओलसर स्वयंपाकघर टॉवेलने झाकून ठेवा, जेणेकरून कणिक कोरडे होणार नाही.

करंजी बनून झाली आहे आता आपण तयार झालेली करंजी तळून घेऊया

करंजी तळणे : karanji recipe in marathi

 • करंजी तळण्यासाठी एका कढईत किंवा खोल पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा
 • तेल गरम झाले की नाही बघा ते बघण्यासाठी एक छोटा पिठाचा तुकडा घेऊन तेलात टाकून बघा जर तो वरती आला तर तेल गरम झालेलं आहे
 • त्यानंतर तयार करंजी हळुवारपणे गरम तेलात सोडा.
 • कढईत थोडे थोडे करंजी टाका कढईत गर्दी करू नका जास्त करंजी टाकले कि कंरजी फुटता
 • करंजी सोनेरी होईपर्यंत तळुन घ्या.त्यातील जास्त तेल काढून टाकण्यासाठी कागदाच्या टॉवेल्सवर सगळी करंजी काढा
 • करंजी एकदा थंड झाल्यावर त्यांना एअर-टाइट कंटेनरमध्ये ठेवा. चहा सोबत सर्व्ह करा.

करंजी टिपा : Tips For karanji recipe in marathi

 • जेव्हा तुम्ही करंजी बनवायला घेसाल तेव्हा साजूक तुपाऐवजी तुम्ही साटा डालडाचा वापर केला तरीही चालेल.
 • तुम्ही कंरजी बनवत असाल आणि वातावरण उष्ण असेल तर करंजी तयार करून फ्रीज मध्ये 15 मिनिटे ठेवा म्हणजे तुप गोढेल वितळणार नाही.
 • करंजी तळतानी तेल चांगलं गरम होऊ द्या खूप वेळा आपण करंजी बनवतो आणि थोड्या वेळा नंतर त्या कडक कुरकुरीत न राहता नरम पडता त्याच कारण असे असत कि तुम्ही जास्त गरम नसलेल्या तेलात करंजी तळली.

Tips : तुम्हाला करंजी रेसिपी (karanji recipe in marathi )कशी वाटली ते आम्हाला कंमेन्ट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे ते पण सांगा आम्ही त्या रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here