कांदे पोहे – Kande Pohe Recipe in Marathi | Kande Pohe Quick Recipe

Published by Uma on

Kande Pohe Recipe in Marathi

कांदे पोहे – Kande Pohe Recipe in Marathi : पाहण्याचा कार्यक्रम असो किंवा अचानक घरी आलेले पाहुणे असो त्यांच्यासाठी ठरलेला सोपा नास्ता म्हणजे कांदे पोहे . कांदे पोहे रेसिपी (Kande Pohe Recipe) हि खायला चवदार व बनायला हि सोपी असते . अगदी काही मिनिटात तयार होणारी हि कांदा पोहे रेसिपी( Kande Pohe Quick Recipe) आज आपण बगणार आहोत . त्यांचं बरोबर मी आज काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा तुम्हाला देणार आहे . ज्यामुळे तुम्ही उत्तम कांदे पोहे बनवू शकाल आणि पोहे खूप नरम आणि खायला चविष्ट होतील.

कांदे पोहे – Kande Pohe Recipe in Marathi | Kande Pohe Quick Recipe

साहित्य :-

  • २ वाट्या जाड पोहे निवडून घेणे
  • २ कांदे बारीक चिरून
  • ५-६ हिरव्या मिरच्या चिरून
  • ६-७ कढीलिंब
  • अर्धी वाटी खोवलेले खोबरे
  • मुठभर चिरलेली कोंथिबीर
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार साखर
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तेल
  • १/२ वाटी शेंगदाणे [optional ]
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • अर्धा चमचा हळद
  • १ मध्यम आकाराचा बटाटा
  • अर्धा कप वाटणे [मटार] [optional ]

कृती :-

  • कांदा पोहे रेसिपी (Kande Pohe Recipe ) बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदे चिरून, बटाटे चिरून, मिरच्या चिरून, कढीलिंब , कोंथिबीर चिरून, नारळ खवून, लिंबाचा रस काढून सर्व तयारी करून घ्यावी.
  • नंतर पोहे स्वछ चाळून घ्यावेत.भोकांच्या चाळणीत (रोवळीत) पोहे हलक्या हाताने धुवावेत.
  • पातेले तापत ठेवून तेल घालावे व तेल तापल्यावर मोहरी ,जिरे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी.
  • फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब घालून लगेच कांदा व बटाटा घालावा.
  • गॅस मंद करून कांदा व बटाट्यावर चिमूटभर मीठ व साखर घालून कांदा व बटाटाला १ वाफ द्यावी.
  • कांदा पारदर्शक झाल्यावर व बटाटा शिजल्यावर भिजवलेले पोहे घालावेत व लगेच चवीनुसार मीठ,साखर व अर्ध्या लिंबाचा रस घालून पोहे उलथण्याने चांगले ढवळावेत.
  • गॅस अगदी मंद ठेवून झाकण घालून दोन वाफा द्याव्यात व दोन वाफांमध्ये चांगले ढवळावे म्हणजे मीठ,साखर सर्व पोह्याला सारखे लागेल .
  • आवडीनुसार खोबरे,कोंथिबीर पोह्यात घालून नीट ढवळून खाण्यास द्यावे अथवा डिशमध्ये पोहे घालून खोबरे,कोंथिबीर घालून डीश सजवावी.

टीप:-

  • वरील पोह्यात मटारच्या दिवसांत वाटीभर मटार अथवा मूठभर भाजके दाणे घालून पण पोहे छान लागतात.
  • पोह्यात आवडत असल्यास १ मोठा टोमॅटो बारीक चिरून कांद्याबरोबर घालावा.  टोमॅटो मुळे पोहे ओलसर होतात व लिंबू घालायची जरूर पडत नाही.
  • चार्तुर्मासात कांदा घालायचा नसेल तर फ्लावर अथवा पानकोबी घालून उत्तम पोहे होतात.
  • पोहे जरा जास्त तेलात स्वादिष्ट होतात. पण कमी तेलात करायचे असतील तर कांदा परतण्याइतपत तेल घालावे व कांदा परतल्यावर पाव वाटी पाणी आधी फोडणीत घालून मग पोहे टाकावे. म्हणजे तेल कमी घालून सुद्धा मऊसर पोहे होतात.
  • पोह्यांवर ओला नारळ नसेल तर सुके खोबरे किसून घालून पोहे चांगले लागतात . खोबऱ्याचा कीस वापरायचा असेल तर मुठभर भाजके दानेपण वापरावेत.खमंग लागतात.
  • पोह्यावर डिशमध्ये खायला देताना बारीक शेव घालावा.त्यामुळे पोहे स्वादिष्ट लागतात.


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *