फरसाण कचोरी रेसिपी : Kachori Recipe Marathi & English

Published by Uma on

Kachori Recipe Marathi & English

फरसाण कचोरी रेसिपी : Kachori Recipe Marathi & English

साहित्य : सारणासाठी

 • ५० ग्रॅ जाडे गाठे
 • ५० ग्रॅ. पापडी
 • १ टे.स्पू. तीळ
 • १ टि.स्पू बडीशेप
 • १ टि.स्पू धणे
 • १ टि.स्पू. साखर
 • चिंचेचा कोळ
 • मनुका
 • लालतिखट
 • मीठ.

आवरणासाठी:

 • २०० ग्रॅ. मैदा
 • ३ टे.स्पू.
 • तेल
 • मीठ

पाककृती-

1) गाठे, पापडी, तीळ, बडीशेप, धणे, मीठ, लालतिखट मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्यावेत.

2) नंतर, त्यात साखर व चिंचेचा कोळ मिसळून पुन्हा मिक्सरच्या सहाय्याने मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे. त्याचे लहान लहान गोळे तयार करावेत.

3) आता, आवरणासाठी मैद्यात ४ टे.स्पू. तेल घालावे आणि पीठ नीट मळून घ्यावे. हे पीठ साधारण चपातीच्या पीठाइतकेच नरम मळून घ्यावे. त्याचेही लहान लहान गोळे करुन त्याला बोटानेच खोलगट आकार द्यावा. त्यात सारणाची गोळी भरावी. आवरण सर्व बाजूनी आवळून बंद करुन घ्यावे.

4) अशाप्रकारे कचोरीचे गोळे तयार करुन घेतल्यावर ते तेलात मंद आचेवर तपकिरी रंगाचे होईस्तोवर तळून घ्यावेत.

तयार झालेल्या खुसखुशीत, खमंग फरसाण कचो-या थोड्या वारवल्या की सर्व्ह कराव्यात.

फरसाण कचोरी रेसिपी : Kachori Recipe English

Materials: For the table

 • 50 g thick bales
 • 50g Papadi
 • 1 tsp. Sesame
 • 1 tsp dill
 • 1 tsp coriander
 • 1 tsp. Sugar
 • Tamarind pulp
 • Plum
 • Laltikhat
 • Salt.

For cover:

200g Flour
3 tbsp.
Oil
Salt

How To Make Kachori Recipe

1) Mix Gathe, Papadi, Sesame, Dill, Coriander, Salt, Laltikhat in a mixer.

2) Then add sugar and tamarind pulp and mix again with a mixer. Make small balls of it.

3) Now, add 4 tsp. Add oil and knead the dough. Knead the dough as soft as ordinary chapa)3ti flour. Make small balls of it and give it a hollow shape with your fingers. Fill it with tablets. Cover and cover on all sides.

4) Once the kachori balls are prepared in this way, fry them in oil on low flame till they turn brown.

Serve the prepared crispy, savory farsan kachoya with a little twist.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *