Instant Mango Recipes
Instant Mango Recipes

यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याच्या या हटके रेसिपीज (Instant Mango Recipes) करण्यासाठी आहात ना तयार? लहान मुलांपासून सारेच या चवदार रेसिपीजना पसंतीची पावती देतील. करुन तर पाहा!

आंब्याच्या झटपट रेसिपीज : Instant Mango Recipes

मॅंगो मफिन्स –

साहित्य –

 • १ कप मैदा
 • १/२ कप आंब्याचा गर
 • १/२ कप कन्डेन्स्ड मिल्क
 • १/३ कप पिठी साखर
 • १/२ कप दूध
 • १/३ कप बटर
 • १/२ लहान चमचा वाटलेली वेलची
 • १/४ लहान चमचा मीठ
 • १/४ लहान चमचा बोकिंग सोडा
 • १ लहान चमचा बेकिंग पावडर

पाककृती –

 1. प्रथम मफिन ट्रे व मफिन कप्सला तेल लावावे.
 2. मैदा, मीठ, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर एकत्र करुन दोन वेळा मिश्रण नीट चाळून घ्यावे.
 3. बटर किंवा कन्डेन्स्ड मिल्क आंब्याच्या पल्पमध्ये मिळसून मिश्रण फेटून घ्यावे.
 4. या मिश्रणात थोडे थोडे तेल घालून फेटल्यास बॅटर व्यवस्थित फेटले जाते.
 5. तयार बॅटर चमच्याने मफिन कप्समध्ये भरावे.
 6. ओव्हन १८० डिग्री.से.वर प्रिहिट करुन घ्यावा. त्यामध्ये, मफिन बेक करण्याकरिता ट्रे ओव्हनमध्ये ठेवावा. साधारण २० मिनिटे बेक करावे. मफिन्स हलकेसे तपकिरी रंगाचे झालेले दिसतील.
 7. तयार मॅंगो मफिन्स गार झाल्यावर मोल्ड मधून काढून प्लेटमध्ये चॉकलेट सॉसने गार्निश करुन सर्व्ह करावेत.

मॅंगो मोहितो –

साहित्य-

 • २ गोड हापूस आंबे
 • १ हिरवी मिरची
 • ५ ते ६ पुदिन्याची पाने
 • १/२ वाटी साखरेचा पाक
 • बर्फाचा चुरा, सोडा वॉटर

पाककृती –

 1. आंब्याच्या साले काढून त्याच्या बारीक तुकडे करुन घ्याव्यात. त्यापैकी १० ते १२ तुकडे गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवावे.
 2. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करावेत.
 3. साखरेचा पाक, हिरवी मिरची, आंब्याचे तुकडे, पुदिन्याची पाने सारे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत.
 4. मिश्रण आंब्याचा गर दिसेल इतपत बारीक करावे.
 5. आता, ग्लासमध्ये थोडा बर्फाचा चुरा, आंब्याचे मिश्रण व सोडा वॉटर घालावे.
 6. त्यावर ३ ते ४ आंब्याच्या बारीक फोडी, २ ते ३ पुदिन्याची पाने घालून मॅंगो मोहितो छान गार्निश करावे आणि गारेगार सर्व्ह करावे.

मॅंगो मॅच स्मूदी –

साहित्य

 • २ संफरचंद
 • १ केळे
 • १ वाटी गोड दही
 • २ चमचे आंब्याचा गर
 • १/४ वाटी भिजवलेले किसमिस
 • बदामाचे काप व चेरी

पाककृती –

 • सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे तुकडे, आंब्याच गर, दही, भिजवलेले किसमिस हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्यावेत.
 • तयार मिश्रण ग्सासमध्ये ओतून त्यावर बदामाचे काप व चेरी लावून सजवावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here