इडली रेसिपी । Idli Recipe in Marathi

Published by Uma on

Idli Recipe in Marathi

इडली रेसिपी (Idli Recipe in Marathi ) : इडली हा साऊथ इंडियन पदार्थ आहे ,तरी पण तो महाराष्ट्रात खूप आवडीने खाल्ला जातो. पण आपण घरी बनवलेली इडली कधी कधी फुगत नाही किंवा हवी तेव्हडी स्वादिष्ट नसते.आज आपण स्वादिष्ट व उत्तम इडली रेसिपी तशेच मऊ आणि लुसलुशीत इडली रेसिपी (Idli Recipe in Marathi ) कशी बनायची ते बगणार आहोत.

इडली रेसिपी । Idli Recipe in Marathi

साहित्य:-

 • २ वाटी उडदाची डाळ
 • ५ वाटी तांदूळ
 • मीठ
 • १ टेबलस्पून तेल
 • इडली पात्र

कृती:-

 1. इडली करायच्या आधी २४ तास उडदाची डाळ आणि तांदूळ निवडून धुवून भिजत घालावी.
 2. १०-१२ तास डाळ,तांदूळ भिजले की पाणी काढून मिक्सरवर वेगवेगळे वाटावे व एकत्र करून हाताने मिसळून एका ऐल्युमिनियमच्या डब्यात किंवा भांड्यात घालून उबदार जागेत ठेवावे.
 3. हिवाळ्यात २४ तास पीठ आंबल्यावर (उन्हाळ्यात १२ तासात पीठ आंबते)ते डब्यातून काढून त्यात १ चमच्या तेल व चवीपुरते मीठ घालून सारखे करावे.
 4. नंतर इडली पत्राला तेल लावून त्यात प्रत्येक साच्यात थोडे-थोडे पीठ टाकून इडल्या कराव्यात. आठ ते दहा मिनिटे त्याला वाफ आणावी .
 5. १० मिनिटांनी झाकण काढून इडली शिजली का ते पाहावे. मधोमध ओली सुरी टोचली व सुरीला पीठ लागले नाही तर समजावे इडली झाली.सुरीला पीठ लागले तर अजून ५ मिनिटे उकडण्यास ठेवावे.
 6. वरील साहित्यात २५-२६ इडल्या होतात. सांबार व चटणीबरोबर ४ व्यक्तींना भरपूर पुरतात.

टीप:-

 • इडलीचे पीठ चांगले आंबले की इडल्या चांगल्या हलक्या होतात. सोडा वापरायची जरूर नसते पण खूप थंडीच्या दिवसात २४ तास पीठ ठेवूनही आंबले नाही तर पिठात अर्धी वाटी आंबट दही व पाव चमचा सोडा घालून फेटून इडल्या कराव्यात.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *