How To Choose The Right Shampoo For Your Hair Type – तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य शैम्पू कशा निवडायचा??

Published by Uma on

How To Choose The Right Shampoo For Your Hair Type – तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य शैम्पू कशा निवडायचा??

आज आपण या लेखात आपल्या केसांसाठी (Hair) योग्य शांपू ( Shampoo) कसा निवडायचा ते बगणार आहोत .

आपल्या रोजच्या धावपळीमुळे आपण नेहमीच आपल्या केसांची योग्य ( Right) ती काळजी घेत नाही त्या मुळे केस गळती ,कोंडा अशा समस्या उदभवतात . यात जर आपला शांपू ( Shampoo) योग्य नसेल तर त्या समस्या अधिक वाढतात.म्हणून शांपू खरेदी करतानि कोणती काळजी घ्यायची योग्य तो शांपू कसा निवडायचा तो आता आपण बगूया.

1)तुमच्या केसाचा प्रकार जाणून घ्या Know your scalp type

शैम्पू खरेदी करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या आपल्या केसांचा प्रकार कुठला आहे जाणून घेणं खूप गरजेचं असत त्या नुसार आपण योग्य शांपू खरेदी करू शकतो. शैम्पूचा हेतू हा आहे की आपल्या स्कॅल्पवर जमा झालेले तेल, घाण आणि मृत पेशी काढून टाकणे.जर आपली टाळू तेलकट असेल तर आपणास तेलकट टाळूसाठी बनविलेले शैम्पू घ्यावे. जर आपल्याला आपल्या केसांमध्ये व्हॉल्यूम पाहिजे असेल तर आपल्याला व्हॉल्यूमॅझिंग शैम्पूची आवश्यकता असेल. किंवा आपल्यास डोक्यातील कोंडा समस्या असल्यास, अँटी-डँड्रफ शैम्पू कार्य करेल.

2)तेलकट केसांसाठी ( For Oily Hair)

तुमचे केस जर तेलकट असेल तर तुम्ही हायड्रॅटींग आणि मॉइश्चरायझिंग करणारे शैम्पू वापरू नका ते कोरड्या केसांसाठी चांगले असतात जर तुम्ही अश्या प्रकारचे शाम्पू वापरले तर तुमचे केस अजून जास्त तेलकट होऊ शकतात म्हणून अशे शाम्पू टाळा.

शैम्पू करताना आपल्या केसांची मालिश केल्याने रक्त परिसंचरण वाढते.तेल आणि घाण सर्व निघून जाते. या मुळे केसांची वाढ होते.

3) कोरड्या केसांसाठी ( For Dry Hair)

तुमचे केस जर कोरडे असेल तर त्यात कोंडा(Dandruff) होण्याची शक्यता जास्त असते आणि केसातील कोंड्यामुळे खाज सुद्धा येते . अश्या केसांसाठी ओलावा देणारे शाम्पू निवडन योग्य असत. त्यामुळे तुम्ही हायड्रेट आणि मॉइश्चराइझ करणारे शैम्पू खरेदी करा. या शाम्पू मध्ये तुमच्या केसांना मऊ आणि ओलावा देणारे घटक असतात त्या मुळे तुमचे केस निरोगी राहतात व अजून कोरडे नाही होत.

लक्षात ठेवा, सल्फेट असलेले शैम्पू टाळा, कारण ते टाळू आणि केस कोरडे करतात.

4)नॉर्मल केसासाठी ( For Normal Hair)

जेव्हा तुमचे केस तेलकट किंवा कोरडे नसतील तर तुम्ही तुमच्या आवडी आणि आवश्यकतांवर अवलंबून विविध प्रकारच्या पर्यायांमधून शाम्पू निवडु शकता.

महत्त्वाचे(Note): लक्षात ठेवा, सल्फेट असलेले शैम्पू टाळा, कारण ते केस कोरडे करतात.

Categories: Beauty Tips

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *