रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे घरगुती उपाय (Home Remedies to Boost Immunity) : कुठल्याही आजारासमोर सर्वप्रथम ढाल बनून उभी राहते, ती म्हणजे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती! दैनंदिन जीवनातही व्यस्त दिनक्रम, धावपळीचा प्रवास,कामाचा ताण या सगळ्यामुळे बिघडणाऱ्या मानसिक स्वास्थ्यापासूनही हीच रोगप्रतिकारशक्ती आपले संरक्षण करते.

नवजात बालकासाठी जसे आईच दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा सर्वोत्तम स्रोत  ठरते , तसेच वाढत्या वयानुसार या शक्तीच्या वाढीकडेही जाणीवपूर्वक लक्ष्य द्यावे लागते . सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून हीच शक्ती सर्वप्रथम आपला बचाव करते आहे .

कारण, या विषाणूची लागण झाल्याच्या सुरवातीच्या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला , डोकेदुखी असे नेहमीच्या दिवसात हवाबदलामुळे होतात तसे आजार आहेत . तेव्हा निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुठल्या पदार्थांचे नियमित सेवन करायला हवे ते जाणून घेऊया आजच्या लेखात !

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे घरगुती उपाय

१. दही बऱ्याच जणांच्या आहारात रोज असतंच . तर रोज थोडं तरी फ्रिजमधलं नाही तर साधं दही खाण्याची सवय लावून घ्या . दह्यामुळे पचनक्रिया सुधारते व रोगप्रतिकारशक्तीही वाढते .

२. सकाळच्या कोवळ्या किरणांमधून मिळणारं डी व्हिटॅमिन तर रोगप्रतिकारशक्तीचा उत्तम स्रोत आहे . कोरोनामुळे सध्या घराबाहेर पडणं मुश्किल आहे . म्हणून, सकाळच्यावेळी घराच्या खिडकीत किंवा बाल्कनीत थोडावेळ उभं राहायला हवं.

३. स्मरणशक्ती वाढवणारे बदाम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.बदाम हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम स्रोत आहे ,म्हणून रोज सकाळी ४-५ भिजवलेले बदाम खा.

४. आणखी एक महत्तम व्हिटॅमिन शरीराला आवश्यक  आहे ते म्हणजे व्हिटॅमिन सी! लिंबू, संत्र, अननस, आवळा या सारखी आंबट चवीची,  शरीराला भरपूर सी जीवनसत्त्व देणारी फळे खावीत.किवा बाजारात व्हिटॅमिन सीच्या गोळ्या आणू शकता. ह्या गोळ्या सुद्धा फार

५. पालेभाज्या खाणं तर केव्हाही उत्तमच! अगदी वर्षभर मिळणाऱ्या वेगवेगळ्या पालेभाज्या खायलाच हव्यात . पालेभाज्या शरीराला संपूर्ण आहार देतातच व रोगप्रतिकारशक्तीही वाढवतात.

६. कच्चा लसूण खाल्ल्याने किंवा ग्रीन टी वा ब्लॅक टी प्रमाणात प्यायल्यानेही रोगप्रतिकारशक्ती वाढते . हे जिन्नस प्रमाणाबाहेर पोटात गेल्यास त्याच्या साईड इफ्फेक्टसना तोंड द्यावे लागते. म्हणून, आपले वरील पाच पर्याय उत्तम व सोपे आहेत.

७. वरील सर्व उपायांच्या जोडीला पूर्ण वेळेची व तुमच्या वयानुसार तुमच्या शरीराला जितकी झोप आवश्यक आहे तितकी झोप घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

चला तर मग, कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात थांबलोच आहोत , तर नियमितपणे या साध्या घरगुती उपायांनी स्वतःची रोगप्रतिकाशक्ती वाढवूया. आहेत का मग  तयार? आजपासून सुरुवात करूया. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ब्लॉगखालील कमेंटबॉक्समध्ये लिहून कळवा आणि आरोग्य निरोगी रहाण्यासाठी तुमच्याजवळ काही टिप्स असतील तर त्याही आमच्यासोबत शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here