Gorya Gorya Galavari Lyrics | गोऱ्या गोऱ्या गालांवरी

390

गोऱ्या गोऱ्या
गालांवरी चढली लाजंची
लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या
अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण
पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोऱ्या गोऱ्या
गालांवरी चढली लाजंची
लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली

नवऱ्या मुलाची आली हळद
ही ओली
हळद ही ओली लावा
नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग
माखवा
पिवळी करून तिला सासरी
पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या
अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही
हासते हळूच गाली गं
पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला,
वेशीला गं, देव नारायण
आला गं
मंडपात गणगोत सारं
बैसलं गं म्होरं
ढोलताशा वाजि रं

सासरी मिळू दे तुला
माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं
सुखाची गं छाया
भरुनीया आलं डोळं जड
जीव झाला
जड जीव झाला लेक जाय
सासरा
किणकिण कांकणं रुणझुण
पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या
बरसु दे घरीदारी … ग
पोरी सुखाच्या सरी …
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला,
वेशीला गं, देव नारायण
आला गं
मंडपात गणगोत सारं
बैसलं गं म्होरं
ढोलताशा वाजि रं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here