डोळ्यांच्या काळजीसाठी उपाय : Eye Care Tips in Marathi

Published by Uma on

Eye Care Tips in Marathi

डोळ्यांच्या काळजीसाठी उपाय (Eye Care Tips in Marathi) : वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे नव्या पिढीमध्ये डोळ्यांचे आजार जास्त दिसून येत आहेत.तशेच रात्रीच्या तेज प्रकाशामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांना त्रास होतो. डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे,म्हणून आज आपण काही घरगुती डोळ्यांच्या काळजीसाठी उपाय बगणार आहोत.

डोळ्यांच्या काळजीसाठी उपाय : Eye Care Tips in Marathi

1.  डोळे सुरक्षित राखण्यासाठी गाजर, टोमाटो, पालेभाज्या, बदाम, खावेत. मोडाची धान्ये म्हणजे मूग, मटकी, हरभरे, यांना मोड आणून ती कच्ची खावीत.

2.  पसरट बशीत गार पाणी घेऊन त्यात एक चिमूट मीठ टाकावे व त्यात डोळ्यांची उघडझाप करावी.यामुळे डोळे स्वछ होतात.

3.  काकडी किसून किंवा चिरून फडक्यात गुंडाळून डोळ्यांवर ठेवावी.

4.  न तापवलेल्या दुधात कापूस भिजवून ठेवावा व रात्री झोपताना त्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवल्या, तर डोळ्यांना थंडावा येतो.

5.  तळपायांना साजूक तूप लावून काशाच्या वाटीने पाय चोळावेत. त्यातून सर्व उष्णता बाहेर पडते.

6.  एका घोट्या रुमालात चहाची पावडर बांधावी. ती गरम पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवावी व एक मिनिटाने काढून त्यावर बर्फ ठेवावा. असे आलटून पालटून करावे म्हणजे डोळ्यावर आलेली सूज एकदम कमी होते. दिवसातून थोडा वेळ डोळे मिटून स्वस्थ बसावे. त्यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते व ते तेजस्वी होतात.

7.  डोळे थकलेले असेल तर त्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.

Categories: Beauty Tips

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *