Easy dhokla recipe in Marathi । khamnag dhokla – ढोकळा रेसिपी

Easy dhokla recipe in marathi । khamnag dhokla – ढोकळा रेसिपी

आज आपण मार्केट सारखा मऊ आणि खमंग ढोकळा कसा बनवायचं याची पाककृती (dhokla recipe) बगणार आहोत.घरी असलेल्या वस्तू पासून सोप्प्या पद्धतीने झटपट ढोकळा पाककृती (dhokla recipe)अगदी अर्ध्या तासात बनवूया चला तर मग बगूया ढोकळा (dhokla)बनवन्यासाठी लागणारी साहित्य.

साहित्य : Ingredients for dhokla recipe

Dhokla recipe in marathi – ढोकळा

 • १½ कप बेसन / हरभरा पीठ
 • ३ चमचे रवा / सूजी, बारीक
 • १ टीस्पून आले पेस्ट
 • २ मिरची, बारीक चिरून
 • १ टीस्पून हळद
 • १ टीस्पून साखर
 • चिमूटभर हिंग
 • १ टीस्पून मीठ
 • १ टीस्पून लिंबाचा रस
 • १ टीस्पून तेल
 • १ कप पाणी
 • १ टिस्पून एनो

फोडणीसाठी साहित्य: dhokla recipe in marathi

 • ३ टिस्पून तेल
 • १ टीस्पून मोहरी
 • ½ चमचा जिरे / जिरा
 • १ टीस्पून तीळ
 • चिमूटभर हिंग
 • कढीपत्त्याची पाने
 • २ मिरची,
 • ¼ कप पाणी
 • १ टीस्पून साखर
 • १ टीस्पून मीठ
 • १ टीस्पून लिंबाचा रस

कृती: dhokla recipe process in marathi

How to make dhokla recipe in marathi – ढोकळा

 1. ढोकळा रेसिपी ( dhokla recipe) बनवण्यासाठी सर्वात प्रथम, मोठ्या भांड्यात १½ कप बेसन आणि ३ चमचे रवा घाला.
 2. आता त्यात ½ टीस्पून आले पेस्ट, २ मिरची, ¼ टीस्पून हळद, १ टिस्पून साखर, चिमूटभर हिंग, एक टीस्पून मीठ, १ टीस्पून लिंबाचा रस आणि १ चमचे तेल घाला.
 3. मिश्रण तयार होई पर्यंत एका खोल पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा
 4. आता मिश्रणात 1 कप पाणी किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून एक गुळगुळीत पिठ तयार करा.
 5. आता त्या मिश्रणात १ टिस्पून इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते.
 6. आता हे ढोकल्याच्या रेसिपी(dhokla recipe) चे मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या भांड्यामध्ये ठेवावे वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे. मध्यम आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे.
 7. जोवर ढोकळा (dhokla recipe ) तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या कढईत किंवा लोखंडी पलीत फोडणी तयार करू घ्यावी.फोडणी तयार करताना कढईत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
 8. 20 मिनिटाने गॅस बंद करावा .ढोकळा चांगला गार होउ द्या मग नंतर तो चौकोनी काप मध्ये कापून घ्या त्यावर तयार केलेली फोडणी पसरवा.

अश्या प्रकारे आपला मऊ आणि चवदार ढोकळा रेसिपी (dhokla recipe) तयार आहे. तुम्ही आता त्याच्यावर किसलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून
हिरव्या तिखट चटणी बरोबर सर्व्ह करू शकता.

Leave a Comment